निरोगी जीवनशैली आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेकजण वेगवेगळे उपाय शोधत असतात. यात कढीपत्ता आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो. त्याला विशेष सुगंध आणि चव आहे; यामुळे कढी, सांबर, वरण यांसारख्या पदार्थांमध्ये कढीपत्त्याचा वापर केला जातो. कढीपत्त्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी मदत होते. तसेच पाचक प्रणाली सुधारते, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते. अशा परिस्थितीत दररोज कढीपत्ता खाल्ल्यास तुमच्या शरीरावर काय परिणाम होतील, याविषयी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना योग इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. हंसाजी योगेंद्र यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास फायदेशीर

डॉ. हंसाजी योगेंद्र यांच्या म्हणण्यानुसार, कढीपत्ता खाल्ल्यास शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. शिवाय चयापचयाच्या क्षमतेत वाढ होते. कढीपत्त्यात असलेल्या कार्बाझोल अल्कलॉइड्समध्ये लठ्ठपणाविरोधी गुणधर्म असल्याचे मानले जाते. वजन कमी करण्याबरोबरच कढीपत्त्याची पानं पचन सुधारणे, हृदयविकाराचा धोका कमी करणे आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास फायदेशीर मानली जातात.

Can lemon Juice Reduce Motion Sickness
गाडीच्या प्रवासात मळमळ, उलटी होत असेल तर लिंबू जवळ ठेवाच! डॉक्टरांनी सांगितले फायदे, लिंबू खाऊ नका उलट असा वापरा
What To Eat In Shravan
श्रावणात कोणती धान्य व फळे खाल्ल्याने शरीराला होतो फायदा? आहारतज्ज्ञांनी सांगितलेल्या मीठ- मसाला वापरण्याच्या टिप्स वाचा
Ayurvedic Remedies Swarna Bhasma
स्वर्ण भस्म किंवा सोन्याच्या तुपाचं सेवन का आहे फायद्याचं? आयुर्वेदिक तज्ज्ञांनी सांगितलं खरं तूप कसं ओळखायचं?
Man Sexually Assault Dogs
रस्त्यात श्वानांच्या प्रायव्हेट पार्ट्सला हात लावणाऱ्या विकृताचा Video व्हायरल; लहान मुलगी अत्याचार पाहून थांबवायला गेली पण..
Healthy Midnight Snacks Option
रात्री तूप लावलेला ‘हा’ पराठा खाल्ल्याने पचनही होईल वेगवान; तीन वस्तू वापरून करायची रेसिपी व फायदे जाणून घ्या
lokmanas
लोकमानस: अशांमुळेच यंत्रणांवरील विश्वास उडतो
Beetroot Juice Benefits
बीटाचा रस पिण्याचे फायदे वाचलेत का? ‘या’ वयोगटातील महिलांना होऊ शकतो मोठा लाभ; अभ्यासात सांगितले आहे ‘हे’ योग्य प्रमाण
what is sleepwalking and why people walk in sleep
झोपेत चालल्याने इमारतीवरून पडून मुंबईत एकाचा मृत्यू; काय आहे हा आजार? लोक झोपेत का चालतात? तज्ज्ञ काय सांगतात….

आहारात अशाप्रकारे करा कढीपत्त्याचा वापर

कढीपत्त्याचे आरोग्यासाठी आवश्यक फायदे मिळविण्यासाठी तुम्ही रोजच्या आहारात त्याचा विविध प्रकारे वापर केला पाहिजे.

१) रोज सकाळी रिकाम्या पोटी काही ताजी कढीपत्त्याची पानं खा, यामुळे शरीरास फायदेशीर पोषक घटक वाढतात आणि आपल्या शरीरातील चयापचय क्रिया सुधारते.

२) स्वयंपाक करताना वेगवेगळ्या पदार्थांमध्ये कढीपत्त्याचा वापर करा. तुम्ही करी, सूप आणि फोडणीचा भात अशा विविध पदार्थ्यांची चव वाढवण्यासाठी कढीपत्ता वापरू शकता.

३) कढीपत्त्यापासून सुगंधी चहा बनवण्यासाठी तुम्ही मूठभर कढीपत्ता पाण्यात उकळवा. यानंतर पाणी गाळून घ्या. आता त्यात लिंबाचा रस आणि थोडे मध घाला. वजन कमी करण्यासाठी हा चहा दररोज झोपेच्या वेळी पिऊ शकता. विशेषत: लठ्ठपणाचा सामना करणाऱ्या लोकांसाठी हा चहा खूप फायदेशीर ठरू शकतो.

साइड-फॅट कटर चहा बनवण्याची कृती

तुम्ही कढीपत्त्याचा वापर करून खालीलप्रकारे चहाचा नवा प्रकार ट्राय करू शकता.

१) १ कप पाणी उकळा, त्यात १ टीस्पून जिरे आणि १०-१२ कढीपत्ता टाकून ती ३-४ मिनिटे उकळवा. आता गॅस बंद करा. यानंतर १/२ टीस्पून हळद घालून ढवळावे.

डॉ. हंसाजी यांच्या मते, कढीपत्त्याच्या पानांमध्ये फॅट बर्न करणारे गुणधर्म आहेत, तसेच जिरे आणि हळदीही शरीरास अतिशय गुणकारी घटक असतात. हळदीत कर्क्यूमिन असते, जे शरीरातील अतिरिक्त चरबी वाढवण्याचे प्रमाण रोकतात. तर जिरे शारीरिक प्रक्रियांचा वेग वाढवून कॅलरी पटकन बर्न करण्यास मदत करते.

कढीपत्त्याच्या पानांचे इतरही अनेक फायदे

वजन कमी करण्यास मदत करण्याबरोबरच कढीपत्त्याचे इतरही अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. कढीपत्ता कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोह यांसारख्या महत्त्वपूर्ण खनिजांसह जीवनसत्त्वे ए, बी, सी आणि ई समृद्ध आहे. या पानांमध्ये अँटिऑक्सिडंट्सदेखील असतात, जे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात, असंही डॉ. हंसाजी यांनी स्पष्ट केले.

वजन कमी करण्यासाठी कढीपत्त्याची पानं फायदेशीर आहेतच, पण तुम्ही वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी संतुलित दृष्टिकोन ठेवणे फार महत्त्वाचे आहे. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी रोज संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि इतर निरोगी जीवनशैलींची निवड करणे फार महत्वाचे आहे. यामुळे तुम्ही आहारात विविध पद्धती करून एक निरोगी आरोग्य मिळवू शकता, असेही डॉ. हंसाजी म्हणाले.