News Flash

‘या’ अॅपव्दारे करा सर्व व्यवहार एकाच ठिकाणी

शासनाच्या उमंग अॅपचे अनेक फायदे

शासनाने गेल्या काही काळात डिजिटल प्लॅटफॉर्मवर अनेक ग्राहक-केंद्रित सेवा सुरू केल्या आहेत. या सेवांचा उद्देश्य लोकहित असून त्याच वेळी देशाचे अर्थकारण डिजिटल करणे सुद्धा आहे. यूनिफाइड मोबाइल उमंग अॅप्लीकेशन (उमंग – UMANG) हा भारत शासनाचा असाच एक प्रयत्न आहे ज्यात आाधार, डिजीलॉकर यांसारख्या सेवा एकत्रितपणे दिल्या गेल्या आहेत. विशेष म्हणजे एका गोष्टीसाठी एक अॅप्लिकेशन असे करावे न लागता या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला अनेक सेवा एकत्रितपणे करता येतात.

उमंगचे फायदे

उमंग अॅप तुम्हाला आधार, ईपीएफ, आयटीआर फाइलिंग, पॅन अर्ज, डिजीलॉकर सुविधा, एनपीएस, गॅस बुकिंग, ड्रायव्हिंग लायसंस सेवा, पासपोर्ट सेवा, पेंशनसंबंधी सेवा आणि इतर अनेकविध सेवा एकाच प्लॅटफॉर्मवर आणून देते. यामुळे तुमचा वेळ वाचेल, सर्व केंद्रीय, राज्य आणि स्थानिक सेवांचा उपयोग सुलभ होईल आणि सर्व प्रक्रिया पारदर्शी होतील. तुम्हाला तक्रार नोंदवायची असल्यास या अॅपद्वारे तुम्ही ग्राहक सेवेवर थेट तक्रार नोंदवू शकता आणि येथे लाइव्ह चॅटसुद्धा उपलब्ध आहे. याने दस्तऐवज दाखल करणे सोपे होते कारण रेकॉर्ड्स एकाच ठिकाणी ऑनलाइन अॅक्सेस करता येतात.

उमंग अॅपद्वारे यूनिव्हर्सल अकाउंट नंबर (यूएएन) आणि तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर आलेला ओटीपी टाकून ईपीएफ खातेसुद्धा पाहाता येते. या अॅपद्वारे तुमचे मिळकत कर रिटर्न फायलिंगसुद्धा सोपे होते. तुम्ही पेंशन पोर्टलवर लॉग इन करून तुमची पेंशन आणि ग्रॅच्युइटीसुद्धा पाहू शकता. उमंग अॅप प्रधान मंत्री आवास योजना राबवून सर्वांसाठी घर हे शासकीय मिशन पूर्ण करण्यातसुद्धा हातभार लावीत आहे. या अॅपद्वारे पीएमएव्हायचे तपशील – अर्जाची सद्यःस्थिती, सबसिडी इत्यादीची माहिती मिळू शकते.

उमंग अॅपमध्ये भारत बिल पे सेवा उपलब्ध आहे. याने तुम्ही वीज बिल, फोन बिल भरू शकता किंवा फोन किंवा डीटीएच रिचार्ज करू शकता. ही अॅप वस्तू आणि सेवा कर नेटवर्कशी (जीएसटीएन) जोडलेली असल्यामुळे करदात्याची सत्यता लगेच तपासली जाऊ शकते.
याशिवाय ही अॅप तुम्हाला सरकारी सेवांमधील मध्यस्थांकडून होणाऱ्या त्रासापासून वाचवते आणि तुम्ही याद्वारे तुमची महत्वाचीआर्थिक कागदपत्रे सहज पाहू शकता.

आदिल शेट्टी,

सीईओ, बँकबझार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2017 2:27 pm

Web Title: umang application useful for all transactions and money management
Next Stories
1 नवीन वर्षात सॅमसंगचा ‘गॅलॅक्सी A 8’ आणि ‘गॅलॅक्सी A 8 +’ होणार बाजारपेठेत दाखल
2 न्याहरीमध्ये ‘हे’ पदार्थ नक्की खा
3 सेल्फी काढणे हा विकार असल्याचे निष्पन्न
Just Now!
X