हिवाळ्यात फक्त सर्दी-खोकलाच नाही तर इतरही अनेक आजार आपल्याला पटकन घेरतात. अशा परिस्थितीत शरीर निरोगी ठेवण्यासाठी पौष्टिक आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. या ऋतूमध्ये असे अनेक पदार्थ आहेत, जे शरीराला थंडीपासून वाचवून निरोगी ठेवतात. यापैकी एक गोष्ट म्हणजे आले. सोडियम, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-ऑक्सिडंट, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी, सी, फोलेट, झिंक आणि मॅग्नेशियम यांसारखे गुणधर्म असलेले आले आले तुमचा अनेक आजारांपासून बचाव करू शकतो. जाणून घ्या आल्याचे कोण कोणते फायदे आहेत…

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते

हिवाळ्यात आल्याचे सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. यामुळे शरीर रोगांशी लढण्यास सक्षम होते आणि निरोगी राहते. अशा परिस्थितीत या हंगामात आल्याचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.

सर्दी आणि खोकल्यापासून आराम

आले हे आयुर्वेदात खूप फायदेशीर मानले जाते. हिवाळ्यात आल्याचे सेवन केल्याने सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळतो. यासाठी आल्याचा चहा पिणे फायदेशीर मानले जाते. यामुळे सर्दी होत नाही आणि शरीर संसर्गापासून स्वतःचे संरक्षण करू शकते.

लिव्हरच्या समस्येपासून सुटका मिळेल

हिवाळ्यात गरम चहामध्ये आल्याचा तुकडा टाकून तो पिणे फायदेशीर मानले जाते. जेवणानंतर एक तासाने याचे सेवन करणे अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते. असे केल्याने लिव्हरची समस्याही दूर होऊ शकते.

किती प्रमाणात आलं खावं

दररोज आलं ४ ते ५ ग्रॅम याच प्रमाणात खायला हवे. आल्याचा रस किंवा आल्याचा आहारात समावेश केल्यास लठ्ठपणा कमी होण्यासही मदत होते. 

हेही वाचा >> तीळ वजन कमी करण्यासाठी फायदेशीर का आहेत? तीळ शरीरातील फॅट्स कमी करण्यास कशी मदत करतात?

बद्धकोष्ठतेपासून सुटका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

थंडीच्या महिन्यात आहारात बदल होतो, त्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस, अपचन, बद्धकोष्ठता अशा समस्यांनी लोक हैराण झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत आल्याचे सेवन केल्यास या समस्यांपासून सुटका मिळू शकते.