भारताने 59 चिनी अ‍ॅप्सना बॅन केले आहे. बॅन केलेल्या अ‍ॅप्समध्ये शॉर्ट व्हिडिओ मेकिंग अ‍ॅप टिकटॉकचाही समावेश आहे. अशातच आता YouTube टिकटॉकला पर्याय देण्याची तयारी करत असल्याचं वृत्त आहे. YouTube काही दिवसांपासून एका नव्या फीचरवर चाचणी घेत आहे. हे नवीन फीचर युट्यूब मोबाइल अ‍ॅपसाठी असेल, ज्यावर युजर्स TikTok प्रमाणे 15 सेकंदांचा छोटा व्हिडिओ बनवून अपलोड करु शकतील.

सध्या या फीचरची टेस्टिंग सुरू असून काही मोजक्याच युजर्ससाठी हे फीचर उपलब्ध आहे. टेस्टिंग संपल्यानंतर सर्व युजर्ससाठी हे फीचर रोलआउट केलं जाईल. युट्यूबकडून एका पोस्टद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. Alphabet च्या मालकीच्या कंपनीने आपल्या पोस्टमध्ये फीचरबाबत माहिती देताना, YouTube mobile app द्वारे क्रिएटर्स अनेक व्हिडिओ क्लिप रेकॉर्ड आणि अपलोड करु शकतात असं म्हटलं आहे. जर व्हिडिओ 15 सेकंदांपेक्षा कमी असेल तर तो रेकॉर्डिंगनंतर थेट अपलोड होईल. पण, जर व्हिडिओ क्लिप 15 सेकंदांपेक्षा मोठी असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ फोनच्या गॅलरीमधून अपलोड करावा लागेल. यापूर्वी “YouTube Shorts” नावाने एक नवीन फीचर कंपनी आणणार असल्याचं वृत्त एप्रिल महिन्यात आलं होतं.

(CamScanner, TikTok वरील बंदीचं ‘नो टेन्शन’, ही घ्या पर्यायी Apps ची लिस्ट)

सध्या हे नवीन फीचर काही ठराविक अँड्रॉइड आणि आयओएस युजर्ससाठी उपलब्ध आहे. तुमच्या फोनमध्ये हे फीचर उपलब्ध आहे की नाही हे बघण्यासाठी तुम्ही मोबाइल युट्यूब अ‍ॅपमध्ये जावून ‘create a video’ चा पर्याय दिसतोय की नाही हे चेक करु शकतात. याशिवाय फिल्टर, इफेक्ट्स, म्यूझिक यांसारखे फीचर्स यामध्ये आहेत की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. YouTube Stories आणि YouTube Reels च्या माध्यमातून युट्यूब आपल्या युजर्स आणि क्रिएटर्ससाठी शॉर्ट व्हिडिओ बनवण्याची सेवा आधीपासूनच आहे.