गुगल आपली म्युझिक सेवा Google Play Music लवकरच बंद करण्याच्या तयारीत आहे. गुगलकडून याबाबत युजर्सना ई-मेलद्वारे माहिती दिली जात आहे. 24 फेब्रुवारी 2021 रोजी Google Play Music वरील सर्व डेटा डिलिट केला जाईल, असं कंपनीकडून पाठवण्यात आलेल्या ई-मेलमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.

9to5Google च्या रिपोर्टनुसार, कंपनीकडून युजर्सना आपला सर्व डेटा युट्यूब म्युझिकवर YouTube Music ट्रान्सफर करण्याचा पर्याय देत आहे. एकदा डेटा डिलिट झाल्यानंतर पुन्हा तो डेटा रिकव्हर करता येणार नाही. त्यामुळे जर तुम्ही Google Play Music अ‍ॅपचा वापर करत असाल तर तुमच्याकडे अजून काही दिवस शिल्लक आहेत. तुम्ही Google Play Music अ‍ॅपचा डेटा डाउनलोड करु शकतात किंवा दुसऱ्या अ‍ॅपमध्ये ट्रांसफर करु शकतात.
Google Play Music चा डेटा ट्रान्सफर करण्यासाठी तुम्ही मोबाइल अ‍ॅप किंवा music.google.com वर जाऊ शकतात. तिथे डेटा ट्रान्सफर करण्यासाठी Transfer to YouTube असा पर्याय मिळेल.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येच कंपनीने Google Play Music अ‍ॅप बंद करण्याचं काम सुरू केलं होतं. डिसेंबरमध्ये अ‍ॅप बंद करण्यात आलं, त्यानंतर आता अ‍ॅपवरील सर्व डेटाही पूर्णपणे हटवलं जात आहे.