Home Remedies: आपल्या आजूबाजूला अशी अनेक औषधी वनस्पती आहेत, ज्याचा वापर करून आरोग्य निरोगी ठेवता येते. आज आपण अशाच आरोग्यासाठी फायदेशीर असणाऱ्या सुपारीच्या पानांबद्दल जाणून घेणार आहोत . सुपारीची पाने प्रामुख्याने पूजेच्या ठिकाणी वापरली जातात. तसंच अनेकजण सुपारीची पाने खातात. आपण अनेकदा पाहिलं असेल की, आपल्या आजी आजोबांना सुपारीची पाने खाण्याची सवय असते. मात्र, या सुपारीच्या पानांचे आरोग्यासाठी असणारे फायदे काहीजणांनाच माहीत असतील. सुपारीची पाने चावून खाल्ल्यास आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवरही मात करता येते. सुपारीच्या पानांमध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म असतात. त्यामुळे त्याची पाने चावून खाणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. तर जाणून घेऊया सुपारी खाण्याचे आरोग्याला होणारे फायदे.
सुपारीची पाने चघळण्याचे फायदे
१) सुपारीच्या पानांच्या सेवनाने पचनक्रिया चांगली राहते. अशा परिस्थितीत तुम्ही नियमितपणे सुपारीचे सेवन करू शकता, असे केल्याने पोटाशी संबंधित अनेक समस्या दूर होऊ शकतात.
२) सुपारीच्या पानांच्या सेवनाने हिरड्यांची जळजळही दूर होते. सुपारीच्या पानांमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आढळतात ज्यामुळे हिरड्यांची सूज कमी होते.
३) सुपारीच्या पानांच्या सेवनाने खोकल्याच्या समस्येवरही मात करता येते. सुपारीच्या पानात अँटिऑक्सिडेंट, अँटीमाइक्रोबियल गुणधर्म असतात. ज्यामुळे खोकला कमी होतो.
४) सुपारीची पाने चघळल्याने भूक देखील वाढते.
५) सुपारीची पाने खाल्ल्याने तोंडात होणाऱ्या बॅक्टेरियापासूनही आराम मिळू शकतो.
६) त्याचप्रमाणे सुपारीची पाने खाऊन तोंडातील दुर्गंधी देखील दूर करता येते.
७) एखाद्याला सर्दी झाली असेल, तर सुपारीची पाने खाल्याने नक्कीच फरक पडतो.