20 October 2020

News Flash

५२५ रुपयात BSNL देणार ८० जीबी डेटा

विशेष म्हणजे या प्लॅनबरोबरच कंपनी अॅमेझॉन प्राईमचे सबस्क्रीप्शन मोफत देणार आहे.

सरकारी कंपनी असलेल्या बीएसएनएलने खासगी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी अनोखा प्लॅन जाहीर केला आहे. सणवार आले किंवा आणखी काही विशेष असेल की कंपन्या ग्राहकांना वेगवेगळ्या ऑफर्स देऊन आकर्षित करतात. BSNL ने नुकताच आपला एक खास प्लॅन जाहीर केला असून सणाच्या काळात ग्राहकांना खुश करण्याचे कंपनीने ठरवले आहे. रिलायन्स जिओने बाजारात प्रवेश केल्यापासून अनेक कंपन्यांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळेच मागच्या काही काळापासून कंपन्या आपले नवनवीन प्लॅन्स बाजारात दाखल करत आहेत. नवरात्री आणि दिवाळीच्या मुहूर्तावर कंपनीने आपला एक खास प्लॅन जाहीर केला आहे. ५२५ रुपयात कंपनी आपल्या ग्राहकांना ८० जीबी डेटा देणार आहे. हा पोस्टपेड प्लॅन असला तरीही शिल्लक राहीलेला इंटरनेट डेटा पुढच्या महिन्यातही वापरता येणार आहे. एकूण २०० जीबीपर्यंतचा डेटा पुढील महिन्यात वापरण्याची सुविधा यामध्ये देण्यात आली आहे.

या प्लॅनमध्ये मोफत कॉलिंगबरोबरच रोज १०० मेसेज मोफत दिले जाणार आहेत. याबरोबरच १०० नॅशनल मेसेजही मोफत मिळणार आहेत. तसेच २ जी आणि ३ जी युजर्ससाठी हा प्लॅन देण्यात आला असल्याचेही कंपनीने सांगितले आहे. विशेष म्हणजे या प्लॅनबरोबरच कंपनी अॅमेझॉन प्राईमचे सबस्क्रीप्शन मोफत देणार आहे. हा प्लॅन दिल्ली आणि मुंबईसह देशातील सर्वठिकाणी लागू असेल असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता ग्राहकांना जास्त इंटरनेटची आवश्यकता असल्यास या प्लॅनचा विचार करता येणार आहे. आयडीया, एअरटेल यांसारख्या कंपन्यांच्या पोस्टपेड प्लॅनला BSNL चा हा प्लॅन नक्कीच टक्कर देईल.

काही दिवसांपूर्वीच कंपनीने १८ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने खास ऑफर जाहीर केली होती. याअंतर्गत कंपनीने चार नवे प्लॅन्स जाहीर केले. STV 18, STV 601, STV 1201, STV 1801 अशी या प्लॅन्सची नावे होती. १ ऑक्टोबरपासून लागू झालेले हे प्लॅन्स १८ ऑक्टोबरपर्यंत लागू असतील असे सांगण्यात आले होते. १८ रुपयांच्या प्लॅनची व्हॅलिडीटी २ दिवसांची आहे. यामध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, व्हिडियो कॉलिंग, इंटरनेट डेटा मिळणार आहे. त्याशिवाय ६०१, १२०१, १८०१ रुपयांच्या प्लॅनमध्ये १८ टक्के जास्त डेटा दिला जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 11, 2018 3:19 pm

Web Title: bsnl new offer 80 gb data and unlimited calling in rs 525 know full offer
Next Stories
1 लोकसत्ताच्या बातम्या व्हॉट्स अॅपवर
2 खुशखबर ! आता BSNL देणार ‘ही’ सुविधा
3 आई राजा उदो-उदोच्या जयघोषात तुळजाभवानी मंदिरात घटस्थापना
Just Now!
X