शकिरा (Shakira) ही दक्षिण अमेरिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री व पॉप स्टार आहे. सौंदर्य आणि संगीत यांच्या जोरावर ती प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करताना दिसतेय. तिचे प्रत्येक गाणे सुपरहिट ठरत असते. शकिराच्या चार्ट-बस्टिंग ‘हिप्स डोन्ट लाय’ गाण्यावर (Hips Don’t Lie) डान्स करायला, कंबर हलवायला कोणाला आवडत नाही? जर तुम्हीसुद्धा त्यापैकी एक असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. हे गाणे तुम्हाला एखाद्याचा जीव वाचविण्यास मदत करू शकते. होय… तुम्ही अगदी बरोबर वाचत आहात. कारण- ही कोणतीही थट्टा, मस्करी नाही.

अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, शकिराच्या चार्ट-बस्टिंग ‘हिप्स डोन्ट लाय’ गाण्यात १०० बीट्स प्रतिमिनीट आहेत; जे हँड्स-ओनली सीपीआरसाठी (Hands-only CPR) योग्य आहे. तर या संबंधित अधिक जाणून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने नवी दिल्लीच्या अपोलो हॉस्पिटल्सचे कार्डिओथोरॅसिक आणि हृदय, फुफ्फुस यांची शस्त्रक्रिया करणाऱ्या वरिष्ठ सल्लागार डॉक्टर मुकेश गोयल यांच्याशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, हँड्स-ओन्ली सीपीआर (Hands-only CPR) ज्याला कॉम्प्रेशन-ओन्ली सीपीआर (Compression-only CPR) देखील म्हणतात. म्हणजेच अचानक हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीच्या छातीवर सतत दाब देणे होय.

Wedding Honeymoon Night Turned Nightmare
मधुचंद्राच्या रात्रीला भयंकर वळण! नवरीच्या ‘या’ आरोग्य स्थितीने नवऱ्याला बसला धक्का, डॉक्टरांकडून ऐका कहाणी व उपाय
Do magnesium supplements help you sleep better Find out how much you should take daily
शांत झोपेसाठी मॅग्नेशियमपूरक आहार फायदेशीर ठरेल का? दररोज किती प्रमाणात करावे सेवन? जाणून घ्या तज्ज्ञांकडून…
World Yoga Day: Why this asana and pranayama can rid you of depression
International Yoga Day 2024: अवघ्या काही मिनिटांत व्हाल तणावमुक्त अन् ताजेतवाने; करा फक्त ‘ही’ योगासने
foods to avoid in monsoon
पावसाळ्यात दूर राहा ‘या’ ७ पदार्थांपासून; आहारतज्ज्ञ म्हणतात, अन्यथा मिळेल अनेक आजारांना आमंत्रण!
kashmira pawar satara arrested forged as pmo appointed
साताऱ्यातील कश्मिरा पवारची ‘घोटाळा’झेप; आधी उत्तुंग कामगिरीच्या बातम्या, नंतर फसवाफसवी झाली उघड!
Rape case Story
१२ व्या वर्षी गँगरेप, १३व्या वर्षी मातृत्त्व; २४ वर्षांनी त्याच मुलाने आईचे पांग फेडले, नराधमांना शोधून घेतला बदला!
Election Commission
लोकसभा झाली, आता विधानसभा! निवडणूक आयोगानं जारी केली महत्त्वाची माहिती; २५ जूनची तारीखही ठरली!
Mark Rutte bicycle video
ना जाहिरातबाजी, ना सोहळा… ‘या’ देशाचे पंतप्रधान राजीनामा देऊन सायकलवर बसून घरी गेले, VIDEO व्हायरल

हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीस हातानेच सीपीआर देणे गरजेचे आहे. कारण- असे केल्याने रुग्णांना रक्तप्रवाह आणि मेंदूसह महत्त्वाच्या अवयवांना ऑक्सिजनचा पुरवठा होण्याच्या दृष्टीने मदत मिळते. डॉक्टर गोयल यांच्या मते, सीपीआरचे कोणतेही औपचारिक प्रशिक्षण नसतानाही तोंडावाटे सीपीआर देण्यापेक्षा हाताने सीपीआर देणे कधीही योग्य ठरेल. एखादी व्यक्ती सीपीआर कसा द्यायचा या गोष्टीसाठी प्रशिक्षित नसते किंवा हृदयविकाराचा झटका आलेली व्यक्ती तोंडावाटे सीपीआर घेण्यास तयार नसते. त्यावेळी तुम्ही हाताने सीपीआर देणे हा मार्ग योग्य ठरेल.

फक्त हाताने सीपीआर देण्यासाठी तुम्ही पुढील स्टेप्स फॉलो करा –

१. जेव्हा हृदयविकाराचा झटका आल्यावर व्यक्ती प्रतिसाद देत नाही किंवा श्वास घेत नाही. तेव्हा आपत्कालीन सेवांना कॉल करा. त्यानंतर तुम्हाला शक्य असल्यास व्यक्तीला एका सपाट पृष्ठभागावर झोपवा.

२. त्यापुढे व्यक्तीच्या बाजूला गुडघा टेकवून बसा. तुमच्या एका तळहाताच्या पंजाचा भाग व्यक्तीच्या छातीच्या मध्यभागी ठेवा आणि त्याच्यावर तुमचा दुसरा हात ठेवा. तुमचे हात सरळ ठेवून, तुमचे संपूर्ण वजन त्यांच्या छातीवर टाका.

३. प्रत्येक मिनिटाला १०० ते २०० कॉम्प्रेशनच्या दराने रुग्णाची छाती किमान दोन इंच खोल दाबून रुग्णवाहिका येईपर्यंत या कृतीची पुनरावृत्ती करीत राहा.

४. आपत्कालीन वैद्यकीय सेवा येईपर्यंत किंवा पीडित व्यक्ती पुन्हा शुद्धीत येण्याची चिन्हे दिसेपर्यंत. प्रत्येकी ३० कॉम्प्रेशनच्या दरम्यान दोन वेळा श्वास घ्या.

तर डॉक्टरांनी शकिराच्या ‘हिप्स डोन्ट लाय’ गाण्यात १०० बीट्स प्रतिमिनीट आहेत हे समजावून सांगत कशा प्रकारे एका हाताने सीपीआर देणे योग्य ठरेल हे सांगितले आहे.