Pregnancy child health: गरोदरपणात शरीरात अनेक हार्मोनल बदल होत असतात. त्यामुळे अनेक महिलांची रक्तशर्करा पातळी वाढते. रक्तशर्करेची पातळी वाढणे ही बाब आई आणि होणाऱ्या बाळासाठीही धोकादायक असते. त्यामुळे प्रसूतीच्या वेळी श्वासोच्छवासाला त्रास होणे, औषधांची ‘रिॲक्शन’ येणे, प्रसूतीदरम्यान गुंतागुंत होणे, बाळाचे वजन जास्त असणे अशा अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे गर्भधारणेच्या निदानानंतर लगेचच आहारातून आवश्यक असे काही पदार्थ नियमितपणे घेतले, तर रक्तशर्करा नियंत्रणात राहू शकते. एका नवीन अभ्यासानुसार, आईच्या आहाराचा मुलाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. जर्नल सायन्समध्ये असे आढळून आले की, गर्भधारणेनंतर पहिल्या त्यामध्ये टाईप २ च्या मधुमेहाचा धोका सुमारे ३५ टक्क्यांनी; तर उच्च रक्तदाबाचा धोका सुमारे २० टक्क्यांनी कमी झाल्याची निरीक्षणे नोंदविण्यात आली आहेत.

झांड्रा हेल्थकेअरचे डायबेटोलॉजीचे प्रमुख व रंग दे नीला इनिशिएटिव्हचे सह-संस्थापक डॉ. राजीव कोविल यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. डॉ. राजीव कोविल म्हणाले की, लठ्ठपणामुळे मधुमेह, कर्करोग आणि हृदयविकाराची साथ पसरते. “माझा ठाम विश्वास आहे की साखर हे जगातील सर्वांत मोठे व्यसन आहे.

आई आणि मुलांच्या आरोग्यावर साखरेचे काय परिणाम होतात?

दिल्लीच्या निओनॅटॉलॉजी व पेडियाट्रिक्सच्या संचालक सी. के. बिर्ला हॉस्पिटल डॉ. पूनम सिडाना यांनी नमूद केले, “गर्भधारणा व त्यानंतरचे असे एकूण एक हजार दिवस, ज्यामध्ये गर्भधारणेचे अंदाजे २८० दिवस आणि नवजात बाळाच्या आयुष्याची पहिली दोन वर्षे (सुमारे ७३० दिवस) समाविष्ट आहेत. मुलाच्या विकासासाठी हा कालावधी महत्त्वपूर्ण असतो. त्यामुळे यादरम्यान साखरेचे सेवन मर्यादित प्रमाणात केले पाहिजे. अलीकडील संशोधनाने गर्भधारणेदरम्यान जास्त साखरेच्या सेवनामुळे होणाऱ्या परिणामांवर पुन्हा लक्ष केंद्रित केले आहे.” डॉ. सिडाना पुढे म्हणाले, “विशेषत: ज्या मातांचे वजन जास्त आहे किंवा ज्या माता शिफारशीपेक्षा जास्त साखरेचे सेवन करतात, त्या मातांच्या आणि त्यांच्या बालकांच्या आरोग्यावर दीर्घकाळ परिणाम होऊ शकतो. गर्भधारणेपूर्वी किंवा गर्भधारणेदरम्यान आईचे वजन जास्त असल्यास, नवजात बाळामध्ये गर्भधारणा मधुमेह, उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणाचा धोका वाढतो. जास्त वजन असलेल्या अर्भकांना सिझेरियन किंवा इंस्ट्रुमेंटल प्रसूतीची गरज यांसारख्या गुंतागुंती होण्याची शक्यता असते.”

“त्याशिवाय, जर एखाद्या आईने जास्त साखर, प्रक्रिया केलेले पदार्थ खाल्ले, तर ती कदाचित स्वतःला आणि तिच्या बाळाला इतर आवश्यक पोषक घटकांपासून वंचित ठेवत असेल, ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होईल,” असे त्यांनी सांगितले. “अभ्यासातून असे दिसून आले आहे की, गर्भाशयात साखरेचे प्रमाण जास्त असलेल्या बाळांच्या बाबतीत लठ्ठपणा, अॅलर्जी, मधुमेह व उच्च रक्तदाब यांसारख्या दीर्घकालीन आरोग्यास त्रासदायक समस्यांचा धोका वाढतो,” असे डॉ. सिडाना म्हणाले. “गर्भधारणेदरम्यान ताजे अन्न, धान्य आणि नियमित व्यायामावर लक्ष केंद्रित करून, निरोगी खाण्याबाबत मार्गदर्शन केल्याने परिणामांमध्ये लक्षणीय सुधारणा होऊ शकते,” असे डॉ. सिडाना यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >> शाहरुख खानने स्मोकिंग सोडली; पण आता होतोय ‘हा’ भयंकर त्रास; जाणून घ्या याबाबतची डॉक्टरांची मते

बाळाला स्तनपान सुरू असताना बाळाच्या प्रतिकारशक्तीसाठी आणि दीर्घकालीन आरोग्यासाठी आईने साखरेपेक्षा फळे आणि नट्स यांसारख्या नैसर्गिक गोड पदार्थांसह ताज्या, शिजविलेल्या घरगुती अन्नावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

\