निरोगी आयुष्यासाठी हृदय निरोगी ठेवणे आवश्यक आहे. तुमचे हृदय निरोगी ठेवण्यासाठी आणि योग्यरित्या कार्य करण्यासाठी तुम्ही तुमचे रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करणे महत्त्वाचे आहे. कोलेस्ट्रॉल (Cholesterol) ही गंभीर समस्या बनली आहे. शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलचे उच्च प्रमाण तुम्हाला हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका निर्माण करू शकते. रक्तातील खराब कोलेस्ट्रॉलची वाढती पातळी तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, बैठी जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. चुकीच्या जीवनशैलीचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतो.

चांगले आरोग्य राखण्यासाठी योग्य आणि पोषक आहार महत्त्वाचा असतो. कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे अनेक मार्ग आहेत. बाजारातील अनेक औषधे तुमच्या कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करू शकतात. औषधांव्यतिरिक्त तुमच्या कोलेस्ट्रॉलच्या पातळीवर लक्षणीय परिणाम करण्यासाठी तुम्हाला तुमचा आहार आणि जीवनशैली बदलण्याचीदेखील आवश्यकता आहे. पण, आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश केल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवता येईल, याचविषयावर धरमशिला नारायणा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ पायल शर्मा यांनी माहिती दिल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.

(हे ही वाचा : सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल? )

आहारतज्ज्ञ पायल शर्मा सांगतात, सर्व फळे आणि भाज्या पोषक तत्वांनी परिपूर्ण असतात, जे विविध जीवनशैली समस्यांचे व्यवस्थापन करण्यात मदत करू शकतात. परंतु, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मनुका हे उत्तम अन्न आहे. हे फायबरमुळेच नाही तर मोठ्या प्रमाणात कोलेस्ट्रॉल कमी करणाऱ्या फायटोन्यूट्रिएंट्समुळेदेखील आहे. मनुक्यांमध्ये नैसर्गिक शर्करा असते, जे खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करते”, असे एका अभ्यासाचा हवाला देत त्यांनी सांगितले.

चार आठवड्यांपर्यंत दररोज एक मनुका घेतल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. मनुकामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. अशा परिस्थितीत ते तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करते. मनुका हा अघुलनशील आहारातील फायबरने समृद्ध आहे, ज्यामुळे आतड्यांची हालचाल सुधारण्यास मदत होते. मनुक्यांमधील अँटी-ऑक्सिडंट्स बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि गुड कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करते, ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशन सुधारते आणि हृदय निरोगी राहते. मनुका हृदयाच्या आरोग्यासाठी खरोखरच फायदेशीर आहे, कारण त्यात अँटीऑक्सिडंट्स, फायबर आणि जीवनसत्त्वे जास्त आहेत.

मनुकामध्ये फिनोलिक संयुगेसारखे अँटिऑक्सिडेंट असतात, जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासह हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्य फायद्यांशी संबंधित असतात. चार आठवडे दिवसातून एक मनुका खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. यामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर असतात, जे एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी करण्यात आणि हृदयाच्या आरोग्याला चालना देण्यासाठी मदत करू शकतात. तुमच्या दैनंदिन दिनचर्येत या मनुकाचा समावेश करणे हा तुमच्या हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या आरोग्यासाठी एक सोपा आणि चवदार मार्ग असू शकतो, असेही तज्ज्ञ सांगतात.

त्याचप्रमाणे, कोलेस्ट्रॉलची पातळी प्रभावीपणे नियंत्रित करण्यासाठी आपल्या दिनचर्येमध्ये नियमित व्यायामाचा समावेश करणे आणि जास्त प्रमाणात अनहेल्दी पदार्थ खाणे टाळले पाहिजे. आहारात जास्तीत जास्त फळ भाज्यांचा समावेश करणे आवश्यक आहे, असेही शर्मा नमूद करतात.