आपल्या देशात दिवसाची सुरुवात ही सकाळी उठल्यानंतर एक कप चहाच्या सेवनाने होते आणि सकाळच्या चहाबरोबर बिस्किटे असतील तर चहा पिण्याची मजा द्विगुणित होते. लहानपणापासून आपल्याला सांगितले आहे की उपाशीपोटी चहा प्यायल्याने ॲसिडिटी होण्याची शक्यता असते. त्यामुळे चहाबरोबर थोड्या प्रमाणात बिस्किटे खावीत पण ही सवय इथेच थांबत नाही. अनेक जण फक्त सकाळीच नाही तर दिवसभरात चहा किंवा कॉफीसोबत अनेकदा बिस्किटे आवडीने खातात पण तुम्ही कधी विचार केला आहे का, तुम्ही दिवसातून किती बिस्किटे खाता ? याशिवाय तुम्ही दिवसभर खात असलेल्या बिस्किटांमध्ये कोणते घटक असतात? नवी दिल्लीच्या मॅक्स सुपरस्पेशियालिटी हॉस्पिटलच्या प्रादेशिक प्रमुख पोषणतज्ज्ञ आणि आहारतज्ज्ञ रितिका समद्दर यांनी 'द इंडियन एक्स्प्रेस'शी बोलताना याविषयी सविस्तर माहिती सांगितली. रितिका समद्दर सांगतात की बिस्किटांमध्ये जास्त प्रमाणात कॅलरी आणि हाइड्रोजेनेटेड फॅट्स असतात. साधारणत: एका साध्या मॅरी बिस्किटामध्ये ४० कॅलरीज असतात पण जी बिस्किटे क्रिमने भरलेली असतात त्यात १०० ते १५० कॅलरीज असतात. बरीच बिस्किटे ही मैद्यापासून बनलेली असतात. मैदा हा इन्सुलिन रेजिस्टन्स निर्माण करण्यास मदत करतो आणि वजन वाढते. हेही वाचा : सकाळपेक्षा संध्याकाळी चालायला जाणे, व्यायाम करणे याचा झोपेला कसा फायदा होतो? डॉक्टरांनी सांगितलं सिक्रेट काही बिस्किटांमध्ये emulsifiers, Preservatives आणि colouring agents सारख्या केमिकल्सचा समावेश असतो. हे केमिकल्स बिस्किटांची अंतिम मुदत वाढवण्यास मदत करतात. बिस्किटांमध्ये अतिप्रमाणात साखर आणि मिठाचा समावेश असतो. जास्त प्रमाणात सोडियमचा समावेश शरीरात पाणी साचून ठेवतो. यामुळे शरीरावर सूज येणे, शरीर फुगणे किंवा वजन वाढू शकते. याच कारणाने उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा जास्त वजन असलेल्या व्यक्तींनी बिस्किटे खाणे टाळावे, असे रितिका समद्दर सांगतात.शुगर फ्री बिस्किटेसुद्धा खाताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. कारण शुगर फ्री बिस्किटांमध्ये aspartame आणि sucralose सारखी आर्टिफिशिअल साखर असते, जी आपल्या मेटाबोलिझमवर परिणाम करते. याशिवाय चहात बुडवून बिस्किटे खाल्ली तर तुमची रक्तातील साखरेची पातळीही वाढू शकते. हेही वाचा : Health special: मधुमेहींमध्ये उन्हाळ्यात रक्तातील साखर घटण्याचे कारण काय? जरी एखादी कंपनी बिस्किट पॅकेटवर बिस्किटांमध्ये गहू, ओट्स फायबरचा समावेश असल्याचा दावा करीत असेल पण हे सर्व घटक फक्त ५ ते १० टक्क्यांपर्यंतच असतात. ही एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी असते, जी ग्राहकांना आपले प्रोडक्ट हेल्दी असल्याचा विश्वास दाखवत खरेदी करण्यास प्रवृत्त करते पण प्रत्यक्षात मात्र असे काहीही नसते.काही अंदाजानुसार तीन-चार डायजेस्टिव्ह बिस्किटे खाणे म्हणजे पोटॅटो चिप्सचे एक पॅकेट खाणे होय, जे उच्च रक्तदाब आणि हार्टशी संबंधित आजार असलेल्या लोकांसाठी खूप धोकादायक आहे.आता या पुढे जर तुम्ही बिस्किटे खरेदी करण्यासाठी जाणार तर त्याऐवजी बदाम, मखाना (फॉक्स नट्स), चणे आणि काजू यांसारखे हेल्दी पर्याय निवडा; कारण या गोष्टी फक्त टेस्टीच नसतात तर आपल्या आरोग्यासाठी हेल्दीसुद्धा असतात. नट्समध्ये हेल्दी फॅट, प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. हेही वाचा : भाकरीत नाचणी- बाजरी शक्यतो एकत्र करु नये, होऊ शकतं ‘हे’ नुकसान! उलट ‘या’ पद्धतीने खाणे ठरू शकते फायदेशीर चहाबरोबर बिस्किटे खाण्याची भारतीयांची ही सवय मोडणे खूप कठीण आहे पण आपल्या आरोग्याला प्रथम प्राधान्य देणेही तितकेच जास्त गरजेचे आहे. यासाठी बिस्किटांच्या जागी नट्ससारख्या पर्यायी पदार्थांचे सेवन करणेही आपल्या आरोग्यासाठी तितकेच फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला बिस्किटे खरेदी करावीशी वाटतील तेव्हा दोनदा विचार करा.बिस्किटे खाणे हे कोकेन आणि मॉर्फिनसारखे आहे. त्यांचे केव्हा व्यसन बनते, हेच आपल्याला कळत नाही आणि याच कारणाने आपण एका बिस्किटांवर थांबत नाही आणि आपल्याला दिवसभर चहासोबत बिस्किटे खाण्याची सवय होते..