what not to eat with curd: दही हा एक असा पदार्थ आहे, जो जास्तीत जास्त लोक रोज खातात. दह्याचं लोक वेगवेगळ्या पद्धतीनं सेवन करतात. लहान मुलांनासुद्धा दही खाणं आवडतं. उन्हाळ्यात शरीर थंड आणि आरोग्य चांगले राहावे यासाठी दही खाण्याची सवय खूप फायदेशीर मानली जाते. दह्यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, जीवनसत्त्वे आणि शरीरासाठी आवश्यक पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. रोज दही सेवन केल्यामुळे हाडं आणि दात मजबूत होतात. त्याशिवाय अनेक आजारांपासूनही संरक्षण मिळतं. पण, दही खाताना काही विशेष गोष्टींची काळजी घेणं अत्यावश्यक असतं. दह्याबरोबर एक गोष्ट चुकूनही खाऊ नका. कारण- त्यामुळे तुमच्या शरीराला नुकसान होऊ शकतं.

उन्हाळ्यात शरीर आणि पोट थंड ठेवण्यासाठी लोक नेहमी थंड पदार्थांचं सेवन करतात. अशा वेळी दही हा एक चांगला पर्याय आहे. उन्हाळ्यात तर दही आहाराचा एक महत्त्वाचा भाग असतो. काही लोक ते नाश्त्यात खातात, काही जण ते त्यांच्या दुपारच्या जेवणाचा भाग बनवतात आणि अनेकांसाठी, त्यांचे रात्रीचे जेवण दह्याने पूर्ण होते. दही आरोग्यासाठी खूप चांगले आहे. हे कॅल्शियम व प्रोटीन्सचा चांगला स्रोत आहे आणि ते खाल्ल्याने पोटाच्या समस्या दूर राहतात. पण. तुम्ही दह्याबरोबर लिंबाचा वापर करीत असाल, तर ही सवय तुमच्यासाठी संथपणे पसरणाऱ्या विषासारखी ठरू शकते.

डाएटिशियन स्वाती बिश्नोई यांच्या मते, उन्हाळ्यात दही आणि लिंबू यांची मागणी वाढते आणि दोन्ही वस्तू आरोग्यासाठी उपयुक्त असल्या तरी त्यांचा एकत्र वापर करणं मात्र धोकादायक ठरू शकतं. अनेकदा लोक रायता, कोशिंबीर किंवा चव वाढविण्यासाठी दह्यात लिंबू पिळतात; पण ही सवय शरीरात विषजन्य परिणाम निर्माण करू शकते.

१. पचनतंत्रावर परिणाम

दही आणि लिंबू दोघेही आम्लधर्मी असल्यामुळे त्यांचा एकत्रित परिणाम पचनरसांमध्ये असंतुलन निर्माण करतो. त्यामुळे गॅस, अपचन, अ‍ॅसिडिटी यांसारख्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

२. त्वचाविकार

हे मिश्रण काही लोकांमध्ये अॅलर्जी, रॅशेस, खाज येणं, मुरमं अशा त्वचाविकारांना कारणीभूत ठरू शकतं. काही वेळा पिग्मेंटेशन आणि डार्क स्पॉट्सही दिसू शकतात.

३. रोगप्रतिकार शक्तीवर घात

दहीमधील प्रो-बायोटिक्स शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवतात; परंतु लिंबामधील तीव्र आम्लधर्मी गुणधर्म हे फायदेशीर जीवाणू नष्ट करतात. त्यामुळे दह्याचे फायदे कमी होतात आणि प्रतिकारशक्ती कमजोर होऊ शकते.

४. सर्दी-खोकला वाढू शकतो

दही हे स्वतः थंड असून, त्यात लिंबू मिसळल्यास शरीरातील शीतलता आणखी वाढते. त्यामुळे खोकला, सर्दी,घशाची खवखव यांसारखे त्रास होण्याचा धोका वाढतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर मग, तुम्हीही दह्यात लिंबू टाकून खात असाल, तर सावध व्हा! कारण- ही सवय तुमच्यासाठी अनारोग्यकारी ठरू शकते.