Dirty Mattress Cleaning Hacks : बेडशीट बदलल्याने तुमचा बेड पूर्णपणे स्वच्छ होतो असे आपल्याला वाटते, पण तसे नाही. तुम्ही बेडशीट जरी बदलली तरी गादीवर धूळ, घाणेरडे डाग तसेच असतात, ज्यामुळे तुम्ही आजारी पडू शकता. त्यामुळे रोज फक्त बेडशीट बदलून काही फायदा नाही, त्यावेळी गादीदेखील स्वच्छ करणे गरजेचे आहे. पण, गादी वजनाने जड असल्याने ती स्वच्छ करायची तरी कशी, असा प्रश्न पडतो. यामुळे आपण गादीवर डाग पडले तरी ते तात्पुरते साफ करून मोकळो होते. पाण्याने ओली झाली तर उन्हात ठेवतो. पण, यानंतरही गादीमध्ये धूळ, घाण तशीच असते. अशावेळी तुम्ही खालील पाच क्लिनिंग टिप्स वापरून गादी काही मिनिटांत स्वच्छ करू शकता.

गादीच्या नियमित वापरामुळे त्यावर धुळीचे कण, घाम आणि कधीकधी बुरशी आणि बॅक्टेरियादेखील जमा होऊ लागतात. या गोष्टींमुळे त्वचेला खाज सुटते आणि शिंकादेखील येतात. जर तुम्ही दर ४-५ महिन्यांनी गादी फिरवून वापरली किंवा उन्हात ठेवली तरी या समस्या निर्माण होतात.

गादी स्वच्छ करण्यासाठी सोप्या ४ सोप्या ट्रिक्स

१) गादी स्वच्छ करण्यासाठी ती आठवड्यातून दोन ते तीन वेळा जोरात झटका. दोन खुर्च्यांवर गादी ठेवा आणि काठीच्या साहाय्याने झोडपा. यामुळे गादीत जमा झालेली धूळ, घाण निघून जाईल. तसेच तुमची गादी जास्त घाण होण्यापासून रोखू शकता. दररोज गादी उचलून उन्हात ठेवणे हे एक कठीण काम आहे, अशावेळी गादी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही व्हॅक्यूम क्लिनरचा वापर करू शकता.

२) गादीवरील धूळ, घाण आणि ओलावा काढून टाकण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडा किंवा टॅल्कम पावडर वापरू शकता. यासाठी प्रथम बेडशीट काढा. आता गादी पूर्णपणे झाडून घ्या आणि त्यावर बेकिंग सोडा शिंपडा आणि ३० मिनिटे तसेच राहू द्या. नंतर स्वच्छ कापडाच्या मदतीने गादीवरील बेकिंग सोडा झटकून टाका.

३) महिन्यातून दोन ते तीन वेळा गादीला उन्हात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. अशाने गादीतील घाण, ओलावा कमी होतो, तसेच उन्हामुळे बॅक्टेरियादेखील मरण पावतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

४) जर घरात ऊन येत नसेल तर खोलीच्या खिडक्या उघडून ठेवा आणि पंखा चालू ठेवा, तुम्ही गादी हवेशीर ठिकाणी ठेवून त्यातील ओलावा आणि बॅक्टेरिया कमी करू शकता.