What is exercise snacking व्यायामाला वेळ नाही, अशी अनेकांची तक्रार असते. पण दोस्तांनो, चांगलं आरोग्य हवं तर हे टाळून चालणार नाही. भले आपण कितीही बिझी असू, तरी व्यायामासाठी थोडा वेळ काढणं आवश्यक आहेच. तुमच्या व्यस्त दिनक्रमामुळे सकाळी एक तासही वेळ मिळत नाही का? काही हरकत नाही. दिवसभराच्या कामातून थोडा वेळ काढा. तुम्ही स्नॅकिंगअंतर्गत एकदाच तासभर जीममध्ये जाऊन घाम गाळण्यापेक्षा छोट्या-छोट्या टप्प्यांमध्ये व्यायाम करणं याचा समावेश होतो. त्यामुळे व्यायाम होतोच, शिवाय वेळ मिळत नाही ही समस्याही दूर होते.

फिटनेस स्नॅकिंग म्हणजे काय?

फिटनेस स्नॅकिंग’ म्हणजे थोड्या-थोड्या वेळाच्या अंतराने व्यायाम करणं; याला ‘फिटनेस स्नॅकिंग’ असं म्हणतात. या फिटनेस ट्रेंडबाबत आरोग्यतज्ज्ञ डॉ. मिकी मेहता यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे.

स्नॅकिंगअंतर्गत नियमित व्यायाम होत असल्याने हृदयरोग, सांधेदुखी आणि रक्तदाब अशा आजारांपासून बचाव करता येतो. फिटनेस स्नॅकिंगमुळे शरीराला लवचिकता मिळते. आपले स्नायू सक्रिय होतात, तसेच रक्तातील साखर कमी करते, रक्तातील ऑक्सिजन वाढवते. या व्यायामाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, यामध्ये तुम्हाला जिममध्ये जाण्याची गरज नाही. यामध्ये तुम्हाला कोणतेही जड उपकरण उचलण्याची गरज नाही. वर्कआउटसाठी आपल्याला फक्त डेस्क किंवा खुर्चीची आवश्यकता आहे. या व्यायामामध्ये स्लो जॉगिंग, पुश-अप्स, स्ट्रेचेस, एका जागेवर जोरदार चालणे यांचा समावेश असू शकतो.

यामध्ये तुम्ही कोणते व्यायाम करू शकता हे जाणून घेऊ.

  • खुर्चीवर सरळ बसा. दोन्ही हातांनी खुर्चीचा मागचा भाग धरून उजव्या बाजूला वळवा, पुन्हा डाव्या बाजूला वळवा. आपले हात डेस्कवर ठेवा आणि आपले पाय उजवीकडून डावीकडे, पुढे आणि मागे फिरवा.
  • खुर्चीवर बसा, पुढे वाकून बोटांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. या व्यतिरिक्त, मान फिरवणे, हात ताणणे, खांद्याचे व्यायामदेखील फक्त पाच मिनिटांत करता येतात.

फिटनेस स्नॅकिंग हा उत्तम पर्याय

रोजच्या ठरलेल्या दिनचर्येमध्ये कोणताही बदल न करता, त्या वेळापत्रकात काही वेळाच्या अंतराने व्यायाम करणे शक्य होतं. एकाच वेळी सलग व्यायाम केल्याने येणारा थकवा कमी होऊन, काही वेळाच्या अंतराने केलेल्या व्यायामाने मन प्रसन्न राहण्यास मदत होते.

हेही वाचा >> रोज ओट्स खाल्यामुळे खरेच वजन कमी होऊ शकते? ओट्स का आणि कसे खावेत; जाणून घ्या तज्ज्ञांकडून…. 

तासन्‌तास व्यायाम करणं कंटाळवाणं वाटत असल्यास स्नॅकिंग हा उत्तम पर्याय आहे. हा पर्याय अमलात आणल्यास शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम राहण्यास मदत होते. स्नॅकिंग करताना चालण्याच्या व्यायामाबरोबरच जॉगिंग, स्कॉट्स यांसारख्या व्यायामप्रकारावरही भर द्या. योग्य ती काळजी घेऊन स्नॅकिंग केलं, तर तुम्ही आरोग्यदायी आयुष्य नक्की जगू शकता. हे व्यायामप्रकार करण्यासाठी तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांनाही प्रोत्साहित करू शकता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फिटनेस स्नॅकिंग हे अनेकांना सोपं वाटत असलं, तरी ते प्रत्यक्षात मात्र तसं नाही, कारण यासाठी अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. त्यामुळे योग्य ती काळजी घेऊन स्नॅकिंग केलं, तर तुम्ही आरोग्यदायी जीवन जगू शकता.