Benefits of Balayam Yoga : योगासने आपल्या निरोगी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या योगासनांचे विविध फायदे आहेत. काही योगासने शरीराची लवचिकता वाढवण्यासाठी केले जातात. तर काही योगासनांच्या मदतीने वजन कमी करता येते. यात केसांच्या वाढीसाठी सर्वात प्रसिद्ध योगासन म्हणजे नखांवर नख घासणे. या योगासनाला बालायम म्हणतात. यामुळे अकाली केस पांढरे होणे, केस गळणे आणि केसांच्या बऱ्याच समस्यांपासून दूर राहता येते. या योगासनाबद्दल अनेक वैज्ञानिक कारणे आहेत. ती काय आहे तपशीलवार जाणून घेऊ.
बालायम म्हणजे काय?
केसांच्या वाढीसाठी नखांवर नख घासणे ही पर्यायी रिफ्लेक्सोलॉजी थेरपी आहे. यात नखं एकमेकांवर घासली जातात. काही लोकांचा विश्वास आहे की, हा योगाप्रकार खरोखरचं काम करतो, तर काहींना यात त्रुटी आढळल्या आहेत. पण एॅक्युप्रेशर थेरपीमध्येही हातांची नखं एकमेकांवर घासण्याला खूप महत्व देण्यात आलं आहे. केसांच्या योग्य वाढीसाठी एॅक्युप्रेशरमध्येही ही पद्धत सांगितली जाते. दररोज २ मिनिटे बालायम योगाप्रकार केल्यास केसांच्या अनेक समस्यांपासून आराम मिळतो.
तुम्ही चेहऱ्यावर बेबी ऑइल वापरताय? मग जाणून त्याचे ‘हे’ ५ दुष्परिणाम
बालायम कसे करावे?
अहवालांवर विश्वास ठेवला तर, दररोज किमान ५-१० मिनिटे नखे एकमेकांवर घासल्याने तुमचे केस पुन्हा वाढू शकतात. यात तुम्हाला अंगठा सोडून इतर सर्व नखे एकमेकांवर घासावी लागतात. या योगाप्रकाराबद्दल असा दावा केला जातो की, यामुळे टक्कल पडण्याची समस्या कमी होते आणि केसांची सामान्य स्थिती परत येऊ शकते. तसेच केस पांढरे होणे आणि केस गळती टाळता येते असे सांगितले जाते.
यावर विज्ञान काय सांगते?
असे म्हटले जाते की, तुमच्या नखांच्या खाली काही मज्जातंतूचे टोक आहेत, जे एकमेकांवर घासल्याने उत्तेजित होतात. म्हणून असा दावा केला जातो की, तुम्ही नखं जेव्हा एकमेकांवर घासता तेव्हा तुमच्या मेंदूला एडल्ट स्टेम पेशींना मृत किंवा अनुत्पादक केसांच्या कूपांचे पुरुत्पादन करण्यासाठी सिग्नल पाठवण्यासाठी उत्तेजित करतात.
तुम्ही नखांना एकमेकांवर घासल्याने तुमच्या टाळूमध्ये रक्ताभिसरणही वाढते. ज्यामुळे तुमचे केसांचे कूप मजबूत होतात. अशावेळी केसांच्या समस्या कमी होतात. पण या दाव्यांची पुष्टी करण्यासाठी कोणतेही वैज्ञानिक संशोधन केले गेले नाही.
अनेक अहवालांवर विश्वास ठेवला तर नखे एकमेकांवर घासण्याचे अनेक फायदे आहेत. परंतु उच्च रक्तदाब असलेल्या लोकांनी बालयम करु नये कारण त्यांची प्रकृती बिघडू शकते. तसेच गर्भवती महिलांना देखील हा योगाप्रकार न करण्याचा सल्ला दिला जातो. कारण यामुळे गर्भाशयाचे आकुंचन किंवा उच्च रक्तदाब होऊ शकतो.
असे मानले जाते की, या योगाप्रकारामुळे कधीकधी खूप झोप येते. म्हणून कामाच्या वेळेत आणि वाहन चालवण्यापूर्वी हा योगाप्रकार न करण्याचा सल्ला दिला जातो.