गेल्या दोन दशकांपासून कविता लिहिणाऱ्या महेशलिलापंडित यांचा ‘अथेति’ हा पहिला कवितासंग्रह. या कवितासंग्रहाचे ‘अनभान/ वल्लभान’, ‘गदक’, आणि ‘अथेति’ असे तीन विभाग केलेले आहेत. ‘वल्लभान’ या भागात बहुतांश कवितांच्या निवेदकाला स्वतबद्दलचे भान अजून आलेले नाही, असे निदर्शनास येते. ‘गदक’ या भागात नुकतेच आलेले भान आणि ‘अथेति’ या भागात निवेदक हा अधिक आत्मनिरीक्षणात्मक झालेला दिसतो. कवितांचा एकूण सूर लक्षात घेता, असे दिसून येते की कवितेतील काळ / अवकाश हा एकरेषीय पद्धतीने, एका सरळ रेषेत पुढे जातो. ‘अथेति’ हे शीर्षक दोन शब्दांच्या संयोजनातून निर्माण होते – ‘अत:’ आणि ‘ईती’. अर्थात, अत:पासून इतिपर्यंत, सुरुवात ते शेवट असे ते दोन शब्द आहेत. काव्यसंग्रहातील पहिला भाग – ‘Unभान’- भान नसलेली जाणीव दर्शवतो. त्यादृष्टीने या संग्रहातील ‘जेन्युअन फेके, झेले आणि गाभन बल’ या पहिल्याच कवितेतील शेवटच्या सहा ओळी येथे उदाहरणदाखल घेता येतील-

‘शिक्षण झाल्यावर

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
once upon a tome the misadventures of a rare bookseller book review
बुकमार्क : पुस्तकवेडे आणि बाकीचे सगळे!
Kennedy novel Marathi short stories Ram Kolarkaran editing magazines
कथावार्ता: कॅनडी नवलघुकथा..
lokrang, article, pandit kumar gandharv, singing style, thoughts, indian classical music, book, about to launch, gandharvanche dene pandit kumarjinshi sanvad,
कुमारजींचा सांगीतिक विचार

पाहिला मोठय़ा डेअिरगने आरसा

त्यात मला दिसला

शंकाकुशंकांनी गाभन बल

आणि

चिरंजीवीभवलेल्या कळा’

पुढे येणाऱ्या बऱ्याच कवितांमधील निवेदक हा काळात ‘व्हच्र्युअली’ प्रवास करताना दिसतो. हा प्रवास भूतकाळातील आठवणींच्या आधारे निवेदकाच्या मानसिक व वैचारिक अवस्थांचं वर्णन करतो. निवेदक या कवितेच्या शेवटी शिक्षण घेत असतानाची अवस्था आणि शिक्षण झाल्यानंतर स्वतचं प्रतिबिंब आरशात बघत असतानाची अवस्था या त्याच्या आयुष्यातील दोन टप्प्यांचा विचार करताना दिसतो.

मन-शरीर-बा हालचालींना, घटनांना आणि कृतींना मनुष्यप्राणी ‘स्वचलित आकलन’ आणि ‘जागृत आकलन’ या दोन प्रकारच्या प्रतिक्रिया देत असतो. उदाहरणार्थ, गरम भांडय़ाजवळ हात जाताच आपण तो सवयीनुसार मागे घेतो. वर नमूद केलेली प्रतिक्रिया ही भूतकाळातील हात भाजला जाण्याची संवेदना आणि वेदना या आठवणी / स्मृतींवर अवलंबून आहे. अशा प्रकारचे आकलन आणि प्रतिक्रिया या स्वयंचलित (automatic)) असतात. परंतु या कवितेतील निवेदक हा ‘जागृत आकलना’च्या प्रतिक्रिया आपल्यासमोर मांडतो. अनियमित आणि नवीन कृती, क्रिया, घटना आकलन प्रक्रियेला जागृत करून भूतकाळात साधम्र्य असणाऱ्या अनुभवांचा शोध घेण्यास भाग पाडतात. या वर्तमानकाळातून भूतकाळातील स्मृतींचा शोध घेताना लागणारा वेळ आपल्याला अवकाशाची प्रखर जाणीव करून देतो आणि याच अवकाशात विचार आणि विचारांती प्रतिक्रिया जोमाने पुढे येते.

‘जेन्युअन फेके’ या पहिल्या कवितेतील ‘गाभन’ ही उपमा घेतली तर असे म्हणता यईल, की आशय आणि रूप या दोन्ही पातळ्यांवर ही कविता आठवणी, आयुष्य व ‘अवकाश’/ ‘स्थल-काल’ या घटकांचे एकमेकांशी असलेले नातेसंबंध मुक्तछंद आणि गद्यात्मक विधानांच्या स्वरूपात मांडते. याच स्वरूपाचे आणखी एक उदाहरण ‘अथेति’ या भागातील पहिल्या कवितेत आढळते. कवितेतील सुरुवातीच्या ओळी –

‘आपण चुकलो

च्यायला

आपण किती

होतो बावळट

कॉलेजला असताना

म्हणत आपण

काढतो परवाना

सध्या हुशार असल्याचा

करत समोरच्याचा

इनअटेंश्नल ब्लाइन्डनेस्

एक्सप्लॉईट

म्हणत

मीऐवजी आपण’

त्याचप्रकारे, ‘गदक’ या दुसऱ्या भागातील ‘कॉन्फिड्न्ट हेलकावे’ या कवितेच्या निवेदकाला स्वतला येणारे भान आणि जाणिवाही ‘कॉन्क्रिट’ / ‘शेप पोएट्री’च्या स्वरूपात व्यक्त होतात. ‘हेलकावे खात’ हे शेवटचे दोन शब्द हेलकाव्यांच्या रूपात छापलेले दिसतात. तसेच ‘स्कल्प्चर’ या कवितेत ‘ओबडधोबड’ हे दोन – दगड या नामासाठी आलेले विशेषणात्मक – शब्द ओबडधोबड रूपातच छापलेले आहेत. ‘फांद्या’ या कवितेचे छापील रूप हे फांदीसमान आहे आणि कवितेतील निवेदक स्वत:च्या मनात उमटणाऱ्या उत्कट भावनांना फांद्यांची उपमा देतो.

‘गदक’ हा शब्द धुळे, शिरपूर या उत्तर महाराष्ट्रातील भागांत वापरला जातो. अन्न शिजवण्याच्या प्रक्रियेत कालवण किंवा पिठलं तत्सम पदार्थाना सुरुवातीला येणारी उकळी म्हणजे गदक. हा शब्द कवितेतील निवेदकाला नुकतेच येऊ घातलेले भान दर्शवते. गदकसारखेच इतर अनेक अहिराणी आणि अहिराणीप्रणीत मराठी शब्द या काव्यसंग्रहात दिसून येतात. उदाहरणार्थ- ‘गेलचोद्या’, ‘बोमचोद्या’, ‘चिंगवलेल्या’, ‘बफ्फाऱ्या’.

या कवितांचा एक प्रमुख भाग म्हणजे ‘गदक’सारखे शब्द, ज्यांना त्यांच्या ठरवून दिलेल्या ‘क्षेत्रा’पासून वेगळे करून त्यांचे ‘अ-क्षेत्रांकन’ करणे आणि त्यांचे ‘पुनक्र्षेत्रांकन’ कवितांमध्ये करणे. जिल्स देलज आणि फेलिक्स गुअत्तारी या फ्रेंच तत्त्ववेत्त्याद्वयीने त्यांच्या ‘काफ्का टुवर्ड अ मायनर लिटरेचर’, ‘अ थाऊजन्ड प्लाटुज’ आणि इतर काही एकत्रित लिहिलेल्या पुस्तकांत Territorialization, Deterritorialization व  Reterritorialization या संकल्पनांचे सविस्तर विश्लेषण केलेले आहे. ‘अथेति’मधील कवितांकडे या संकल्पनांच्या आधारे पाहावे लागेल.

बहुतांशी सामाजिक – शाब्दिक व्यवहारांत शब्दांचे क्षेत्र हे ठरलेले असते आणि त्यांच्या वापराचे नियमनही. ‘गदक’, ‘बाशी खिचडी’ हे उत्तर महाराष्ट्रात स्वयंपाक घरात वापरले जाणारे शब्द पुनक्र्षेत्रांकन होऊन साहित्यक्षेत्रात, छापील काव्यसंग्रहाच्या स्वरूपात येतात. ही घटना एकूणच भाषेचे राजकारण आणि साहित्याचे राजकारण या दृष्टीने महत्त्वाची ठरते. साहित्याच्या क्षेत्रात प्रमाणभाषेला डावलून बोलीभाषेत लिहिण्याची मुभा जरी असली तरी शुद्ध / अशुद्ध लेखन हा भेद आपल्याकडे आहेच. शुद्ध / अशुद्ध या द्वंद्वात ‘शुद्ध’ या लेखनक्रियेसोबत जाणाऱ्या क्रियाविशेषणाला विशेष महत्त्व आहे. ‘शुद्ध’ या शब्दाचे सामाजिक, धार्मिक आणि जातीय संदर्भ थोडय़ा फार प्रमाणात आपण जाणतो.

‘अथेति’ या काव्यसंग्रहात प्रमाण भाषा आणि शुद्धलेखन या दोन घटकांना डावलून झालेले लिखाण पुढील दोन बाबींसाठी उल्लेखनीय आहे. एक- अहिराणी, अहिराणीप्रणीत मराठी, मराठीप्रणीत इंग्रजी आणि इंग्रजीप्रणीत मराठी शब्दांच्या वापरामुळे वाचकाची नवीन शब्दांशी ओळख होते. नवीन शब्दांच्या अर्थाचा मागोवा घेत असताना नवीन चालीरीती आणि विचारधारांची ओळख होते. दोन – भाषांच्या आणि शब्दांच्या पुनक्र्षेत्रांकनामुळे नवनिर्मिती आणि वाचकासाठी नवीन पद्धतीच्या अर्थनियमनाच्या शक्यताही वाढत असतात.

या कवितांमधील निवेदक हा अतिशय संवेदनशील असल्याचे जाणवते. ‘श्रेणी’ या कवितेत तृतीय श्रेणी / कनिष्ठ मध्यमवर्गीय व्यक्तीचं जीवन चित्रित झाले आहे. महिनाअखेर पैसे संपत आल्याने कुटुंबाची होणारी परवड कवी या कवितेतून पुढीलप्रमाणे व्यक्त करतो –

‘पुन्हा वाट पगाराची

येताच निघून जानाऱ्या

आशा

लाचारी

असहायतेच्या चाकोरीत

क्षना क्षनाला पीसलं जानं

तृतीय श्रेनी

लोअर मिडल क्लास

पगारावलेलं

महीनावलेलं जीवन..’

एका मध्यमवर्गीय पौगंडावस्थेतील मुलाचे लैंगिकता व लैंगिक सुख याविषयीचे विचार ‘फेज’ या कवितेत प्रकट होतात. लोकमान्य साहित्य रचनेचा साचा आणि भाषेचे व्यवहार यांना छेद देण्याची कवीची भूमिका ‘लाइफिक्स’ आणि ‘नाळ अडकून मेटामॉफरेसिस’ या कवितांमध्ये आशयानुरूप व्यक्त होते –

‘जीवन मृत्यू

आणि पोयेटिक्स्

 

यमकनस्लेल्या

असू शकतात

कविता छान..

 

बारकूनाना म्हणूनच तर हो

स्वादीष्ट संदिग्धता संगा संगे

म्हायत नाय फुढं कसय

तरच लाइफ मस्का हाय

ऱ्हाइमलेस्स्ट्रक्चरलेस्परफेक्ट साहित्य

मज्जाच मज्जा’

या कवितेत महाविद्यालयीन शैक्षणिक चर्चाही घडते. ‘वुड्बी लेक्चररचे कन्फेशन’, ‘मूलभूत क्वेश्चन मार्क’, ‘आणि आम्ही’, ‘विस्तृत समरी आणि विद्यापीठ’ या कवितांमधून विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या इझम्सवर होणारी चर्चा, उच्चशिक्षण आणि समाजात वावरताना आवश्यक व्यवहारज्ञान यांच्यातील तफावत, हे मुद्दे वाचकांसमोर येतात.

‘अथेति’ या काव्यसंग्रहातील कविता पुढील कारणांमुळे वाचनीय ठरते –

कवितांचा आशय दृश्यमान प्रतिमांच्या माध्यमातून व्यक्त होतो. या प्रतिमांची रचना चित्रपटामध्ये पटापट पुढे सरकत जाणाऱ्या चित्रांप्रमाणे वाचकांच्या ‘दृष्टी’ या ज्ञानेंद्रीयाला आवाहन करते. निवेदकाच्या वैचारिक भूमिकेतून आलेले विविध घटनांचे चिंतन वाचकालाही विचार करण्यास भाग पाडते. प्रमाणभाषा, व्याकरण आणि शुद्धलेखनाची मोड-तोड काव्यसंग्रहातील भाषेला आणि एकूणच या साहित्याला ‘लघु-साहित्य’ (Minor Literature) या साहित्यप्रकाराकडे घेऊन जाते. लघु-साहित्य हे भाषेच्या आणि साहित्याच्या राजकारणाला नवीन आयाम देते. त्यामुळेच महेशलिलापंडित यांची ही कविता आणि भविष्यातील लेखन साहित्यक्षेत्रात नवीन संवेदना जागृत करण्यात यशस्वी होईल, अशी आशा करण्यास जागा आहे.

‘अथेति’- महेशलिलापंडित,

पार पब्लिकेशन,

पृष्ठे- ११८, मूल्य- १६० रुपये.