Why Ranveer Singh and Deepika Padukone Don’t Like Curd : आपल्यातील अनेकांना दही, ताक, लोणी, बटर, दूध आदी सगळेच पदार्थ अगदी चाटून-पुसून खायला आवडतात; तर दुसरीकडे काही मंडळी या पदार्थांकडे ढुंकूनसुद्धा बघत नाही. केळ्याचे वेफर्स आवडतात, पण केळं कच्चं खायला आवडत नाही. तर याचबरोबर अभिनेता रणवीर सिंगसुद्धा दही खाण्याच्या विरोधात (Curd Aversion) आहे, असे तो सांगताना दिसला आहे. २०१९ मध्ये 9XM वर शेफ शिप्रा खन्ना यांबरोबर रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणच्या झालेल्या मुलाखतीचे काही क्लिप्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणमध्ये समान खाद्यपदार्थांचा तिरस्कार यासह बरेच साम्य असल्याचे दिसून आले.

रणवीर सिंग मुलाखतीत म्हणाला, लहानपणापासूनच त्याला दह्याचा वास आणि टेक्चर अजिबात आवडत नाही. माझ्या एका मावशीने दह्याचे सेवन करण्याचा सल्ला दिला होता, कारण ते आरोग्यासाठी चांगले आहे. दह्याचे सेवन केल्यानंतर लगेचच रणवीरला अपचन झाले. त्यानंतर मला हे कळले की, ह्याला कंडिशन्ड टेस्ट अव्हर्जन’ (Curd Aversion) म्हणतात, त्यामुळे रणवीर सिंग दही बघू शकत नाही. दही एखाद्याला द्यायचे असेल तर तेसुद्धा करू शकत नाही; असे त्याने सांगितले.

अभिनेत्याने पुढे सांगितले की, तो प्लेन दही बघू शकत नसला तरी तो दह्याने तयार केलेले पदार्थ जसे की सिंधी कढी खाऊ शकतो, पण रायता नाही.
दीपिका पदुकोणलासुद्धा हीच समस्या आहे. म्हणजे एकूणच रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण दह्याचा तिरस्कार करतात.

अव्हर्जन (Curd Aversion) म्हणजे काय याबद्दल समजून घेण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने दिल्ली येथील श्री बालाजी ॲक्शन मेडिकल इन्स्टिट्यूटच्या मुख्य आहारतज्ज्ञ, आहारशास्त्रज्ञ प्रिया पालीवाल यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सांगितले की, लोकांना दही न आवडण्याचे कारण म्हणजे त्याचा वास, टेक्चर (पोत) किंवा चव, जे सहसा सेन्सरी परसेप्शन (संवेदनात्मक धारणा), जेनेटिक्स (genetics) , भूतकाळातील अनुभव किंवा अगदी आतड्यांसंबंधी मायक्रोबायोटाशीसुद्धा जोडलेले असू शकते.

फेरमेंटेशन (fermentation) होणारा तिखट सुगंध, आंबट वासांना संवेदनशील असलेल्यांना त्रासदायक ठरू शकतो. ज्यांना असमान सुसंगतता असलेले पदार्थ आवडत नाहीत अशा लोकांना मलईदार किंचित गुठळ्या असलेला टेक्चर आकर्षक नाही वाटत. दह्याची चव, हलकीशी आंबट आणि कधी कधी तीक्ष्ण असते. जे सौम्य चव पसंत करतात, त्यांच्यासाठीदेखील दही नावडते वाटू शकते, असे प्रिया पालीवाल म्हणतात.

यावर मात करण्यासाठी, हळूहळू स्टेप्स घ्या…

१. ग्रीक योगर्ट किंवा कमीत कमी व्हरायटीज (varieties) असणारे घरगुती दही यांसारख्या सौम्य, कमी तिखट दह्यापासून सुरुवात करा. मध, फळे किंवा चिमूटभर दालचिनी यांसारखे नैसर्गिक गोड पदार्थ जोडल्याने दह्याची चव संतुलित राहते.

२. स्मूदीजमध्ये दही मिसळून किंवा डिप्स आणि ड्रेसिंग वापरल्याने आरोग्य फायदे टिकवून ठेवताना त्याचा टेक्चर कमी होऊ शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

३. ग्रॅनोला किंवा शेंगदाण्यांसारख्या पदार्थांसह दही खाल्ल्याने आणखीन रुचकर होऊ शकते. जर दही आवडत नसेल तर केफिर ( केफिर हा पदार्थ दूध आणि केफिरचं धान्य आंबवून तयार केला जातो ), ताक किंवा आंबलेल्या भाज्यांसारख्या स्त्रोतांपासून मिळणारे प्रोबायोटिक्स समान फायदे देऊ शकतात. त्यांचे सेवन करा; असे प्रिया पालीवाल म्हणाल्या आहेत.