Food in Plastic Containers : आपल्यापैकी अनेकांच्या घरी प्लास्टिक डबे वापरले जात असतील. महिलांना तर प्लास्टिक डब्यांविषयी विशेष प्रेम असते. तुमच्या घरातील महिलांना प्लास्टिक डबे जमा करण्याचा छंद असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. प्लास्टिकच्या डब्यांमध्ये अन्न साठवून ठेवणे किंवा या डब्यांमधून अन्न खाणे चांगले आहे का? याविषयी लखनऊच्या रिजन्सी सुपरस्पेशॅलिटी हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. प्रवीण झा यांनी सविस्तर माहिती दिली.

डॉ. झा सांगतात, “प्लास्टिकच्या डब्यांमध्ये अन्न साठवून ठेवणे चांगले आहे की वाईट, हे प्लास्टिकचा प्रकार आणि त्या अन्नाचा आपण कसा वापर करतो, यावर अवलंबून असते. काही प्लास्टिक अन्नाच्या संपर्कात आल्यानंतर धोकादायक केमिकल्स सोडतात. विशेषत: जेव्हा प्लास्टिकच्या डब्यात गरम अन्न असते”

प्लास्टिकच्या डब्यांमध्ये सर्वांत जास्त वापरला जाणारा एक प्रकार म्हणजे PETE. यालाच पॉलिथिलीन टेरेपथॅलेट (Polyethylene Terephthalate) म्हणून ओळखले जाते. हे प्लास्टिक तुम्ही फक्त एकदा वापरू शकतात; वारंवार नाही. डॉ. झा सांगतात प्लास्टिक वापरण्यापूर्वी ते अन्नासाठी सुरक्षित आहे का, हे तपासणे गरजेचे आहे.

हेही वाचा : Yoga for Children : ५ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांनी करावे ‘हे’ तीन योगा; पालकांनो, फायदे जाणून घ्या

कोणत्या प्रकारचे प्लास्टिक कंटेनर टाळावेत?

प्लास्टिकच्या डब्यांमध्ये अन्न साठवणे चुकीचे नाही. पण, कोणत्या प्रकारच्या प्लास्टिक कंटेनरमध्ये अन्न साठवू नये, हे समजून घेणे गरजेचे आहे. जे पदार्थ गरम, तेलकट व आम्लयुक्त असतात, असे अन्न प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये साठवल्यामुळे प्लास्टिक केमिकल्स सोडतात; जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असते.
डॉ. झा सांगतात, “जुने किंवा खराब झालेले प्लास्टिक कंटेनर वापरू नयेत. असे प्लास्टिक जास्त प्रमाणात केमिकल्स सोडू शकतात.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा : Sleep : पाच किंवा त्यापेक्षा कमी तास झोपेने ५० पेक्षा जास्त वय असलेल्यांना होऊ शकतो दीर्घकालीन आजार? वाचा काय सांगते संशोधन ….

प्लास्टिकच्या डब्यांमध्ये अन्न ठेवण्यापूर्वी लक्षात ठेवा या गोष्टी

  • प्लास्टिकच्या डब्यांमध्ये अन्न ठेवण्यासाठी ‘फूड ग्रेड’ किंवा ‘बीपीए-फ्री’ लेबल केलेले प्लास्टिक कंटेनर निवडा. BPA (Bisphenol A) हे केमिकल आहे; ज्यामुळे आरोग्य धोक्यात येऊ शकते.
  • प्लास्टिकचा कंटेनर कधीही मायक्रोवेव्हमध्ये ठेवू नका. कारण- उष्णतेमुळे प्लास्टिकमधून केमिकल बाहेर पडण्यास प्रोत्साहन मिळते.
  • खराब झालेले प्लास्टिक कंटेनर वापरणे टाळा.
  • वेगवेगळ्या प्लास्टिक कंटेनरसाठी वेगवेगळी मार्गदर्शक तत्त्वे असतात आणि ही मार्गदर्शक तत्त्वे प्लास्टिक सुरक्षित वापरण्यासाठी मदत करतात.
  • जास्त कालावधीसाठी प्लास्टिक कंटेनरचा वापर टाळा. एकदोन दिवसापर्यंत प्लास्टिक कंटेनरमध्ये अन्न साठवून ठेवू नका.