News Flash

उद्या लाँच होणार ‘मेड इन इंडिया’ FAU-G गेम, जाणून घ्या काय आहे खासियत

लाँचिंगआधीच प्री-रजिस्ट्रेशनचा आकडा 40 लाखांपार

भारतातील गेमप्रेमींची मेड इन इंडिया मल्टी-प्लेयर मोबाइल गेम FAU-G (Fearless and United Guards) ची प्रतीक्षा अखेर उद्या अर्थात 26 जानेवारी रोजी  संपणार आहे. लोकप्रिय ऑनलाइन बॅटल रॉयल गेम PUBG ला पर्याय असलेला FAU-G गेम उद्या लाँच होणार आहे. भारतीय युजर्समध्ये हा गेम लाँचिंगआधीच लोकप्रिय ठरतोय. कारण लाँचिंगआधीच या गेमने 40 लाखांहून जास्त प्री-रजिस्ट्रेशनचा आकडा पार केला आहे.

लाँच होण्याआधीच FAU-G ला युजर्सचा तुफान प्रतिसाद मिळतोय. गुगल प्ले स्टोअरवर FAU-G गेमसाठी प्री रजिस्टर करणाऱ्यांचा आकडा 40 लाखांपेक्षा जास्त झाल्याचं nCore गेम्सकडून सांगण्यात आलं आहे. यापूर्वी हा गेम भारतात डिसेंबरमध्येच लाँच केला जाईल अशी शक्यता वर्तवली जात होती. पण आता 26 जानेवारी रोजी हा गेम लाँच होणार असल्याचं स्पष्ट झालंय. गेमसाठी प्ले-स्टोअरवर प्री-रजिस्ट्रेशन करता येईल. गेमप्रेमी www.ncoregames.com. या वेबसाइटवर जाऊन गेमबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ शकतात. प्री-रजिस्टर करणाऱ्या प्लेयर्सना गेम लाँच होताच पुश नोटिफिकेशन पाठवलं जाईल, त्यानंतर युजर्सना गेम डाउनलोड आणि इंस्टॉल करता येईल. या गेमची साइज किती असेल आणि व्हर्जन कोणतं असेल याबाबत अजून काहीही माहिती समोर आलेली नाही. मात्र प्ले-स्टोअरवरील लिस्टिंगद्वारे गेमच्या स्टोरीलाइन आणि गेम-प्लेबाबत थोडी माहिती देण्यात आली आहे. गेमच्या टीझरवनरुन हा गेम भारत-चीन सैन्यामध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षावर आधारित असेल हे समोर आलं होतं . पण, आता नव्या टिझरवरुन पूर्ण गेम-प्ले भारतीय सैन्याशीच निगडीत असेल असं दिसतं. गेममधील खेळाडूंना FAU-G कमांडो म्हटलं जाईल, धोकादायक क्षेत्रांमध्ये गस्त घालणाऱ्या सैनिकांची ही तुकडी असेल.

लोकप्रिय ऑनलाइन रॉयल बॅटल गेम पब्जीवर बंदी घातल्यामुळे गेमप्रेमी ‘फौजी’ची अनेक दिवसांपासून वाट बघत आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेता अक्षय कुमारने या गेमच्या लाँचिंगबाबत ट्विटरद्वारे माहिती दिली. “देशांतर्गत समस्या असो किंवा सीमेवरील समस्या हे देशाचे वीर नेहमीच रक्षणासाठी सज्ज असतात… ते आमचे निडर रक्षक आहे ते आमचे फौजी आहेत….”असं ट्विट अक्षयने या गेमच्या लाँचिंग तारखेबाबत माहिती देताना केलं होतं. यासोबतच गेमसाठी प्री-रजिस्टर लिंकदेखील त्याने शेअर केली. त्या लिंकवर जाऊन युजर्स गेमसाठी रजिस्टर करू शकतात.

हा गेम बेंगळुरूच्या nCore Games आणि बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने डेव्हलप केला आहे. गेमचा पहिला टीझर 25 ऑक्टोबर रोजी आला होता, त्याच महिन्यात गेम लाँच करण्यात येणार होता. पण त्यानंतर गेमची लाँचिंग पुढे ढकलल्यात आली. काही दिवसांमध्ये भारतात पुन्हा येऊ घातलेल्या PUBG Mobile India गेमसोबत FAU-G ची टक्कर असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 25, 2021 4:13 pm

Web Title: fau g set to launch on 26th january check all the details of the game sas 89
Next Stories
1 Whatsapp वर बदलणार चॅटिंगची मजा, येतंय नवीन Sticker Shortcut फिचर
2 Google चा मोठा निर्णय, ‘या’ अँड्रॉइड स्मार्टफोन्सवर नाही काम करणार व्हिडिओ कॉलिंग अ‍ॅप
3 Twitter वर पुन्हा सुरू झालं ‘ब्लू टिक व्हेरिफिकेशन’, तीन वर्षांनी झालं पुनरागमन; जाणून घ्या डिटेल्स
Just Now!
X