डोळे हा आपल्या शरीराचा अतिशय नाजूक भाग आहे. त्यामुळे त्याची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. डोळ्यात कचरा, धुळ गेल्यामुळे तसेच प्रखर ऊन डोळ्यातील जंतुसंसर्ग यामुळे प्रामुख्याने डोळ्यांना खाज येते. तसेच तासंतास मोबाइल व लॅपटॉपमध्ये असल्याने डोळ्यांना थकवा जाणवतो. तथापि खाज सुटण्याची अनेक कारणे असू शकतात. सामान्यत: डोळ्यांच्या समस्या कमी करण्यासाठी आपण डॉक्टरांनी सांगितलेल्या सल्ल्या नुसार औषधे आणि डोळ्यांमध्ये ड्रॉप टाकून बरे करू शकतात. पण त्याव्यतिरिक्त तुम्हाला असे काही घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही डोळ्यांचा थकवा आणि डोळ्यांची जळजळ यापासून आराम मिळवू शकता. चला तर मग जाणून घ्या…..
दुधाचा वापर करा
कापसाच्या साहाय्याने डोळ्याभोवती इतर कोणतेही मिश्रण न लावता थंड दूध लावा. थंड दूध तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. पण ते लावताना लक्षात ठेवा की दुधात काहीही मिसळू नका, अन्यथा डोळ्यात जळजळ होऊ शकते.
डोळ्यांवर पाणी शिंपडणे
डोळ्यांना खाज येणे सामान्य असून अनेकदा आपोआप बंद होते. पण खाज वाढल्यास डोळ्यांवर थंड पाण्याचा शिडकावा करावा. असे केल्याने तुम्हाला खाज येण्यापासून त्वरित आराम मिळू शकतो. यासोबतच डोळ्यांचा थकवाही दूर होतो.
गुलाबपाणी लावणे
भारतीय महिलांच्या सौंदर्य उत्पादनांमध्ये गुलाबपाणीला सर्वात महत्त्वाचे स्थान आहे. गुलाबपाणी त्वचेसोबतच डोळ्यांसाठीही फायदेशीर आहे. डोळ्यात जळजळ किंवा खाज येत असेल तर गुलाबपाण्याचे दोन थेंब घालू शकता. यासाठी तुम्ही कापसाचे दोन मोठे तुकडे घ्या आणि ते गुलाब पाण्यात बुडवून डोळ्यांवर ठेवा. यामुळे डोळ्यांची जळजळ दूर होईल आणि गुलाबपाणी घरी बनवण्याचा प्रयत्न करा.
कोरफडीचा गर
कोरफडीच्या गरामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. या गुणामुळे कोरफडीचा गर डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. यामुळे जळजळीबरोबरच खाजही दूर होते. लक्षात ठेवा की जेल शुद्ध आणि ताज्या पानांपासून काढल्यानंतरच वापरा. यासाठी कापसाच्या साहाय्याने डोळ्याभोवती लावा. काही वेळाने डोळे स्वच्छ पाण्याने धुवा.
(टीप: वरील टिप्सचा वापर करताना क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घ्या.)