चेहऱ्यावरील पुरळ म्हणजेच पू असलेले छोटे फोड ज्याला पिंपल्स किंवा मुरमे, असेही म्हणतात. पुरळ त्वचा खूप खराब करतात; ज्यामुळे अनेकदा त्रास होतो आणि अनेकांना बऱ्याचदा ते फोड फोडल्याशिवाय राहवत नाही. या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी हा उपाय सोपा वाटत असला तरी पुरळ फोडण्यामुळे त्वचेचे जास्त नुकसान होते. ते बरे होण्यासाठी तुमच्या शरीराच्या नैसर्गिक यंत्रणेला थोडा वेळ द्या.

नोएडा येथील मॅक्स मल्टी स्पेशॅलिटी सेंटरच्या ज्येष्ठ त्वचारोगतज्ज्ञ, डॉ. दिप्ती राणा यांनी सांगितले की, पुरळ बरे करण्यासाठी DIY हॅक्स किंवा घरगुती उपाय फायदेशीर का ठरत नाही आणि त्वचेची काळजी घेताना तुम्हाला काय काळजी घेतली पाहिजे” याबाबत सविस्तर जाणून घेऊ या…

पुरळ आणि त्याचे विविध प्रकार

जेव्हा केसांच्या मुळांभोवतीच्या त्वचेतील पेशी एकत्र येतात, तेव्हा सामान्यत: पुरळ निर्माण होतात आणि एक हट्टी प्लग तयार करतात (खूप जास्त सीबम उत्पादन किंवा मृत त्वचेच्या पेशींमुळे प्लग तयार होऊ शकतो; जे सेबमला पृष्ठभागापर्यंत पोहोचण्यापासून रोखतात); जे त्वचेच्या छिद्रांमध्ये अडथळा आणतात. सामान्यत: पुरळाचे तीन सामान्य प्रकार आहेत.

ब्लॅकहेड : प्लगने भरलेले जे छिद्र उघडे राहते, हवेच्या संपर्कात आल्याने ते गडद काळ्या रंगाचे दिसते.
व्हाईटहेड : प्लगने भरलेले जे छिद्र बंद राहते, ते बहुतेकदा त्वचेवर लहान, पांढरे खड्डे असल्यासारखे दिसते.
पुस्ट्यूल : ज्यात पू भरलेला असतो आणि अधिक सुजलेला असा पुरळ; ज्यामुळे त्वचेला लालसरपणा येतो आणि त्वचा अत्यंत नाजूक होते.

जेव्हा हे छिद्र झाकले जाते किंवा त्वचेचा पृष्ठभागाखाली पुरळ तयार होतो, तेव्हा केसांच्या मुळांशी पू व सेबम (तेल) यांचे मिश्रण साचते. कालांतराने त्यामुळे केसांच्या मुळांवर दाब वाढू शकतो आणि अखेर तो फुटतो. त्यानंतर तो बरे होण्याची प्रक्रिया सुरू होते. ही प्रक्रिया म्हणजे नैसर्गिकरीत्या पुरळ बरे करण्याची आपल्या शरीराची पद्धत असते.

हेही वाचा – रोज एकाच वेळी ५० पायऱ्या चढणे कमी करू शकते हार्ट अटॅकचा धोका? तुमच्यासाठी हे उपयुक्त ठरेल का? 

घरगूती उपाय त्वचेला आणखी नुकसान कसे पोहोचवू शकतात.

पुरळ घालवण्यासाठी आपण फार घाई करतो. त्यामुळे अनेकदा आपण “Do-it-yourself”(DIY) मार्ग निवडतो आणि पुरळ फोडण्याचा प्रयत्न करतो; ज्यामुळे तुम्हाला नको असलेल्या त्वचेच्या समस्या उदभवू शकतात. त्या खालीलप्रमाणे

कायमस्वरूपी डाग : पुरळ फोडल्यामुळे त्याभोवतीच्या त्वचेच्या उतींना नुकसान पोहोचू शकते; ज्यामुळे त्वचेवर डाग राहू शकतात आणि पुरळ गेल्यानंतरही ते दीर्घकाळ दिसतात.

आणखी पुरळ येतात : पुरळ फोडल्यामुळे जीवाणू संसर्ग आणि दाह निर्माण होतो. त्यामुळे आणखी पुरळ येण्याची शक्यता वाढते; ज्यामुळे तुमच्या चेहऱ्याची त्वचा आणखी खराब होऊ शकते.

वेदना व त्रासात भर : तुमच्या त्वचेवरील पुरळ फोडल्यामुळे तुम्हाला संसर्ग झालेल्या ठिकाणी आणखी त्रास आणि वेदना होऊ शकते.

संसर्गाच्या धोक्यात वाढ : जेव्हा तुम्ही एखादा पुरळ फोडता तेव्हा तुम्ही स्वत:च्या हाताने खुल्या जखमेसह जीवाणूंचा संसर्ग होण्यास मदत करता आणि त्यामुळे आणखी संसर्ग होण्याचा धोका वाढतो.

म्हणूनच पुरळ फोडण्याचा मोह आवरून वा संयम ठेवून तुम्ही स्वच्छ आणि निरोगी त्वचा राखण्यासाठी प्रयत्न करू शकता.

हेही वाचा –मासिक पाळीमध्ये असह्य वेदना का होते? अशा वेळी पेन किलर घ्यावी की नाही? तज्ज्ञांकडून जाणून घ्या उत्तर….

पुरळ निसर्गत: बरे होण्यासाठी काय करता येईल? :

तुमचे हात चेहऱ्यापासून दूर ठेवा : तुमच्या पुरळांना स्पर्श करणे किंवा फोडण्याचा मोह टाळा; जे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही जितका कमी स्पर्श कराल, तितकी तुमची त्वचा चांगली राहील.

स्पर्श करणे, फोडणे टाळा : या क्रिया तुमचे पुरळ आणखी वाढवू शकतात; ज्यामुळे ते अधिक वेदनादायक होतात. त्याऐवजी आपल्या शरीराला त्या पुरळांना नैसर्गिकरीत्या बरे करू द्या.

बर्फाने वेदना कमी करा : पुरळ वेदनादायक असू शकते; विशेषतः नोड्युल आणि सिस्ट (Nodules and Cysts). त्यावर बर्फ लावल्याने दाह आणि अस्वस्थता कमी होण्यास मदत होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, पुरळ बरे होण्यासाठी वेळ लागतो. तुम्हाला सातत्याने पुरळ येत असतील, तर स्वच्छ आणि निरोगी त्वचा मिळवण्यासाठी त्वचारोगतज्ज्ञाचा सल्ला घेणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. लक्षात ठेवा, आज संयम राखला, तर उद्या तुमची त्वचा अधिक स्वच्छ आणि अधिक तेजस्वी होऊ शकते.