निरोगी राहण्यासाठी पौष्टिक आहार गरजेचा असतो; पण पौष्टिक आहारातील काही पदार्थ मधुमेह, हृदयविकाराला आमंत्रण देत आहे. त्यात जास्त कार्बोहायड्रेट्स असलेले तांदूळ, चपाती, बटाटे, ब्रेड, पास्ता, कुकीज, पेस्ट्री तसेच स्टार्चयुक्त भाज्यांच्या सेवनाने दिवसेंदिवस तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत नाही, तर ट्रायग्लिसराइड्सचे प्रमाणही वाढतेय, ट्रायग्लिसराइड्स हा रक्तातील चरबीचा एक प्रकार आहे. या ट्रायग्लिसराइड्समुळे मधुमेह असलेल्या लोकांना हृदयविकाराचा धोका जास्त वाढतो. दरम्यान, याच विषयावर चेन्नईतील डायबिटीज स्पेशलिटिज सेंटरचे अध्यक्ष डॉ. व्ही. मोहन यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे.

मधुमेहामुळे ट्रायग्लिसराइड्सचे प्रमाण कसे वाढते?

अनियंत्रित मधुमेह हा शरीरात ट्रायग्लिसराइड्सचे प्रमाण वाढणाऱ्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. जेव्हा रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढते, तेव्हा ते संतुलित करण्यासाठी जबाबदार हार्मोन इन्सुलिन, अतिरिक्त ग्लुकोज ग्लायकोजेनच्या रूपात यकृतामध्ये साठवते. जेव्हा यकृतामध्ये ग्लायकोजेनचे प्रमाण जास्त असते तेव्हा ग्लुकोजचे फॅटी अॅसिडमध्ये रूपांतर होते; ज्यामुळे शरीरात ट्रायग्लिसराइड्स तयार होते. हाय ट्रायग्लिसराइड्स पुढे इन्सुलिन प्रतिरोधकतेकडे नेत असते, जे टाईप २ मधुमेह होण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. हे इन्सुलिनला आपल्या पेशींना ग्लुकोज शोषून घेण्यापासून प्रतिबंधित करते. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण सामान्यतेपेक्षा जास्त होते.

तुम्ही रोज बर्न करीत असलेल्या कॅलरीजपेक्षा जास्त कॅलरीज असलेले पदार्थ खाता, विशेषतः हाय कार्बोहायड्रेट्स पदार्थांमुळे शरीरात ट्रायग्लिसराइड्सचे प्रमाण वाढते. पण, सततच्या वाढत्या पातळीमुळे हायपर ट्रिग्लिसरिडेमिया नावाची स्थिती निर्माण होते.

मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये ट्रायग्लिसराइड्समुळे हृदयाचा धोका वाढतो?

सामान्यतः हाय ट्रायग्लिसराइड्स चांगल्या कोलेस्ट्रॉलच्या कमी पातळीशी किंवा उच्च घनता लिपोप्रोटीन (HDL) यांच्याशी संबंधित असतात. त्यांचा रक्तातील साखर, कंबरेचा घेर व रक्तदाब यांचाही जवळचा संबंध आहे. पण या स्थितीने हृदयविकाराचा झटका, रोग व स्ट्रोकचा धोका वाढण्याची शक्यता आहे, परंतु, सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हाय ट्रायग्लिसराइड्सची पातळी म्हणजे रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल किंवा कमी घनता लिपोप्रोटीन (LDL) लहान आणि घनतेकडे झुकते. हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकसाठी हा एक मोठा जोखमीचा घटक आहे.

ट्रायग्लिसराइड्समुळे स्वादुपिंडात जळजळ निर्माण होते; ज्यामुळे स्वादुपिंडाचा दाह, ओटीपोटात तीव्र वेदना व नेक्रोसिस होतो. भारतीयांना हायपर ट्रिग्लिसरिडेमिया होण्याची शक्यता अधिक असते. हाय ट्रायग्लिसराइड्स आणि एलडीएलदेखील हायपो थायरॉइडीझमचे कारण बनू शकते. हायपो थायरॉइडीझमचे नियंत्रणात असल्यास ट्रायग्लिसराइड्सचे प्रमाणही कमी होऊ शकते.

ट्रायग्लिसराइड्सची लक्षणे आणि परिणाम

ट्रायग्लिसराइड्सची पातळी 150 mg/dL पेक्षा कमी ठेवणे ही आदर्श श्रेणी आहे. उच्च पातळी 299 ते 400 mg/dL आणि लाल रेषा वरील 400 ते 500 mg/dL आहे. ट्रायग्लिसराइड्स पातळी आणि कंबरेचा घेर एकत्र करून इन्सुलिन प्रतिरोधकता आणि हृदयाचा धोका ओळखण्यासाठी निर्देशांक तयार केला जाऊ शकतो. कोणतीही नियमित लिपिड पॅनेल चाचणी तुम्हाला ट्रायग्लिसराइड्सचे प्रमाण दर्शवेल. जोखीम समजून घेण्यासाठी उपाशीपोटी आणि जेवणानंतरचे विश्लेषण दोन्ही चांगले आहे,

पॅन्क्रियाटायटिसचे प्रारंभिक संकेत रक्तातील सीरम एमायलेस आणि लिपेजच्या वाढीव पातळीवरून येतात.

ट्रायग्लिसराइड्सची लक्षणे अनेक प्रकारची असतात. काही वेळा तुमच्या त्वचेच्या पेशींमध्ये इतकी चरबी जमा होते की, तुमच्या रक्ताचा रंग बदलून जातो. हात आणि पायांवर लहान लाल आणि पिवळे पुरळ दिसू शकतात. हे सहसा कोपर, सांधे, कंबर, गुडघे, हात-पाय आणि नितंबांवर दिसतात.

ट्रायग्लिसरायड्समध्ये जास्त वाढ झाल्यामुळे धमन्या कडक आणि जाड होतात. त्यामुळे अनारोग्य चरबीचे कण रक्तवाहिन्यांना चिकटू लागतात आणि त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढते. त्याशिवाय ब्लॉकेजची समस्या निर्माण होते आणि रक्ताभिसरण प्रभावित होऊ लागते. अशा प्रकारे स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.

ट्रायग्लिसराइड्सवर नियंत्रण कसे ठेवावे?

मधुमेह नियंत्रित करणे ही पहिली आणि सर्वांत महत्त्वाची पायरी आहे. कारण- त्यामुळे केवळ ट्रायग्लिसरायड्सचे प्रमाणच कमी होणार नाही, तर ते सामान्य स्थितीतही आणले जाईल. त्यासाठी कार्बोहायड्रेट्सयुक्त पदार्थांचे सेवन टाळा. साखरेच्या सेवनापासून दूर राहा. मांसयुक्त पदार्थांचे सेवन करा; जसे की, मासे. त्यानंतर ऑलिव्ह ऑइल, नट, बिया व अॅव्होकॅडोसारख्या पदार्थांचा समावेश करा. दररोज किमान ३० मिनिटे व्यायाम करा, वजन कमी करा आणि अल्कोहोलपासून दूर राहा. कारण- एक दिवस मद्यपान केल्याने दुसऱ्याच दिवशी ट्रायग्लिसराइड्सची पातळी वाढू शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही प्रकरणांमध्ये हायपर ट्रिग्लिसरिडेमियामागे कौटुंबिक कारणदेखील असू शकते, अशा वेळी व्यक्तीला औषधांची आवश्यकता असू शकते. यावेळी डॉक्टर तुम्हाला फायब्रेट्स नावाच्या औषधांचा एक गट लिहून देतील. भारतीय बनावटीचे सरोग्लिटझार हे औषध ट्रायग्लिसराइड्स, एलडीएल कोलेस्ट्रॉल लक्षणीयरीत्या कमी करते आणि एचडीएल कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढवते. त्याव्यतिरिक्त ते फास्टिंग प्लाझ्मा ग्लुकोज आणि HBA1c (तीन महिन्यांत सरासरी रक्तातील साखरेची पातळी) कमी करते. तुम्हाला ओमेगा-३ फॅटी ॲसिड व निकोटिनिक ॲसिडचाही सल्ला दिला जाऊ शकतो. काही वेळा हाय ट्रायग्लिसराइड्स हे गर्भनिरोधक गोळ्या, स्टेरॉइड्स, लघवीचे प्रमाण वाढविणारी आणि इम्युनोसप्रेसंट्स यांसारखी काही औषधे घेण्याचे दुष्परिणाम असतात.