7 anger management tips: मंडळी संताप कुणाला येत नाही? संताप ही नैसर्गिक भावना आहे. पण योग्य ठिकाणी व्यक्त झाली तर चांगली आहे राव!! नाहीतर वर्षानुवर्षे जोपासलेली नाती संतापामुळे क्षणात तुटतात. अनेकदा तर संतापामुळे लग्ने तुटल्याचीसुद्धा अनेक उदाहरणे आहेत. बऱ्याचवेळा भावना कंट्रोल करणे अशक्य होऊन बसते आणि संताप उफाळून येतो. आणि मग तुमचा कबीर सिंग होतो. काहीवेळा तर् दुसऱ्यांना कंट्रोल करण्याच्या नादात आपणच जास्त बोलून बसतो. असं म्हणतात की तलवारीने झालेल्या जखमा भरुन येतात, पण जिभेने झालेल्या कधीच भरुन येत नाहीत.अनेकांना संताप आवरण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. पण त्यांना यश काही मिळत नाही राव!! पण मंडळी, आम्ही कशासाठी आहोत? आज आम्ही तुम्हाला राग कंट्रोल करण्यासाठी ७ टिप्स सांगणार आहोत…

या टिप्स वापरुन शांत करा राग-

१. दिर्घ श्वास घ्या –

राग येण्याचं मुख्य कारण आहे ताण, आता ताण दूर करण्यासाठी स्नायूंना रिलॅक्स करा. खोल श्वास घ्या आणि दोन मिनिटांसाठी अगदी गप्प बसा, काही सेकंदातच आपण शांत व्हाल.आपले डोळे बंद करा आणि खोल श्वास घ्या. आता विचार करा की ताण दूर होतोय. आपल्या विचार शक्तीने ताण आपोआप दूर होईल.

२. बोलण्यापूर्वी विचार करा

ही गोष्ट आपल्या सतत कानावर पडत असते परंतु असे करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. जर तुम्हाला खूप राग आला असेल आणि तुम्हाला कोणाला काही सांगायचे असेल तर त्याआधी काही काळ नीट विचार करा की ते खरेच सांगण्याची गरज आहे का किंवा त्यानंतर त्याचा परिणाम काय होईल इत्यादी

३. गोष्टी मनामध्ये ठेवू नयेत

जेव्हा एखादी व्यक्ती गोष्टी मनातच ठेवू लागते तेव्हा तिचा राग चुकीच्या ठिकाणी बाहेर पडू शकतो किंवा एकाचा राग दुसऱ्यावर निघू शकतो. तुमच्या मनातील गोष्ट समोरच्या व्यक्तीला सांगून टाकल्यावर तुमच्या मनात गोष्टी राहणार नाहीत आणि तुमचा राग इतर कोणावरही निघणार नाही.

४.गाणी ऐका

खूप राग आला असेल तेव्हा आपली आवडती गाणी ऐकल्याने आपलं डोकं शांत होण्यास मदत होते. तुमचे मन प्रसन्न होऊन हळूहळू राग शांत होतो.

५. रागाचा काय परिणाम होतो

रागाचा आपल्या शरीरावर आणि मनावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे मन अस्वस्थ राहू लागते. रागामुळे रक्तदाब, जलद हृदयाचे ठोके सुरू होतात. राग आल्यावर शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाणही कमी होते.

हेही वाचा – Cucumber facemask: काकडीपासून बनवलेला ‘हा’ फेसपॅक उन्हाळ्यात त्वचा ठेवेल थंड, जाणून घ्या कसा तयार करायचा?

६. चांगली झोप घ्या

कधी कधी कामाच्या लोडमुळे व्यवस्थित झोप येत नाही. ज्यामुळे डोकेदुखी, तणाव आणि चिडचिड होते. यातून विनाकारण दुस-यांवर राग निघतो. अशात काहीही झाले तरी, तुम्ही कितीही बिझी असाल तरी निदान ७ तासांची झोप घ्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

७. डॉक्टरांचा सल्ला घेता येईल

छोट्या-छोट्या गोष्टींवर राग आला तर मोठी अडचण होते. त्यावर उपचार करण्यासाठी तुम्ही मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता. यादरम्यान, तुम्ही डॉक्टरांना तुमच्या रागाच्या सवयीबद्दल कोणताही संकोच न करता उघडपणे सांगणे महत्त्वाचे आहे.