News Flash

कार्ड पेमेंटची पद्धत बदलणार, RBI ने टोकनायझेशनचे केले नियम जारी

आरबीआयने टोकनायझेशन नियम पेमेंटशी संबंधित नियम जारी केले आहेत.

online card usage
पेमेंटसाठी टोकन प्रणाली लागू केली जाईल (इंडियन एक्सप्रेस, प्रातिनिधिक फोटो)

१ जानेवारी २०२२ पासून, कार्ड पेमेंट करण्याची पद्धत बदलणार आहे. होय… रिझर्व्ह बँकेने (RBI) पेमेंटशी संबंधित टोकनायझेशनचे नियम जारी केले आहेत (RBI tokenization rules). म्हणजेच आता पेमेंटसाठी टोकन प्रणाली लागू केली जाईल. वास्तविक, आरबीआयने डेटा स्टोरेजशी संबंधित टोकनसाठी नियम जारी केले आहेत.१ जानेवारी, २०२२ पासून, कार्ड जारी करणारी बँक किंवा कार्ड नेटवर्क/कार्ड पेमेंटमध्ये कार्ड नेटवर्क व्यतिरिक्त इतर कोणाकडूनही वास्तविक कार्ड डेटा स्टोरेज केले जाणार नाही. यामध्ये कार्डधारकाच्या डेटाच्या गोपनीयतेवर विशेष तरतूद करण्यात आली आहे.

ग्राहकांच्या इच्छेवर अवलंबून असेल

RBI च्या टोकनायझेशन, पेमेंट एग्रीगेटर, व्यापाऱ्यांना डिसेंबर २०२१ नंतर ग्राहक कार्ड डेटा गोळा करण्याची परवानगी नाही. तसेच टोकन प्रणाली अंतर्गत प्रत्येक व्यवहारासाठी कार्ड तपशील इनपुट करण्याची आवश्यकता राहणार नाही. टोकन व्यवस्था ग्राहकांच्या इच्छेवर अवलंबून असेल, ते घेण्यासाठी त्यांच्यावर कोणताही दबाव आणता येणार नाही. या व्यतिरिक्त, कोणत्याही बँक किंवा कार्ड जारी करणाऱ्या कंपन्यांकडून याची सक्ती केली जाणार नाही.

हे नियमही लागू होतील

टोकनची ही व्यवस्था मोबाईल, लॅपटॉप, डेस्कटॉप आणि स्मार्ट वॉचसह पेमेंटवर देखील लागू होईल. ही सर्विस प्रोवाइडरद्वारे जारी केले जातील. टोकनच्या स्वरूपात कार्ड डेटा जारी करण्याची सुविधा त्याच टोकन सेवा प्रदात्याकडे असेल. तथापि, ते ग्राहकांच्या संमतीवर अवलंबून असेल.

कार्ड पेमेंट सिस्टम अशी आहे?

१ जानेवारी २०२२ पासून, तुम्हाला तुमच्या कार्डचा तपशील कोणत्याही थर्ड पार्टी अॅपसह शेअर करावा लागणार नाही. आत्ता तसे नाही, जर तुम्ही झोमॅटोमधून अन्न मागवले किंवा ओला बुक केले, तर तुम्हाला कार्डचा तपशील द्यावा लागेल आणि इथे ग्राहकाच्या कार्डची संपूर्ण माहिती जतन केली जाईल. जिथे फसवणुकीचा धोका असतो. तथापि, टोकनायझेशन प्रणालीद्वारे हे होणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2021 1:48 pm

Web Title: rbi shared guidelines on tokenisation of card transactions ttg 97
Next Stories
1 आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस २०२१: जाणून घ्या इतिहास आणि उद्देश
2 तरुणांनो, हृदय जपा!
3 बालकांचे कोमेजणे
Just Now!
X