हल्ली अनेकांना चुकीची आहार पद्धती, बैठ्या जीवनशैलीमुळे गॅस, अॅसिडीटी, अपचन, बद्धकोष्ठता आणि पोट फुगणे यांसह पोटाचे अनेक आजार बळावतात. पचनासंबंधित या आजारांमुळे संपूर्ण शरीरावर त्याचा परिणाम होत असतो, त्यामुळे पोट निरोगी ठेवणं गरजेचे आहे. पोट निरोगी ठेवण्यासाठी अनेक घरगुती उपाय केले जातात. याच उपायांमध्ये आता गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी आहारात तीन औषधी गुणधर्म असलेल्या पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला दिला आहे. हे औषधी पदार्थ कोणते आणि त्याचा पचनासंबंधी आरोग्यावर नेमका काय परिमाण होतो जाणून घेऊ…
गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यात त्यांनी या तीन औषधी पदार्थांचे फायदे आणि सेवन कसे करावे याविषयी माहिती दिली आहे. तसेच हे पदार्थ रात्रीच्या जेवणानंतर खाल्ले पाहिजेत असेही सांगितले.
हळद

हळदीमध्ये पाचक एंजाइम असतात, जे पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर असतात. हळदीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे आतड्यांचा दाह कमी करतात. हळदीच्या सेवनाने गॅस आणि इतर पचनासंबंधित समस्यांपासून सुटका होते, असे डॉ. सेठी म्हणाले.

शेवग्याची पानं किंवा त्याची पावडर

डॉ. सेठी यांनी सांगितले की, त्यांना संध्याकाळी ग्रीन स्मूदीमध्ये शेवग्याच्या पानांची भाजी किंवा पावडर खायला आवडते. शेवग्याची पानं पॉलीफेनॉल, फ्लेव्होनॉइड्स आणि आयसोथियोसायनेट्सने समृद्ध असतात, ज्याच्या सेवनाने आतड्यांचा दाह कमी करता येतो, यकृताच्या आरोग्यास चालना मिळते. या पानांमध्ये आतड्यातील बॅक्टेरिया नियंत्रणात ठेवण्यासाठी नैसर्गिक प्रतिजैविक संयुगं आहेत.

बडीशेप

डॉ. सेठी यांना रात्रीच्या जेवणानंतर एक चमचा बडीशेप चघळायलाही आवडते.

पण, हे तीन औषधी पदार्थ खरंच पचनासंबंधित समस्या दूर करतात का?

दिल्लीतील सीके बिर्ला हॉस्पिटलमधील इंटरनल मेडिसिनचे प्रमुख सल्लागार डॉ. नरंदर सिंगला म्हणाले की, बडीशेप, मोरिंगा आणि हळद हे तीनही पारंपरिक औषधी पदार्थ तर आहेतच, पण गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजीमध्येदेखील त्यांची शिफारस केली जाते; कारण या पदार्थांच्या सेवनाने पचनासंबंधित आरोग्य सुधारते, तसेच त्यात दाहक-विरोधी फायदे आहेत. पण, कोणतेही नैसर्गिक उपाय करताना संयम आणि वैयक्तिक योग्यता महत्त्वाची आहे, असे डॉ. सिंगला यांनी ठामपणे सांगितले.

हळदीचे फायदे

हळदीमध्ये कर्क्यूमिन नावाचे संयुग असते, जे दाहक विरोधी असून त्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. गॅस्ट्र्रिटिस, इन्फ्लेमेटरी बोवेल डिसीज (IBD) आणि अगदी फॅटी लिव्हरसारख्या आजारांवरही हळद फायदेशीर मानली जाते, असे डॉ. सिंगला म्हणाले.

मुंबईतील परळमधील ग्लेनिगल्स हॉस्पिटल इंटरनल मेडिसिनच्या वरिष्ठ सल्लागार डॉ. मंजुषा अग्रवाल म्हणाल्या की, हळदीत आतड्यांमधील जळजळ कमी करणारे गुणधर्म आहेत. त्यातील कर्क्यूमिन संयुग पचनक्रिया सुधारण्यास आणि पोटफुगीची समस्या कमी करण्यास फायदेशीर असतात. तुम्ही कोमट दुधात टाकून त्याचे सेवन करु शकता. तसेच रोजच्या डाळी, कढीत हळदीचा वापर करून शकता. यामुळे यकृताचे आरोग्य सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, असे डॉ. अग्रवाल यांनी सुचवले.

हळदीचे सेवन कसे करायचे?

१) दररोज ¼ ते ½ चमचा काळी मिरीबरोबर हळद कोमट दूध किंवा अन्नपदार्थांतून सेवन करावी.

२) तु्म्ही डॉक्टरांच्या मार्गदर्शनात कर्क्यूमिन सप्लिमेंट्सचेदेखील सेवन करू शकता.

फायदे

१) आतड्यांचा दाह कमी होतो आणि यातील अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांमुळे शरीराचे आरोग्य निरोगी राहते.
२) गॅस, पोटफुगीची समस्या कमी होते. आयबीएस किंवा इन्फ्लेमेटरी बोवेल सिंड्रोमपासून दूर राहता येते.

‘या’ गोष्टींची घ्या काळजी

फॅट्स किंवा पाइपरिन (काळ्या मिरीसह) सह सेवन केल्यास शोषण कमी होते.
संवेदनशील व्यक्तींना जास्त डोसमुळे पोटात जळजळ होऊ शकते.

मोरिंगा

मोरिंगा जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. जरी ते थेट पचनासाठी उपयुक्त नसले तरी त्यातील दाहक-विरोधी गुणधर्म आणि पौष्टिक गुणधर्म आतड्यांचे आरोग्य, रोगप्रतिकारक शक्ती आणि चयापचय कार्यास फायदेशीर असतात,” असे डॉ. सिंगला म्हणाले.

मोरिंग्याचे सेवन कसे करायचे?

१) दररोज १-२ चमचे मोरिंगा पावडर स्मूदी किंवा कोमट पाण्यात मिसळा.

२) कॅप्सूल किंवा चहाच्या स्वरूपातदेखील घेऊ शकता.

फायदे

१) व्हिटॅमिन ए, सी, कॅल्शियम आणि लोह समृद्ध.
२) ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करणारे पॉलीफेनॉल असतात.
३) थकवा, आतड्यांचा दाह आणि सामान्य आरोग्यास मदत करू शकते.

लक्षात ठेवा :

लो किंवा हाय ब्लड प्रेशरचा त्रास असल्यास हे पदार्थ सेवन करणे शक्यतो टाळा. औषधे घेत असलेल्या गर्भवती महिलांनी जास्त सेवन टाळावे, असे डॉ. सिंगला यांनी सुचवले.

बडीशेप

बडीशेपच्या सेवनाने विशेषतः गॅस, पोटफुगी आणि जेवणानंतर जाणवणाऱ्या अस्वस्थतेपासून मुक्ती मिळते. क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये, बहुतेकदा सौम्य इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) किंवा फंक्शनल ब्लोटिंग असलेल्या रुग्णांना बडीशेप खाण्याचा सल्ला दिला जातो, असे डॉ. सिंगला म्हणाले.

डॉ. अग्रवाल यांनी सांगितले की, बडीशेपच्या सेववाने गॅस, जळजळ, पोटफुगी किंवा उलटी होण्याच्या समस्येपासून आराम मिळतो. बडीशेप तुम्ही जेवणानंतर चघळू शकता किंवा चहामध्ये मिसळूनदेखील खाऊ शकता. यामुळे पचनासंबंधित समस्येपासून आराम मिळतो आणि आतड्यांची हालचाल सुलभ होते. विशेषतः जड किंवा मसालेदार जेवणानंतर बडीशेपचे सेवन केल्यास फायदे मिळतात, असे डॉ. अग्रवाल म्हणाले.

कसे वापरायचे

  • जेवणानंतर अर्धा ते एक चमचा भाजलेली बडीशेप खाऊ शकता.
  • कोमट पाण्यात भिजवून चहा बनवूनही पिऊ शकता.

फायदे

१) कार्मिनेटिव्ह गुणधर्मामुळे गॅसची समस्या कमी होते..
२) जठरातील स्नायूंना आराम मिळतो,
३) तोंडातील दुर्गंधी कमी करता येते. यामुळे निरोगी श्वास घेता येतो.

‘या’ गोष्टींची घ्या काळजी

अतिवापरामुळे इस्ट्रोजेनिक परिणाम जाणवू शकतात, हार्मोन-संवेदनशील परिस्थितीत सावधगिरी बाळगा, असे डॉ. सिंगला म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तज्ज्ञांचा असा आग्रह आहे की, हे औषधी पदार्थ संतुलित आहारात फायदेशीर मानले जातात. विशेषतः पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि जळजळ कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींसाठी हे तीनही पदार्थ उपयुक्त ठरतात. पण, या पदार्थांचा आहारात समावेश करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. विशेषतः जर तुम्ही गर्भवती असाल, स्तनपान करत असाल किंवा औषधे घेत असाल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं फार गरजेचे आहे, असे डॉ. सिंगला म्हणाल्या.