अलास्का समिटमध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांचे अंगरक्षक त्यांच्या हातात ‘पूप बॉक्सेस’ घेऊन फिरताना दिसल्याची बातमी चर्चेत आली आणि यावरून इंटरनेटवर अक्षरश: मीम्सचा पाऊस पडला. मात्र, यामागील वैद्यकीय महत्त्व अनेकांनी लक्षात घेतलं नाही.

पुतिनच्या सहकाऱ्यांनी इतर देशांना त्यांच्याबद्दल आरोग्यविषयक माहिती मिळू नये म्हणून ही पद्धत अवलंबली आहे. पण खरी गोष्ट अशी की, आपला मल/स्टूल (stool) शरीराच्या आरोग्याविषयी आणि कल्याणाविषयी खूप काही सांगतो.

मल हे न पचलेले अन्न कण, बॅक्टेरिया आणि इतर उप-उत्पादनांनी बनलेला असतो. हे घटक अनेकदा गंभीर आजारांचा प्रारंभिक इशारा देतात, ज्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

आतड्यांतील सूक्ष्मजीवांची मिळते माहिती (MAPPING GUT MICROBES)

आतड्यातील सूक्ष्मजीवांचा (gut microbiome) अभ्यास करणे ही आज वैद्यकीय संशोधनातील महत्त्वाची शाखा आहे. आपल्या आतड्यांमध्ये असंख्य बॅक्टेरिया, बुरशी, विषाणू आणि इतर सूक्ष्मजीव राहतात. हे सूक्ष्मजीव अन्न पचवणे, पोषक घटक शोषून घेणे, मेटाबॉलिझम (उदा. साखरेचे प्रमाण) नियंत्रित ठेवणे, यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

तसेच रोगप्रतिकारक शक्तीला (immune system) चांगले-वाईट जीव वेगळे ओळखायला शिकवतात. पण, या संतुलनात बिघाड झाल्यास मधुमेह, लठ्ठपणा, रोगप्रतिकारक विकार असे परिणाम दिसतात.

जेव्हा या सूक्ष्मजीवाचे संतुलन बिघडते, तेव्हा त्याचा परिणाम व्यापक असू शकतो. अभ्यासांनी अशा विकारांना मधुमेह, लठ्ठपणा आणि रोगप्रतिकारक शक्तीशी संबंधित विकारांशी जोडले आहे. मानवी मलाचा अभ्यास करून, डॉक्टर आणि संशोधक आतड्यातील सूक्ष्मजीवांबाबत माहिती मिळवू शकतात आणि हे असंतुलन का होतं ते समजू शकतात. ही माहिती नव्या उपचारपद्धती विकसित करण्यासाठी दिशा देते — जसं की टार्गेटेड प्रोबायोटिक्स किंवा आहारातील बदल जे सूक्ष्मजीवांचं संतुलन पुन्हा निर्माण करू शकतात.

याशिवाय प्रत्येक व्यक्तीच्या अनोख्या आतड्यातील सूक्ष्मजीवांवर आधारित वैयक्तिकृत उपचार योजना आखण्याची संधीही उपलब्ध करून देते. अशा प्रकारे, मल तपासणी ही सोपं पण अत्यंत प्रभावी साधन बनत चाललं आहे, जे वैद्यकीय विज्ञानाला पुढे नेण्यासाठी उपयोगी ठरत आहे.

कोलन कॅन्सरचे निदान (Diagnosis of Colon Cancer)

मल तपासणी कोलन कॅन्सरचं लवकर निदान करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरते. कोलन कॅन्सर अजूनही कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूचं मोठं कारण आहे, पण लवकर निदान झाल्यास उपचार यशस्वी होण्याची शक्यता किंवा प्रमाण जास्त होतं.

खालील बदल दिसल्यास त्वरित तपासणी आवश्यक आहे:

शौचाच्या सवयींमध्ये बदल
सतत जुलाब होणे किंवा बद्धकोष्ठता
मलाच्या स्वरूपात बदल
मलात रक्त मिसळणं
मल खूप बारीक किंवा फितीसारखा दिसणं

ही लक्षणे लवकर ओळखून डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास मोठा फरक पडू शकतो.

वैद्यकीय तपासण्या फक्त दिसणाऱ्या बदलांवर अवलंबून नसतात. मलामध्ये दडलेले रक्त किंवा कॅन्सरशी संबंधित रेणू (molecular markers) शोधणाऱ्या चाचण्या उपलब्ध आहेत. या चाचण्या सोप्या, नॉन-इनवेसिव्ह (शरीराला दुखापत न करता केली जाणारी तपासणी) आहेत आणि विशेषतः ज्या लोकांना अधिक धोका आहे, त्यांच्यासाठी स्क्रीनिंगमध्ये ही चाचणी उपयोगी पडते.

लवकर निदान झाल्यास उपचार प्रभावी टप्प्यावर सुरू करता येतात आणि नंतर कठोर उपचारपद्धती (aggressive interventions) करण्याची गरज कमी होते.

आतड्यांच्या आजारांचे मूल्यांकन (ASSESSING GUT DISORDERS)

डॉक्टर मल परीक्षणाचा (stool test) उपयोग करून काही पचनसंस्थेशी संबंधित आजारांचे निदान करतात आणि दिलेल्या उपचारांचा परिणामकारकपणा तपासतात. इन्फ्लॅमेटरी बाउल डिसीज (IBD) सारख्या स्थितींवर उपचार किती परिणामकारक आहेत किंवा एच. पायलोरी (H. pylori) संसर्ग पूर्णपणे नष्ट झाला आहे का, हे तपासण्यासाठीही मल परीक्षण केले जाते.

मलामध्ये न पचलेले मांसाचे तंतू (undigested meat fibres) दिसल्यास त्याचा संबंध स्वादुपिंडाच्या सूजेशी (pancreatitis) असू शकतो.

मलाचा pH कमी असल्यास शरीरात कार्बोहायड्रेट किंवा फॅट्स नीट शोषले जात नाही असे दर्शवते.

मलाचा pH जास्त असल्यास आतड्यांमध्ये सूज (colitis), कर्करोग किंवा प्रतिजैविके (antibiotics) वापराचा परिणाम असू शकतो.

मलात रक्त असल्यास पचनसंस्थेत रक्तस्त्राव होत असल्याचे सूचित होते.

मलात पांढऱ्या रक्तपेशी आढळल्यास आतड्यांमध्ये सूज (ulcerative colitis) किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शनचे ते निदर्शक असते. 

पोषक तत्वांचे शोषणाबाबत माहिती (TRACKING NUTRIENT ABSORPTION)

 मल चाचण्या (stool analysis) पोषकतत्त्व शोषणातील विकार (malabsorption disorders) शोधण्यासाठी उपयुक्त ठरतात. हे विकार तेव्हा होतात, जेव्हा शरीर अन्नातील पोषकतत्त्वे नीट शोषून घेत नाही; ज्यामुळे वाढ, ऊर्जा, रोगप्रतिकारक शक्तीची कमतरता निर्माण होते. मल चाचणीतून (stool testing) फॅट्स किंवा इतर पोषकतत्त्वे वाया जात आहेत का हे समजते, त्यामुळे डॉक्टरांना महत्त्वाचे संकेत मिळतात आणि पुढील तपासणी व योग्य उपचारांकडे मार्गदर्शन होते.