News Flash

6,000mAh बॅटरीसह लाँच झाला Gionee Max Pro; किंमत 7,000 पेक्षाही कमी

तब्बल 34 दिवसांचा स्टँडबाय बॅकअप, फेस अनलॉकसारखे शानदार फिचर्सही

टेक कंपनी Gionee ने आपला लेटेस्ट शानदार स्मार्टफोन Gionee Max Pro भारतात लाँच केलाय. या डिव्हाइसमध्ये मोठ्या स्क्रीनसह तब्बल 6,000mAh क्षमतेची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. याशिवाय फोनमध्ये एकूण तीन कॅमेरे आणि फेस अनलॉकसारखे शानदार फिचर्सही आहेत.

Gionee Max Pro चे स्पेसिफिकेशन्स :-
Gionee Max Pro स्मार्टफोनमध्ये 6.52 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. तसेच, यात Spreadtrum 9863A प्रोसेसर, 3GB रॅम आणि 32GB की इंटर्नल स्टोरेज मिळेल. माइक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 256GB पर्यंत वाढवता येणंही शक्य आहे. याशिवाय तब्बल 6,000mAh क्षमतेची दमदार बॅटरी फोनमध्ये देण्यात आली आहे. या बॅटरीमुळे 34 दिवसांचा स्टँडबाय, 115 तासांपर्यंत म्युझिक प्लेबॅक, 60 तासांपर्यंत कॉलिंग, 13 तासांपर्यंत सिनेमा आणि 12 तासांपर्यंत गेमिंग बॅकअप देते असा कंपनीचा दावा आहे. कंपनीने Gionee Max Pro मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप दिला असूवन यातील पहिला 13MP प्रायमरी सेन्सर आणि दुसरा 2 मेगापिक्सेल क्षमतेचा कॅमेरा मिळेल. तसेच, सेल्फीसाठी फोनमध्ये 8MP चा सेल्फी कॅमेराही आहे. तर, कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय, जीपीएस आणि युएसबी पोर्ट यांसारखे कनेक्टिव्हिटी फिचर्स मिळतील.

Gionee Max Pro ची किंमत :-
Gionee Max Pro स्मार्टफोनची किंमत 6 हजार 999 रुपये आहे. 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज असलेला हा फोन ब्लॅक, ब्लू आणि रेड अशा तीन रंगांच्या पर्यायात खरेदी करता येईल. तर, 8 मार्च रोजी दुपारी १२ वाजेपासूव ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वर या फोनसाठी पहिला सेल सुरू होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2021 2:43 pm

Web Title: gionee max pro with 6000mah battery 6 5 inch hd display launched in india check price specifications availability and more sas 89
Next Stories
1 सुंठ पावडरचं सेवन केल्यास ‘या’ आरोग्यविषयक तक्रारी होतील दूर!
2 गुणकारी लवंग खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का?
3 EXCLUSIVE: ‘मराठी लोकांचा नक्कीच चांगला प्रतिसाद मिळेल’; पाहा Koo App च्या संस्थापकांशी खास गप्पा
Just Now!
X