पायांमध्ये किंवा मांडीमध्ये गोळे (Cramps) येणे ही सर्वसामान्य बाब आहे. आपण दुचाकीवरुन प्रवास करताना किंवा उंच ठीकाणी चालताना पायात गोळे येण्याची समस्या आपणाला उद्धवते. तसंच ही समस्या आपल्या लैंगिक जीवनावर थेट परिणाम करते. अनेक स्त्रियांना मासिक पाळीमुळे त्यांच्या शरीरात गोळे येतात असंही वाटतं. मात्र, गोळे येण्याची कारणं वेगळी आहेत. पायात, पोटाच्या खालच्या भागात किंवा मांड्यांमध्ये गोळे येण्याचा सर्वाधित त्रास सेक्स करताना जाणवतो.

तुम्हालाही सेक्स करताना गोळे येण्याची समस्या सतावत असेल तर तसं होण्यामागची नेमकं कारण काय आहेत आणि ही समस्या कमी कशी केली जाऊ शकते ते जाणून घेऊया. शारीरिक संबंध इन्जॉय करण्याची प्रत्येक जोडप्याची इच्छा असते. या संबंधामुळे पती-पत्नीमध्ये जवळीकता वाढते. मात्र, सेक्सचा उपभोग पुर्णपणे घेण्यासाठी शरीर निरोगी असणंही तेवढंच गरजेचं आहे. परंतु अनेकांना सेक्स करताना पायात आणि मांड्यांमध्ये गोळे येतात ज्यामुळे त्यांना सेक्स मनसोक्त इन्जॉय करता येत नाही.

chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
Why are naphthalene balls kept with clothes to be put away How do you use naphthalene balls in a wardrobe
कपड्यांमधील ओलसरपणा, कुबट वास होईल गायब; कपाटात ठेवा ‘ही’ गोळी, जाणून घ्या वापराची योग्य पद्धत
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच

हेही वाचा- सेक्स करताना पसरू शकतो धोकादायक ‘ह्यूमन पॅपिलोमा वायरस’; जाणून घ्या बचावाची ‘ही’ योग्य पद्धत

सेक्सदरम्यान क्रॅम्प (Cramps) का येतो ?

हेल्थ शॉट्सच्या रिपोर्टनुसार, सेक्स दरम्यान गोळे येणे ही खूप सामान्य गोष्ट आहे. अनेकांना या समस्येला सामोरं जावं लागतं. याची काही कारण समोर आली आहेत. ज्यामध्ये सेक्स करताना अतिउत्तेजित होणं, शरीराराचे असंतुलन अशा गोष्टींमुळे या समस्येचा सामना करावा लागतो. याशिवाय डिहाइड्रेशन, थकवा, आणि सतत घाम येण्यामुळेही हा त्रास होऊ शकतो.

सेक्सदरम्यान येणारे क्रॅम्प कमी करण्याचे उपाय –

हेही वाचा- रात्री ‘या’ गोष्टी खाल्ल्यास युरिक ॲसिड झपाट्याने वाढू शकते; संधिवात होण्यापूर्वी ‘या’ गोष्टींपासून दूरच राहा

१. सेक्स पोझिशन बदलत रहा –

सेक्स पोझिशन बदलल्यामुळे आपल्या ठराविक मसल्सवर दबाव येत नाही. शिवाय सेक्स करताना अशा पोझिशन्स निवडा ज्यामध्ये तुम्हाला जास्त ताकद लावावी लागणार नाही. त्यामुळे सेक्स दरम्यान पोझिशन बदलल्यास गोळे येण्याची समस्या कमी होऊ शकते.

२. आहारात बदल करा –

आपले आरोग्य नियंत्रणात ठेवण्यासाठी आहार महत्त्वाचा आहे. पोटॅशियमच्या कमतरतेमुळे मासपेशींमध्ये क्रॅम्प येतात. अनेकदा पोटॅशियमयुक्त आहार घेतल्याने ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यास मदत होते. ज्यामुळे गोळे येण्याची शक्यता कमी होते. यासाठी आहारात केळी, संत्री, बटाटे, टोमॅटो, पनीर आणि अननस यांसारख्या पोटॅशियमयुक्त पदार्थांचा समावेश करणं आवश्यक आहे.

३. व्हिटॅमिन ई –

हेही वाचा- किडनी निकामी होण्याचा धोका वाढवतात ‘या’ डाळी व भाज्या; युरिक ऍसिडचा मोठा धोका ओळखा

व्हिटॅमिन ई च्या कमतरतेमुळेही तुमच्या स्नायूंमध्ये गोळे येण्याची शक्यता जास्त असते. यासाठी तुम्हाला शरीरातील व्हिटॅमिन ई वाढवण्याची गरज आहे. यासाठी आहारात काजू, फळे आणि सोयाबीन, तीळ आणि ऑलिव्हसह विविध प्रकारची तेल आणि ब्रोकोली आणि पालक सारख्या हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा लागेल. यामध्ये व्हिटामीन ई मोठ्या प्रमाणात असते.

या’ गोष्टी लक्षात ठेवा –

याशिवाय, तुम्ही कोणत्याही अडथळ्याशिवाय सेक्स लाईफ इन्जोय करायची असेल तर खालील गोष्टी लक्षात ठेवा.

  • सतत पाणी प्या
  • सेक्स करताना चुकीच्या पद्धतीचा अवलंब करु नका.
  • नियमित व्यायाम करा
  • धुम्रपान टाळा