News Flash

सेंड करण्याआधी ऐकता येणार व्हॉइस मेसेज, WhatsApp मध्ये येतंय नवीन फिचर

अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्मसाठी येणार शानदार फिचर

लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp वर लवकरच एक नवीन फिचर येणार आहे. WhatsApp कडून अनेक दिवसांपासून व्हॉइस मेसेजच्या प्लेबॅक स्पीड फिचरवर चाचणी सुरू आहे. जाणून घेऊया कसं काम करणार हे फिचर :

Voice Messages Playback Speed Feature या नवीन फिचरद्वारे युजरला कोणताही व्हॉइस मेसेज वेगाने किंवा हळू स्पीडने ऐकता येईल. या फीचरअंतर्गत युजर्स कोणत्याही व्हॉइस मेसेजसाठी तीन विविध स्पीड निवडू शकतो. यासाठी ऑडिओ प्लेबॅक स्पीड लेवल 1x, 1.5x आणि 2x असे तीन पर्याय मिळतील.

याशिवाय, कोणताही व्हॉइस मेसेज पाठवण्याआधी तो रिव्ह्यू करता येणार आहे. म्हणजेच व्हॉइस मेसेज सेंड करण्याआधी आता तो युजरला ऐकताही येणार आहे. आतापर्यंत व्हॉइस मेसेज रेकॉर्ड होताच आपोआप सेंड व्हायचा, पण आता सेंड करण्याआधी युजरला आपला मेसेज ऐकता येणार आहे. मात्र सध्या या फिचरवर टेस्टिंग सुरू आहे. टेस्टिंग पूर्ण झाल्यावर लवकरच कंपनीकडून अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्मसाठी हे फिचर रोलआउट केलं जाईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2021 1:18 pm

Web Title: whatsapp is adding a review tool for voice messages check details of new feature sas 89
Next Stories
1 Corona Vaccine सेंटरची माहिती आता Whatsapp वर मिळवा, ‘या’ नंबरवर करा फक्त एक मेसेज
2 महाग झाला ‘मेड इन इंडिया’ स्मार्टफोन Micromax In Note 1, कंपनीने वाढवली किंमत
3 मध्यरात्रीपासून Samsung Galaxy M42 5G ची विक्री सुरू, ‘मिडरेंज’ 5G स्मार्टफोनमध्ये शानदार फिचर्स
Just Now!
X