उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. त्यामुळे डॉक्टर सहसा शरीरातील पाण्याची पातळी कमी होणार नाही याची काळजी घ्या, असे सुचवतात. पण शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ नये म्हणून जास्त पाणी पुरेसे नसते. अनेकदा भरपूर पाणी प्यायल्यानंतरही शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. पण असे का घडते, याबाबत तज्ज्ञ काय सांगतात ते जाणून घेऊ…

याबाबत आहारतज्ज्ञ व वजन कमी करणारे तज्ज्ञ सिमरन कथुरिया यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती दिली. जेव्हा चंदीगडमधील एक ५२ वर्षीय व्यापारी अरोरा पहिल्यांदा माझ्याकडे आले तेव्हा त्यांना एक समस्या होती. त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ नये यासाठी तो भरपूर पाणी पित असत; पण तरीही त्यांना तहान लागत असे. ते प्री-डायबेटिक होते; पण उन्हाळ्यात त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी वाढत असे. त्यांना थकल्यासारखे, अशक्त झाल्यासारखे वाटत असे. मग ते फक्त तहान भागविण्यासाठी पॅकेज्ड ज्यूस, रस्त्याच्या बाजूला असलेल्या स्टॉलवरील फळांचे रस, सोडा आणि अगदी एनर्जी ड्रिंक्स, असे साखरेयुक्त पेये पीत असत. अर्थात, या पेयांनी त्यांची तहान तात्पुरत्या स्वरूपात भागत असे; पण या सवयीने त्यांच्या रक्तातील साखरेचे नियंत्रण बिघडले. शरीरातील पाण्याची पातळी राखणे हे प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे; परंतु तुम्ही शरीरातील पाण्याची पातळी कशी राखता हे आणखी महत्त्वाचे आहे. केवळ मधुमेह असलेल्या लोकांसाठीच नाही, तर सामान्य लोकांसाठीही हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

एकदम अचानक पाणी पिण्याने फायदा का होत नाही?(Why drinking water randomly won’t help)

बहुतेक लोक शरीरातील पाण्याची पातळी कमी होईल या भीतीने साधे पाणी भरपूर प्रमाणात पितात. परंतु अचानक पाण्याचा प्रवाह रक्तातील सोडियमची पातळी कमी करू शकतो हे लक्षात आल्याने शरीर ते पाणी लघवीद्वारे लगेच बाहेर टाकते. त्यामुळे पाणी शरीरात थांबून राहतच नाही. या संरक्षणात्मक यंत्रणेला ‘बोलस रिस्पॉन्स’ (Bolus Response) म्हणतात. जेव्हा तुम्ही जेवण आणि नाश्त्याबरोबर पाणी घेता तेव्हा शरीर द्रवपदार्थ टिकवून ठेवतो. म्हणून दिवसभरात थोड्या थोड्या प्रमाणात पाणी पित राहा.

इलेक्ट्रोलाइट्स अधिक महत्त्वाचे का आहेत? (Why are electrolytes more important)

उन्हाळ्यात घाम येण्यामुळे सोडियम, पोटॅशियम आणि क्लोराइड सारख्या आवश्यक इलेक्ट्रोलाइट्सचे नुकसान होते, जे शरीरातील द्रवपदार्थ संतुलन राखण्यासाठी महत्वाचे असतात. अन्नातील पोषक तत्वे शोषण्यात इलेक्ट्रोलाइट्स महत्त्वाची भूमिका बजावतात. शिवाय, जर इलेक्ट्रोलाइट्स पुन्हा भरले नाहीत तर शरीर तेवढे प्रभावीपणे पाणी टिकवून ठेवू शकत नाही.

उन्हाळ्यात घाम येणे शरीरातील द्रवपदार्थांचे संतुलन राखण्यासाठी आवश्यक असते. घामातून शरीरातील सोडियम, पोटॅशियम व क्लोराईड यांसारखे आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स कमी होतात. अन्नातून पोषक घटक शोषण्यात इलेक्ट्रोलाइट्स महत्त्वाची भूमिका बजावतात. त्याशिवाय जर इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता भरून काढली नाहीत, तर शरीर तितक्या प्रभावीपणे पाणी टिकवून ठेवू शकत नाही.

उन्हाळ्यात तुमचे हायड्रेशन कसे असावे? (Here’s how your summer hydration should look like)

साखरयुक्त पेयांऐवजी, खालील इलेक्ट्रोलाइटयुक्त पर्याय वापरा:

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • पुदिना, लिंबू व काकडीचे काप टाकलेले साधे पाणी
  • ताजे घरगुती ताक
  • इलेक्ट्रोलाइट्ससाठी चिमूटभर गुलाबी मीठ टाकून बनविलेले लिंबू पाणी
  • गोंड कटिरा (Gond katira) हा विशिष्ट वनस्पतींच्या रसापासून काढलेला एक नैसर्गिक डिंक, जो रात्रभर भिजवून सकाळी थंड करून घेता येतो.
  • चिया बिया, सब्जा बिया किंवा तुळस बिया मिसळलेले पाणी प्या. शरीरातील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी आणि फायबरसाठी या बिया लिंबू पाण्यात भिजवून ते पाणी प्या.
  • ताजे पुदिना-लिंबू पाणी, जे खूप ताजेतवाने आहे आणि उन्हाळ्याच्या उष्णतेला नैसर्गिकरीत्या मात देण्यासाठी परिपूर्ण आहे.
  • मर्यादित प्रमाणात ताजे नारळ पाणी सकाळी कमी प्रमाणात प्यावे.
  • काकडी, कलिंगड, खरबूज व संत्री यांसारखी पाणीयुक्त फळे खावीत.

हे पथ्य पाळल्यानंतर अरोरा यांच्या आरोग्यावर का परिणाम झाला याबाबतही कथुरिया यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की,
चार आठवड्यांत अरोरा यांची रक्तशर्करेची पातळी खूपच चांगल्या प्रकारे नियंत्रित झाली होती. त्यांना ताजेतवाने, अॅक्टिव्ह झाल्यासारखे वाटत होते. त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढली नाही आणि कमी झाली नाही. थोडक्यात, शरीरातील पाण्याची पातळी राखणे महत्त्वाचे आहे; परंतु तुम्हाला फॅन्सी पेय पिण्याचा प्रयत्न करून उगाच स्वतःवरील ताण वाढवू नका. साधे पाणी, नैसर्गिक अन्न आणि छोट्या, स्मार्ट सवयी तुम्हाला निरोगी, थंड व उत्साही ठेवू शकतात.