scorecardresearch

फक्त चवीलाच नाही, तर आरोग्यासाठीही अतिशय चांगली आहे चेरी; जाणून घ्या ‘हे’ पाच आरोग्यदायी फायदे

चेरीमध्ये भरपूर पोषक घटक असतात, म्हणूनच याचा समावेश आरोग्यदायी गोष्टींमध्ये केला जातो.

Health benefits of cherries
जाणून घेऊया चेरीचे आरोग्यदायी फायदे कोणते आहेत. (Photo : Pixabay)

साधारणपणे केकची सहूबह वाढवणाऱ्या चेरी आरोग्यासाठीही तितक्याच फायदेशीर असतात असे सांगितले तर तुमचाही विश्वास बसणार नाही. लाल रंगाची स्वादिष्ट चेरी कच्चीही खाता येते आणि याचा वापर केक, पेस्ट्री, आईस्क्रीम इत्यादींमध्येही केला जातो. यामध्ये भरपूर पोषक घटक असतात, म्हणूनच चेरीचा समावेश आरोग्यदायी गोष्टींमध्ये केला जातो. चेरीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात. आज आपण जाणून घेऊया चेरीचे आरोग्यदायी फायदे कोणते आहेत.

चेरीचे आरोग्याला होणारे फायदे

  • वजन कमी होणे

चेरी खाल्ल्याने वजन कमी होण्यासही मदत होते. त्यात कॅलरीज कमी असतात आणि जीवनसत्त्वे भरपूर असतात, ज्यामुळे चयापचय क्रिया मजबूत होते. चेरीमध्ये पाण्याचे प्रमाण चांगले असते, ज्यामुळे ते शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास देखील प्रभावी आहे.

Blood Sugar : वयाच्या ६० वर्षांनंतर रक्तातील साखरेचे प्रमाण किती असावे? जाणून घ्या वयोमानानुसार प्रमाण

  • अँटी-एजिंग गुणधर्म

चेरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट असतात जे त्वचेला निर्जीव बनवणारे मुक्त रॅडिकल्स काढून टाकतात. तसेच, यातील अँटी-एजिंग गुणधर्म त्वचेला दीर्घकाळ तरूण ठेवतात. जर उन्हामुळे त्वचेवर टॅनिंग होत असेल तर चेरीपासून पॅक बनवून तुम्ही त्वचेला लावू शकता. चेरी बारीक करून त्यात चिमूटभर हळद आणि एक चमचा मध मिसळून हा पॅक चेहऱ्यावर १० ते १५ मिनिटे ठेवल्याने फायदा होतो.

  • चांगली झोप मिळण्यास मदत करते

तुम्हाला रात्री शांतपणे झोप लागण्यात अडचणी येत असल्यास चेरी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. यामध्ये असलेले मेलाटोनिन चांगली झोप घेण्यास मदत करते. तसेच, हे झोपेचे चक्र देखील सुधारते.

तुम्हालाही छातीच्या उजव्या बाजूला वेदना जाणवतात का? यामागे असू शकते ‘हे’ कारण

  • रक्तदाबाचा त्रास कमी करते

पोटॅशियमचे चांगले प्रमाण असलेले हे फळ शरीरातील सोडियमची पातळी सामान्य करते, ज्यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते. चेरीमुळे शरीरातील पोटॅशियम आणि सोडियमचे प्रमाण संतुलित राहते.

  • केसांना चमक येते

चेरीमध्ये व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी देखील आढळते, जे केस तुटण्यास प्रतिबंध करतात. हे कोरड्या आणि निर्जीव दिसणार्‍या केसांना देखील चमक देते.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cherry is very good not only for taste but also for health learn these five health benefits pvp

ताज्या बातम्या