हिवाळ्यात वातावरणात होणाऱ्या बदलामुळे आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज असते. हिवाळ्यात पडणारे धुके, प्रदूषण, थंडीचे वातावरण यामध्ये अनेक आजार उद्भवतात. हिवाळ्यात हृदयाशी निगडित समस्याही वाढू शकतात. त्यामुळे या काळात आरोग्याची विशेषतः हृदयाची नीट काळजी घेणे आवश्यक असते. यासाठी काही पदार्थ फायदेशीर ठरतात, कोणते आहेत ते पदार्थ जाणून घ्या.

हिवाळ्यात हृदय निरोगी ठेवण्यासाठी कोणते पदार्थ मदत जाणून घ्या

आणखी वाचा: हिवाळ्यात दम्याच्या रुग्णांनी अशी घ्या काळजी; जाणून घ्या सोप्या पद्धती

लिंबूवर्गीय फळं
लिंबू, संत्री, आवळा, टोमॅटो अशी लिंबूवर्गीय फळं हृदयाच्या आरोग्यासाठी चांगली मानली जातात. या फळांमध्ये फ्लॅवोनॉयड्स आणि विटामिन सी आढळते. यामुळे लिपोप्रोटीन कोलेस्ट्रॉल वाढते. ज्यामुळे हृदयाचे विकार, स्ट्रोकचा धोका कमी होतो.

जेवणात सर्व धान्यांचा समावेश करा
धान्यांमध्ये भरपूर फायबर आणि पोषकतत्त्व आढळतात, ज्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यांचे आरोग्य चांगले राहते. त्यामुळे जेवणात सर्व धान्यांचा जेवणात समावेश करा. यासाठी मैद्याच्या जागी बाजरी, नाचणी, गहु, मक्याचे पीठ यांचा समावेश करा.

आणखी वाचा: ‘ही’ आहेत हिवाळ्यात सतत सर्दी, खोकला होण्याची कारणं; लगेच करा बदल

कंदमुळं असणाऱ्या भाज्या
गाजर, रताळे, बीट, बटाटे यांसारख्या कंदमुळं असणाऱ्या भाज्या आरोग्यासाठी फायदेशीर मानल्या जातात. यांमध्ये विटामिन ए, बीटा-कॅरोटीन आणि विटामिन सी यांसह अनेक जीवनसत्त्व, अँटिऑक्सिडंट्स, अँटीइनफ्लामेंटरी गुणधर्म आढळतात जे हृदय निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर मानले जातात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)