Sugarcane Benefits : उन्हाळा आला की आपण आवडीने ऊसाचा ताजा आणि थंडगार रस पितो. ऊसाच्या रसाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. ऊसाच्या गोडपणाशिवाय आपण त्याच्या फायद्यांकडे लक्ष देत नाही. निरोगी जीवनशैलीसाठी ऊस हा एक उत्तम पर्याय आहे. ऊस हा फक्त उष्णतेपासून संरक्षण करत नाही, तर आजारापासूनही आपल्याला दूर ठेवतो. ऊसाच्या रसापासून आपल्याला भरपूर ऊर्जा मिळते आणि आपली रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढते.
उजाला सिग्नस ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या आहारतज्ज्ञ एकता सिंघवाल यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना ऊसाचे आरोग्यदायी फायदे सांगत या विषयी सविस्तर माहिती सांगितली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१०० ग्रॅम ऊसामध्ये खालील पौष्टिक घटक असतात.

  • कॅलरी – ४३ कॅलरीज
  • कर्बोदके – ११.८ ग्रॅम
  • फायबर – ०.५ ग्रॅम
  • साखर – ८.९७ ग्रॅम
  • प्रोटिन – ०.२७ ग्रॅम
  • फॅट – ०.२३ ग्रॅम
  • व्हिटॅमिन सी
  • कॅल्शियम
  • लोह
  • मॅग्नेशियम
  • पोटॅशियम

आहारतज्ज्ञ एकता सिंघवाल यांनी ऊसाचे फायदे सांगितले आहे.

शरीराला भरपूर पाणी मिळते – ऊस हा पाण्याचा उत्तम आणि ताजा स्त्रोत आहे. ऊसाच्या सेवनामुळे आपल्या शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही.

पचनक्रिया सुरळीत राहते – ऊसामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते, जे पचनास मदत करते आणि पचनक्रियेशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो.

ऊर्जा मिळते- ऊसातील नैसर्गिक साखर ऊर्जा वाढवण्यास मदत करते.

इलेक्ट्रोलाइट संतुलित ठेवते – ऊसामध्ये पोटॅशियमसारखे खनिजे असतात, जे इलेक्ट्रोलाइट संतुलित ठेवण्यास मदत करतात.

अँटिऑक्सिडंट्स – ऊसामध्ये अँटिऑक्सिडंट असतात, जे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करतात.

हेही वाचा : Holi Skin Care Tips : रंग खेळण्यापूर्वी आणि नंतर त्वचेची कशी काळजी घ्यावी? तज्ज्ञांनी सांगितल्या खास टिप्स

मधुमेहाच्या रुग्णांनी ऊसाचे सेवन करावे का?

ऊसामध्ये नैसर्गिक साखर असते, त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी कमी प्रमाणात ऊसाचे सेवन करावे. सिंघवाल सांगतात, “नियमित रक्तातील साखरेचे प्रमाण तपासणे गरजेचे आहे.”

गर्भवती महिलांनी ऊसाच्या रसाचे सेवन करावे का?

सिंघवाल सांगतात, “गर्भवती स्त्रिया कमी प्रमाणात ऊसाचा रस पिऊ शकतात. कारण ऊसाच्या रसामुळे शरीराला भरपूर प्रमाणात पाणी आणि ऊर्जा मिळते.

ऊसाचे सेवन करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवा.

ॲलर्जी – काही लोकांना ऊसाची ॲलर्जी असू शकते.

साखरेचे प्रमाण – ऊसामध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांनी ऊसाचे सेवन करण्यापूर्वी विचार करावा.

अतिसेवन – ऊसाचे अतिसेवन केल्याने कॅलरीजचे प्रमाण वाढू शकते आणि त्यामुळे वजन वाढू शकते. त्यामुळे अतिप्रमाणात ऊसाचे सेवन करू नये.

ऊसासंदर्भात काही गैरसमज आहे. त्याविषयी आज आपण जाणून घेऊ या.

१. ऊसाच्या रसामुळे मधुमेहाचा आजार दूर होतो.

सिंघवाल सांगतात, “ऊस हा संतुलित आहाराचा भाग आहे, पण ऊसाचा रस पूर्णपणे मधुमेह बरा करू शकत नाही.”

२. ऊसामुळे कर्करोग टाळता येतो आणि कर्करोगाचा आजार दूर होतो.

सिंघवाल सांगतात, ऊसातील अँटीऑक्सिडंट्स आरोग्यासाठी फायदेशीर असतात, पण यामुळे कर्करोगाचा आजार बरा होत नाही.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Can sugarcane juice cure diabetes expert debunked myths know nutrition value and health benefits of sugarcane ndj