युरिक अॅसिड हे शरीरात तयार होणारे एकप्रकारचे टॉक्सिन आहे, जे किडनीद्वारे फिल्टर केले जाते आणि लघवीद्वारे शरीरातून सहज काढले जाते. जेव्हा किडनी लघवीद्वारे यूरिक ऍसिड उत्सर्जित करू शकत नाही तेव्हा ते सांध्यामध्ये जमा होऊ लागते. आता प्रश्न पडतो की शरीरात युरिक ऍसिड का वाढते? लठ्ठपणा, मधुमेह, किडनीचे आजार युरिक अॅसिड वाढण्यास कारणीभूत आहेत. आहार म्हणजे उच्च प्रथिनयुक्त आहार ज्यामध्ये मटण, मांस आणि अल्कोहोलचे अतिसेवन यांचा समावेश होतो. जेव्हा यूरिक ऍसिड वाढते तेव्हा सांध्यातील वेदना खूप त्रासदायक असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेडिकल न्यूज टुडेच्या मते, महिला आणि पुरुषांमध्ये यूरिक अॅसिडचे प्रमाण वेगवेगळे असते. महिलांसाठी यूरिक अॅसिडची सामान्य श्रेणी १.५ ते ६.० mg/dL असते तर पुरुषांसाठी ती २.४ ते ७.० mg/dL असते. जर पुरुषांमध्ये यूरिक अॅसिडची पातळी ७.० mg/dL पेक्षा जास्त असेल तर ते शरीरासाठी खूप धोकादायक बनते. जर यूरिक ऍसिडची पातळी सुमारे ७.० mg/dL असेल तर तुम्ही बॉर्डर लाइन ओलांडत आहात. अशा परिस्थितीत, काही पदार्थ टाळणे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. यूरिक अॅसिड सीमारेषेवर पोहोचल्यावर कोणत्या गोष्टी टाळाव्यात ते जाणून घेऊया. आहारातून काही गोष्टी वगळून तुम्ही सहजपणे युरिक अॅसिड कमी करू शकता.

( हे ही वाचा: खराब कोलेस्ट्रॉल लघवीद्वारे सहज काढून टाकतील ‘या’ तीन भाज्या, जाणून घ्या कसे)

मांसाहार टाळा

जर यूरिक अॅसिड सीमारेषेवर असेल तर सर्वप्रथम मांसाहार टाळा. प्युरीन युक्त मांसाहारी पदार्थ खाल्ल्याने युरिक ऍसिडची पातळी झपाट्याने वाढते. युरिक अॅसिडच्या रुग्णांनी मांसाहार अजिबात करू नये.

साखरयुक्त पेये यूरिक ऍसिड वेगाने वाढवतात

अनेक संशोधनांमध्ये हे समोर आले आहे की साखरयुक्त पेये खाल्ल्याने युरिक अॅसिडची पातळी झपाट्याने वाढते. साखरयुक्त पेयांमध्ये फ्रक्टोज असते ज्यामुळे यूरिक ऍसिड वेगाने वाढते. साखरयुक्त पेयांव्यतिरिक्त सोडा, कोल्ड्रिंक्स, स्पोर्ट्स ड्रिंक्स आणि इतर पेयांचे सेवन टाळा.

( हे ही वाचा: नितीन गडकरींची Low Blood Sugar मुळे तब्बेत अचानक बिघडली; डॉक्टरांकडून जाणून घ्या रक्तातील साखर कमी झाल्यास लगेच काय करावे)

या भाज्या टाळा

वाढलेल्या युरिक अॅसिडवर नियंत्रण ठेवायचे असेल तर काही भाज्या टाळा. वांगी, पालक, कोबी आणि मशरूम यांसारख्या काही भाज्यांचे सेवन युरिक ऍसिड वाढवण्यासाठी प्रभावी आहे.

ताबडतोब बिअर आणि वाईन पिणे थांबवा

जर यूरिक अॅसिडची पातळी जास्त असेल तर बीअर आणि वाईनचे सेवन बंद करा. बिअर आणि अल्कोहोल युरिक ऍसिड वाढवण्यासाठी प्रभावी ठरतात. बिअर आणि अल्कोहोलचे सेवन केल्याने शरीरात डिहायड्रेशन होते, अशावेळी हे टॉक्सिन काढून टाकण्यासाठी किडनीला जास्त मेहनत घ्यावी लागते. जर यूरिक ऍसिड सीमारेषेवर असेल तर सर्वात आधी दारू आणि बिअर पिणे बंद करा.

( हे ही वाचा: Kiwi Side Effect: किडनीच्या रूग्णांवर विषासारखे परिणाम करते किवी फळं; जाणून घ्या याचे दुष्परिणाम)

जास्त पाणी प्या

युरिक अॅसिड नियंत्रित ठेवायचे असेल तर जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करा. जर तुम्ही जास्त पाणी वापरत असाल तर किडनीच्या यूरिक ऍसिड फिल्टर करणे आणि शरीरातून काढून टाकणे सोपे होईल.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Avoid these 5 foods if uric acid crosses the border line gps
First published on: 18-11-2022 at 20:52 IST