Exercises to Lose Belly Fat: सध्याच्या घडीला वाढत्या वजनाने त्रस्त असणारा प्रत्येक जण वजन कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे. कारण लठ्ठपणा हे अनेक आजारांचे मूळ आहे. वाढलेले वजन अनेकांची डोकेदुखी झाली आहे, त्यामुळे तुम्हाला विविध आजार जडतात. वाढत्या वजनामुळे तुम्ही मधुमेह, रक्तदाब यांसारख्या अनेक आरोग्य समस्यांना बळी पडू शकता. वजन कमी करण्यासाठी लोक डायटिंग करतात किंवा तास न् तास जिममध्ये घाम गाळतात; परंतु तरीही वजन कमी होत नाही, कारण त्यांचा डाएट चार्ट योग्य नसतो. आहाराकडे योग्य लक्ष आणि थोडासा व्यायाम केल्याने वजन लवकर कमी करणे शक्य आहे. झपाट्याने वजन कमी करण्यासाठी कोणता फंडा तुमच्या कामी येईल, याविषयी फिटनेस इन्फ्लुएन्सर दीप्ती धाकर यांनी माहिती दिली असल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्यासंबंधी सविस्तर जाणून घेऊ..

धाकर म्हणाल्या, “जमिनीवर पाठीवर झोपा आणि दोन्ही पाय सरळ ठेवा -आपले पाय हळू हळू वर करा आणि नंतर जमिनीपासून काही इंच वर खाली करा – हे १५ ते २० वेळा करा, चार आठवड्यांपासून मी हे व्यायाम करत आहे आणि माझे लटकलेले पोट अक्षरशः आठ इंचांनी कमी झाले आहे, त्यामुळे तुम्ही हा व्यायाम पोटावरील चरबी कमी करण्यासाठी करू शकता. हा व्यायाम तुमच्या ओटी पोटाची चरबी कमी करण्यास मदत करतो. पोटाची चरबी कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करणे अत्यंत आवश्यक आहे.”

परंतु, यावर फरीदाबाद येथील मेट्रो हॉस्पिटलचे सल्लागार डॉ. उदित कपूर यांनी असहमती दर्शविली आणि सांगितले की, “लटकलेले किंवा बाहेर पडलेले पोट कमी करण्यासाठी निरोगी आहार आणि एकूणच हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी क्रियाकलापांना लक्ष्य करून व्यायामाचे संयोजन करणे आवश्यक आहे. वजन कमी करण्यासाठी आणि स्नायूंना टोन करण्यासाठी एक व्यापक दृष्टिकोन आवश्यक आहे. लक्षणीय बदल पाहण्यासाठी सुसंगतता, योग्य पोषण आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि कार्डिओ व्यायाम यांचे मिश्रण महत्त्वाचे आहे,” असे डॉ. कपूर म्हणाले.

त्यांच्या मते, चरबी कमी करण्यासाठी कॅलरीजची कमतरता असणे आवश्यक आहे (उदाहरणार्थ, जर तुम्ही दररोज २००० कॅलरीज खाल्ले तर तुम्हाला चालणे आणि व्यायाम करून २२००-२५०० कॅलरीज बर्न कराव्या लागतील). हा व्यायाम तुमच्या पोटाच्या मुख्य स्नायूंसाठी आणि खालच्या पोटासाठी चांगला आहे, परंतु एकूणच तुम्ही फक्त या व्यायामाने चार आठवड्यात लटकणारे पोट कमी करू शकत नाही, असे डॉ. कपूर यांनी स्पष्टच सांगितले.

उदयपूरच्या पारस हेल्थच्या क्लिनिकल डायटिशियन आणि न्यूट्रिशनिस्ट, डीटी आरती नाथ यांनी असेही म्हटले की, पोटाची चरबी कमी करण्यासाठी सामान्यतः संतुलित आणि पौष्टिक आहार, नियमित व्यायाम आणि निरोगी जीवनशैली यांसारख्या घटकांचे संयोजन असते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“वजन कमी करण्यासाठी कोणताही जादूचा उपाय किंवा जलद उपाय नाही.” यासाठी तुम्हाला आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्यावाच लागेल. ते तुम्हाला वजन कमी करण्यासाठी योग्य उपाय सुचवू शकतात. ज्यामध्ये संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि दीर्घकालीन वजन व्यवस्थापनासाठी प्रभावी असलेल्या इतर जीवनशैली घटकांचा समावेश असेल,” असे नाथ म्हणाल्या