20 September 2020

News Flash

फॅशनेबल स्टार्टअप

स्वत:ची आवड आणि कल समजून उद्यमशीलतेला चालना देणं आजच्या पिढीला महत्त्वाचं वाटतं

ठरावीक साच्याच्या नोकरीत अडकून क्रिएटिव्हिटी दाबून टाकण्याऐवजी स्वत:चं काही सुरू करण्याची इच्छा अनेक तरुणी बाळगून असतात. इंजिनीअर झाल्यानंतर आयटी कंपनीमधला लठ्ठ पगाराचा जॉब सोडून आपली आवड जपण्यासाठी त्याचंच उद्योगात रूपांतर करणाऱ्या मात्र अगदी थोडय़ा. जबलपूरच्या काळे भगिनी त्यापैकीच. त्यांच्या ऑनलाइन फॅशन स्टार्टअपविषयी..
नवउद्योग अर्थात स्टार्टअप्स हार्डवेअरपासून सॉफ्टवेअपर्यंत, बेकरी प्रॉडक्ट्स ते हर्बल प्रॉडक्ट्स, हॉटेल इंडस्ट्री ते मॅन्युफॅक्चिरग इंडस्ट्री आणि टिपिकल बिझनेस ते फॅशन वेबसाइट्सपर्यंत कशाचेही असू शकतात. स्वत:ची आवड आणि कल समजून उद्यमशीलतेला चालना देणं आजच्या पिढीला महत्त्वाचं वाटतं. जबलपूरच्या काळे सिस्टर्सचंदेखील काही वेगळं नाही. निकिता काळे आणि अमृता काळे या दोघी बहिणी शाळा-कॉलेजमध्ये चांगले मार्क्‍स मिळवून इंजिनीअर झालेल्या. एक टेक मिहद्रा आणि दुसरी टी.सी.एस. यांसारख्या मोठय़ा कंपनीत मस्त जॉब मिळवलेल्या. मोठी कंपनी, मोठा पगार असं सगळं छान सुरू असताना त्यांची पॅशन, मुळापासूनची आवड आणि उद्यमशीलतेची भावना त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. दोघींनाही सुरुवातीपासूनच आपले कपडे स्वत: डिझाइन करण्याची आवड होती. फॅशनची आवड आणि मार्केटचा अभ्यास या दोन्हींतून जन्म झाला ‘मेहरोबा’ या ऑनलाइन फॅशन ब्रॅण्डचा. दोघींनी मिळून ‘मेहरोबा’ ही ऑनलाइन वेबसाइट लाँच केली. स्वत: डिझाइन केलेले ट्रेण्डी आणि फॅशनेबल कपडे रिझनेबल दरात लोकांपर्यंत पोहचावेत हे त्यांचं स्वप्न होतं. त्यांच्या या स्टार्ट अपनं आता चांगलं बाळसं धरलं आहे.
हातातली चांगली नोकरी सोडून अशा नव्या उद्योगात उतरणं आणि तेही कुठलीही कौटुंबिक पाश्र्वभूमी नसताना, हे कसं शक्य झालं असं विचारल्यावर काळे सिस्टर्स म्हणाल्या, ‘फॅशन डिझायनिंगची आवड पहिल्यापासून होती. मोठय़ा कंपनीमध्ये नोकरी केल्यामुळे उद्योग सुरू करण्यासाठी लागणारा कॉर्पोरेट एक्सपिरिअन्स मिळाला आणि मग या दोन्हींची सांगड घातली. बाबांचा बिझनेस लहानपणापासून बघत असल्यामुळे कॉन्फिडन्स मिळाला.’ ‘मेहरोबा’बद्दल बोलताना अमृता सांगते, ‘आमचा हा स्टार्ट अप म्हणजे आमचं बाळ आहे. इट्स लाइक बीइंग अ पेरेंट, वॉचिंग द चाइल्ड ग्रोइंग सक्सेसफुल. आज मेहरोबा बहुतेक भारतभर पोचलंय आणि आम्हाला काही देशाबाहेरचे क्लाएंटदेखील मिळाले आहेत. हा असा स्वतचा बिझनेस वाढवण्यासारखा आनंद कुठल्याही नोकरीत मिळणार नाही.’ काळे भगिनींचा मेहरोबा हा ब्रॅण्ड म्हणजे फॅशन कॉन्शस तरुणाईसाठीचा एथनिक ब्रॅण्ड आहे. ‘मेहेरोबाचा अर्थ ‘इनर ब्यूटी ऑफ वुमेन’ आणि या अर्थाला साजेसं एथनिक वेअरचं कलेक्शन द्यायचा आमचा प्रयत्न असतो,’ निकिता काळे यांनी सांगितले. निकिता आणि अमृताने ‘मेहरोबा’ची सुरुवात विविध मॉल्स आणि हॉटेल्समध्ये लावलेल्या प्रदर्शनांमधून केली. तिथे त्यांच्या क्रिएटिव्हिटीला पावती मिळाली, प्रशंसा झाली आणि ग्राहकही मिळाले. या छोटय़ा क्लाएंट बेसवर ‘मेहरोबा’चं काम सुरू झालं. त्यानंतर मेहरोबाचे दर महिन्याला कॅटलॉग्स येऊ लागले आणि हळूहळू ऑनलाइन बिझनेसमध्ये त्यांनी पाय रोवले. आज मेहरोबा ब्रॅण्ड इबे, फ्लिपकार्ट, शॉप क्लूज अशा टॉपच्या ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट्सवर उपलब्ध आहे आणि जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून, आपल्याला हवे तसे एथनिक वेअर बनवून देण्याचं प्रॉमिस देत आहेत.
मेहरोबाचं महत्त्व ‘कॉन्सेप्ट डिझायनिंग’मध्ये आहे, असं अमृता सांगते. भारतीय पारंपरिक संकल्पना आधुनिक पद्धतीच्या फॅशनमध्ये उतरवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. साध्या पण आधुनिक म्हणजेच इंडिजीनियस वेस्टर्न वेअरचं डिझायनिंग आम्ही करतो, असं ती सांगते. ‘मेहरोबा’ला नुकतंच एका इंडस्ट्री-इन्स्टिटय़ूट पार्टनरशिप समिटमध्ये पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. ‘अशा प्रकारे रेकग्निशन मिळालं की बरं वाटतं. आपण लावलेल्या या छोटय़ा रोपाचं हळूहळू झाड होत आहे, असं जाणवतं. खूप भारी असते ही भावना..’ अमृता भरभरून बोलते.
सकाळी ९ ते ५ च्या साचेबद्ध नोकरीऐवजी आपल्या आवडीचा व्यवसाय करणाऱ्या काळे भगिनी आजच्या सर्जनशील तरुण पिढीच्या प्रतिनिधी आहेत. ‘नोकरी शोधण्याऐवजी इतरांना रोजगार देण्याचं काम करावं, हा विचार आम्ही केलाच, शिवाय या स्टार्ट अपमुळे स्वत:ची एक आयडेंटिटी निर्माण करण्याची संधीदेखील मिळाली’, असं त्या सांगतात, तेव्हा स्टार्ट अप इंडियाचं भविष्य उज्ज्वल असल्याचं जाणवतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2016 1:30 am

Web Title: startup business special articles in viva loksatta 2
Next Stories
1 जीवन त्यांना कळले हो..
2 चलती का नाम ट्रेण्ड
3 झोपेचं माहात्म्य
Just Now!
X