January Born Baby Names : प्रत्येक जण नवीन वर्षाची सुरूवात आनंदाने करू इच्छितो. नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात अनेकांच्या घरी बाळांचा जन्म होतो. जर जानेवारी महिन्यात तुमच्या घरी चिमुकल्यांचे आगमन झाले असेल तर तर तुम्ही बाळांचे हटके नाव ठेवू शकता.

आयान – नवीन वर्षाच्या पार्श्वभुमीवर जानेवारी महिन्यात जर मुलाने जन्म घेतला असेल तर तुम्ही त्याचे नाव आयान ठेवू शकता. आयान शब्दाचा अर्थ आहे सौभाग्य.

विवान – जानेवारीमध्ये जन्माला आलेल्या बाळाचे नाव तुम्ही हटके आणि मॉडर्न ठेवायचा विचार करत असाल तर विवान परफेक्ट नाव आहे. याचा अर्थ होतो ऊर्जा आणि प्रकाश.

हेही वाचा : Video : अकेला है मिस्टर खिलाडी मिस खिलाडी चाहिए! नवरी नवरदेवाने केला बॉलीवूड गाण्यावर भन्नाट डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल

अनिकेत – जर तुम्ही युनिक बरोबर मॉडर्न नाव ठेवत असाल तर अनिकेत नाव सुद्धा चांगला पर्याय आहे. हे भगवान शिवचे नाव आहे.

अविरल – सध्या अविरल नाव सुद्धा चांगलेच ट्रेंडमध्ये आहे. नवीन वर्षामध्ये जानेवारी महिन्यात जन्मलेल्या मुलाचे नाव तुम्ही अविरल ठेवू शकता. याचा अर्थ होतो कधीही न थांबणारा आणि अंतहीन

यश – यश या शब्दाचा अर्थ आहे प्रगती आणि प्रसिद्धी. नवीन वर्षामध्ये जानेवारी महिन्यात घरात आलेल्या मुलाचे नाव तुम्ही यश ठेवू शकता.

वेदांत – तुम्ही तुमच्या लाडक्या मुलाचे वेदांत नाव सुद्धा ठेवू शकता. याचा अर्थ होतो ज्ञानाचा अंत आणि सर्वोच्च ज्ञान

आरव – जो शांतता आणि सौम्यतेचे प्रतीक आहे त्याला आरव म्हणतात. नवीन वर्षी जन्माला आलेल्या मुलाचे नाव तुम्ही आरव ठेवू शकता.

हेही वाचा : बाईकस्वाराने भररस्त्यात ओलांडली क्रूरतेची मर्यादा! वृद्धाला स्कुटीला बांधत फरपटत नेलं अन्…; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

​आध्या – जर जानेवारी महिन्यात तुम्हाला गोंडस मुलगी झाली असेल तर तुम्ही तिचे नाव आध्या ठेवू शकता. या नावाचा अर्थ आहे पहिली शक्ती.

आहाना – जानेवारी महिन्यात जन्माला आलेल्या मुलीचे नाव आहाना ठेवू शकता. आहाना शब्दाचा अर्थ आहे उगवत्या सूर्याची पहिली किरण.

हिमानी – जानेवारी महिन्यात तुमच्या घरी गोंडस मुलीने जन्म घेतला असेल तर तुम्ही तिचे नाव हिमानी ठेवू शकता. या नावाचा अर्थ आहे दुर्गा देवी.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)