16 January 2021

News Flash

6GB रॅम असलेला भारतातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन झाला लाँच, किंमत फक्त 10 हजार 999 रुपये

Poco ने लाँच केला 'बजेट' सेगमेंटमध्ये जबरदस्त स्मार्टफोन...

‘पोको इंडिया’ने भारतात आपला नवीन स्मार्टफोन Poco M2 लाँच केला आहे. बजेट सेगमेंटमध्ये कंपनीने हा फोन आणला असून याची बेसिक किंमत 10 हजार 999 रुपये आहे. Poco M2 फोनमध्ये फोनमध्ये मीडियाटेक Helio G80 प्रोसेसर, चार रिअर कॅमेऱ्यांचा सेटअप आणि मोठी बॅटरी आहे. हा फोन 6जीबी रॅम आणि वॉटरड्रॉप स्टाइल नॉचसोबत येतो. नवीन पोको फोन ब्रिक रेड, स्लेट ब्लू आणि पिच ब्लॅक अशा तीन रंगात खरेदीसाठी उपलब्ध असेल. कंपनी या फोनसोबत स्क्रीन प्रोटेक्टर मोफत देत आहे. हा फोन कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त पोको स्मार्टफोन ठरला आहे. जुलै महिन्यात कंपनीने लाँच केलेल्या Poco M2 Pro स्मार्टफोनपेक्षाही याची किंमत कमी आहे. यासोबतच 6GB रॅम असलेला भारतातील सर्वात स्वस्त स्मार्टफोनही ठरला आहे.

स्पेसिफिकेशन्स? :-
अँड्रॉइड 10 बेस्ड MIUI वर कार्यरत असलेल्या Poco M2 या फोनसाठी लवकरच MIUI 12 अपडेट जारी केलं जाणार आहे, अशी माहिती कंपनीने लाँचिंग इव्हेंटमध्ये दिली. कंपनीने यापूर्वी जारी केलेल्या टीझरनुसार या फोनमध्ये फुल एचडी+ डिस्प्ले आहे. स्क्रीन प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 देण्यात आला आहे. फोनमध्ये 2.0 गीगाहर्ट्झ मीडियाटेक हीलियो G80 प्रोसेसर असून ग्राफिक्ससाठी ARM माली-G52 जीपीयू आहे. फोनमध्ये 6 जीबी रॅम असून इनबिल्ट स्टोरेज माइक्रोएसडी कार्डद्वारे 512 जीबीपर्यंत वाढवता येणं शक्य आहे. याशिवाय फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 5000mAh क्षमतेची दमदार बॅटरी या फोनमध्ये आहे. या नवीन पोको फोनमध्ये फोटोग्राफीसाठी चार कॅमेऱ्यांचा सेटअप असून यात 13 मेगापिक्सेलचा प्रायमरी, 8 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल, 5 मेगापिक्सेल मॅक्रो आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर आहे. तर, फोनमध्ये सेल्फीसाठी 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. कॅमेऱ्यासाठी AI डिटेक्शन फीचरही मिळेल. याशिवाय कनेक्टिव्हिटीसाठी पोकोच्या या नवीन स्मार्टफोनमध्ये आयआर ब्लास्टर, ड्युअल माइक्रोफोन्स, ब्लुटूथ 5.0, 3.5 एमएम ऑडिओ जॅक आणि अल्ट्रा-लीनियर स्पीकर यांसारखे फीचर्स मिळतील. फोनच्या मागील बाजूला अँटी फिंगरप्रिंट पॅटर्न असून हा फोन P2i कोटिंगसोबत येतो, म्हणजे स्प्लॅश आणि रस्ट प्रोटेक्शन फोनमध्ये मिळेल.

किंमत :-
नवीन Poco M2 हा स्मार्टफोन 15 सप्टेंबरपासून ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवरुन खरेदी करता येईल. कंपनीने हा फोन दोन व्हेरिअंटमध्ये आणला आहे. 6 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेज आणि 6 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज अशा दोन व्हेरिअंटमध्ये हा फोन उपलब्ध असेल. दोन्ही व्हेरिअंटची किंमत अनुक्रमे 10 हजार 999 रुपये आणि 12 हजार 499 रुपये इतकी आहे. आयसीआयसीआय बँक आणि फेडरल बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे पोको एम2 खरेदी केल्यास 750 रुपये इंस्टेंट डिस्काउंटची ऑफरही ग्राहकांना मिळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2020 2:26 pm

Web Title: poco m2 launched as most affordable 6gb ram smartphone in india at rs 10999 check details sas 89
Next Stories
1 स्वस्त झाले ‘रिअलमी’चे दोन स्मार्टफोन, Realme 6 आणि Reame 6i च्या किंमतीत झाली कपात
2 लालबुंद टोमॅटो खाण्याचे ‘हे’ ७ फायदे नक्की जाणून घ्या; दृष्टीदोषावरही आहे गुणकारी
3 11,999 रुपयांत जबरदस्त फीचर्सचा स्मार्टफोन, 48MP क्वॉड कॅमेरा सेटअप + 5000mAh बॅटरी; आज सेल
Just Now!
X