Exercise can prevent Alzheimer’s?: आपण सर्व जण कधी ना कधी काही गोष्टी विसरतो. अगदी सामान्यातील सामान्य गोष्ट असते. जसे की, घराची चावी किंवा घर बंद करणे. पण, जरा कल्पना करा की, एके दिवशी तुम्ही तुमचे घरच विसरलात तर. महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला तुमच्या घरच्यांचा चेहरा आठवत नाही. तुम्हालाही कुटुंब आहे हे आठवत नाही. किती भयंकर गोष्ट आहे ही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही एका आजाराची लक्षणे आहेत, या आजाराचे नाव आहे अल्झायमर. हा एक मेंदूचा विकार आहे. जो स्मृती, विचार व वर्तन प्रभावीत करतो. हा स्मृतिभ्रंशाचा सर्वांत सामान्य प्रकार आहे आणि तो सामान्यतः वृद्धांना प्रभावित करतो. दरम्यान, एका अभ्यासातून असे समोर आले आहे की, व्यायामामुळे अल्झायमरसारख्या आजारांचा धोका कमी होऊ शकतो.

या अभ्यासात १८ ते ९७ वयोगटातील १०,००० हून अधिक सहभागींची तपासणी करण्यात आली, ज्यांनी त्यांच्या साप्ताहिक व्यायामाचा अहवाल दिला. परिणामांवरून असे दिसून आले आहे की, मध्यम ते जोरदार शारीरिक व्यायाम जसे की वेगवान चालणे, जॉगिंग किंवा ताकदीचे प्रशिक्षण आठवड्यातून फक्त दोन ते तीन दिवस केल्यानं मोठा बदल घडतोय. विशेषतः स्मृती आणि आकलनाशी संबंधित गोष्टींमध्ये बदल दिसून आले. याचाच अर्थ व्यायाम केल्याने अल्झायमरचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते. ग्रेटर नोएडा येथील यथार्थ हॉस्पिटलचे न्यूरोलॉजीचे प्रमुख डायरेक्टर डॉ. अमित श्रीवास्तव यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. डॉ. अमित श्रीवास्तव सांगतात, अल्झायमरचा धोका कमी करण्यासाठी सुरुवातीला हलक्या स्वरुपाचा व्यायाम करावा, जसे की चालणे, हलका व्यायाम करणे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

मेंदूच्या आरोग्यासाठी शिफारस केलेले व्यायाम

डॉ. श्रीवास्तव यांनी निदर्शनास आणून दिले की, सर्व व्यायामाचा सारखाच परिणाम होत नाही; परंतु अनेक प्रकारे मेंदूच्या आरोग्यावर सकारात्मक प्रभाव पडतो. येथे काही शिफारस केलेले व्यायाम आहेत.

चालणे : हा कमी प्रभाव असलेला व्यायाम सहज कुणीही करू शकतो. विशेषत: वृद्ध प्रौढांमध्ये लक्षणीयरीत्या फायदा होतो.

एरोबिक व्यायाम : जॉगिंग, सायकलिंग किंवा पोहणे यांसारख्या क्रियाकलापांमुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य वाढते, मेंदूला रक्त प्रवाह सुधारतो.

स्ट्रेंथ ट्रेनिंग : एक्सरसाइज आणि वेटलिफ्टिंग यासारखे व्यायाम मेंदूची स्मरणशक्ती वाढवतात. मानसिक स्पष्टता आणि भावनिक स्थिरता वाढवताना योग आणि ध्यान तणाव आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात.

पूर्वीच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, योग आणि ध्यान यांचा स्मृतिभ्रंशाच्या व्यवस्थापनावर परिणाम होऊ शकतो.

शारीरिक व्यायाम आणि मेंदूच्या आरोग्यामधील दुवा शोधण्यासाठी संशोधन चालू असताना हे स्पष्ट होते की नियमित व्यायाम केवळ शरीरासाठी फायदेशीर नाही, तर संज्ञानात्मक लवचिकता राखण्यासाठी आवश्यक आहे. सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी मध्यम, सातत्यपूर्ण शारीरिक हालचालींना प्राधान्य दिले पाहिजे, त्यामुळे मानसिक आरोग्याचे रक्षण होते आणि अल्झायमरसारख्या रोगांचा धोका कमी होतो.

हेही वाचा >> Heart Attack: हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून वयाच्या विशीत अन् तिशीत ‘या’ पदार्थांचा करा आहारात समावेश; वाचा तज्ज्ञ काय सांगतात

कोणाला असतो अल्झायमरचा धोका ?

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, अल्झायमर रोगासाठी वाढते वय हा सर्वात मोठा जोखीम असलेला घटक आहे. मात्र, सर्व लोकांना ही समस्या नसते. ज्या व्यक्तींच्या पालकांना (आई-वडील) अल्झायमर झाला होता, त्या व्यक्तींना हा रोग होण्याचा धोका अधिक असतो. त्याव्यतिरिक्त जर एखाद्या व्यक्तीला डाऊन सिंड्रोम असेल तर यामुळे अल्झायमरचा धोकादेखील वाढू शकतो. तसचे डोक्याला दुखापत वा इजा होणे, वायू प्रदूषण आणि मद्यपान या घटकांमुळेही अल्झायमरचा धोका वाढतो.

Story img Loader