इन्स्टाग्राम हे जगभरात वापरले जाणारे अॅप्लिकेशन आहे, हे अॅप भारतातही कमी काळात तितकंच प्रसिद्ध झालं. सध्या सर्वच वयोगटातील लोकांमध्ये या सोशल मीडिया अॅप्लिकेशनचा मोठ्या प्रमाणात वापर होताना दिसतो. त्यामुळे आपल्या युजर्सना जास्तीत जास्त सुविधा देण्याच्या दृष्टीने ही अॅप्लिकेशन्स पुढाकार घेताना दिसतात. आपल्या प्रतिस्पर्धी अॅप्सना टक्कर देण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून इन्स्टाग्रामनेही काही मह्त्त्वाचे बदल केले आहेत. आपलं अॅप अधिक युजर फ्रेंडली होण्यासाठी तसेच युजर्सना काहीतरी नवं देण्यासाठी इन्स्टाग्राम प्रयत्न करत आहे.

नुकताच इन्स्टाग्रामने आपल्या फिचर्समध्ये एक महत्त्वाचा बदल करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार एखादी पोस्ट करताना तुम्ही विशिष्ट कॅटगरीची निवड करु शकता. सध्या इन्स्टावर असणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींच्या कलेक्शनला कोणताही योग्य पॅटर्न नाही. फोटग्राफी, ट्रव्हल, सेलिब्रेटीज, फॅशन अशा कोणत्याही ठराविक कॅटेगरीज सध्या नाहीत. त्यामुळे युजर्सच्या आवडीनिवडीचा विचार न करता अनेक गोष्टी कशाही दिसतात. मात्र आता या नवीन फिचरमुळे अॅप्लिकेशन अधिक ऑर्गनाईज दिसण्यास मदत होईल. याबाबतची पोस्ट फेसबुकने प्रसिद्ध केली आहे. याशिवाय हॅशटॅगचा वापर करुन विशिष्ट गोष्टीची तुम्ही कॅटगरीनुसार निवड करता येईल. यामध्ये हॅशटॅग नसलेलीही एक कॅटगरी असेल. कॅटगरी सिलेक्ट करण्यासाठी युजर्सला उजवीकडील किंवा डावीकडील टॅब स्विप करावी लागेल. त्यावरील सर्व कॅटेगरी अतिशय ऑर्गनाईज असतील. इंस्टा अत्यंत पर्सनलाईज, युजर फ्रेंडली करण्यासाठी फेसबुकने हे पाऊल उचलले आहे.

काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामने आणखी एक नवीन फिचर लाँच करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार व्हॉट्सअॅपप्रमाणे आता इंस्टाग्रामवरही तुमचे लास्ट सीन दिसू शकणार होते. फिचर लाँच व्हायला वेळ असून त्याच्या डेव्हलपिंगचे काम सुरु असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले होते. याबरोबरच इन्स्टाच्या फोटोचा किंवा पोस्टचा स्क्रीनशॉट काढणाऱ्यांचेही आता रेकॉर्ड ठेवले जाणार आहे. त्यामुळे तुम्ही कोणाच्या फोटोंचे स्क्रीनशॉट घेत असाल तर ते तुमच्या अंगाशी येण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे इन्स्टाग्राम व्हॉइस आणि व्हिडिओ कॉलिंगचे फीचरदेखील आणणार आहे. याचीही चाचणी सुरू आहे. या फीचरमुळे युजरना व्हॉट्स अॅपप्रमाणे व्हिडिओ आणि वॉइस कॉलिंग करता येणार आहे.