Yash Dayal Accused of Mentally And Physically Exploitation By Women: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा वेगवान गोलंदाज यश दयाल याच्यावर उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील एका तरुणीने लग्नाचे आमिष दाखवून शोषण केल्याचा आरोप केला आहे. या तरुणीने मुख्यमंत्री ऑनलाइन तक्रार पोर्टल, आयजीआरएस द्वारे तक्रार दाखल केली आहे.

या तरुणीने तिच्या तक्रारीत आरोप केला आहे की, ती गेल्या पाच वर्षांपासून यश दयालबरोबर संबंधात होती. त्या काळात तिचे भावनिक, मानसिक आणि शारीरिक शोषण झाले आहे. “गेल्या पाच वर्षांपासून तक्रारदार एका क्रिकेटपटूशी संबंधात होती. लग्नाचे आश्वासन देऊन त्याने तिचे भावनिक, मानसिक आणि शारीरिक शोषण केले. त्याने तक्रारदारा तरुणीची त्याच्या कुटुंबाची सून म्हणून ओळख करून दिली होती, ज्यामुळे तिचा त्याच्यावर पूर्ण विश्वास बसला”, असे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत एनडीटीव्हीने वृत्त दिले आहे.

तरुणीने पुढे असा आरोप केला आहे की, जेव्हा तिने यश दयालला कथित फसवणुकीबद्दल विचारले, तेव्हा तिला शारीरिक आणि मानसिक छळ सहन करावा लागला. “संबंधादरम्यान, तक्रारदार तरुणीला भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या त्याच्यावर अवलंबून राहण्यास भाग पाडण्यात आले. नंतर, तिला आढळले की तो इतर महिलांसोबतही अशाच प्रकारच्या संबंधांमध्ये होता”, असे तक्रारीत म्हटले आहे.

तक्रारदार तरुणीने १४ जून २०२५ रोजी महिला हेल्पलाइन क्रमांक १८१ वर संपर्क साधल्याचा दावा केला, परंतु पोलीस स्टेशन पातळीवर हे प्रकरण पुढे सरकले नाही, असे तिने म्हटले आहे. आर्थिक आणि सामाजिक असहाय्यतेमुळे तिने न्यायासाठी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडे धाव घेतली.

“तिच्याकडे पुरावे म्हणून चॅट्स, स्क्रीनशॉट्स, व्हिडिओ कॉल्स आणि फोटो इत्यादी आहेत,” असे तक्रारीत म्हटले आहे.

“या प्रकरणाची त्वरित आणि निष्पक्षपणे चौकशी करण्याची आणि आरोपीवर कायदेशीर कारवाई करण्याची विनंती आहे. हे पाऊल केवळ तिच्यासाठीच नाही, तर अशा संबंधांना बळी पडणाऱ्या सर्व मुलींसाठी देखील महत्त्वाचे आहे,” असेही तक्रारीत नमूद केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उल्लेखनीय म्हणजे, यश दयाल आरसीबीच्या ऐतिहासिक आयपीएल २०२५ च्या विजेतेपदाचा भाग होता. त्याने १५ सामन्यांमध्ये १३ विकेट घेतल्या होत्या.