High Cholesterol: कोलेस्ट्रॉल हा आपल्या शरीरातील एक आवश्यक घटक आहे. पण आवश्यकतेपेक्षा याची पातळी वाढली तर गंभीर समस्या उद्भवू शकतात. २०० mg/dL पेक्षा कमी कोलेस्टेरॉलची पातळी चांगली मानली जाते. परंतु यापेक्षा जास्त पातळी धोकादायक मानली जाते. यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक सारख्या अनेक घातक परिस्थिती उद्भवू शकतात. दरवर्षी कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागतो. कोलेस्टेरॉलचा आजार सध्या महामारीसारखा वाढत आहेत. सर्व वयोगटातील लोक या आजाराने त्रस्त आहेत. त्यामुळे सर्वांनीच याबाबत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

सुरुवातीला कोलेस्टेरॉलची पातळी लक्षात येत नाही. जेव्हा स्थिती गंभीर होते तेव्हा कोलेस्टेरॉल नियंत्रित करणे खूप कठीण होते. पण आपण लहान गोष्टी करूनही कोलेस्ट्रॉलचा धोका कमी करू शकतो. खराब जीवनशैली आणि बिघडलेला आहार हे कोलेस्ट्रॉल वाढण्याचे प्रमुख कारण मानले जाते.

कोलेस्टेरॉल कोणतीही लक्षणे दाखवत नाही (Cholesterol Symptoms)

हाय LDL कोलेस्टेरॉलची कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसत नसल्याचा अहवाल मेयो क्लिनिकने दिला आहे. त्यामुळे हा आजार सहज ओळखता येत नाही. म्हणूनच त्याला सायलेंट किलर म्हणतात. कारण ते हळूहळू वाढते आणि त्यावर वेळीच उपचार न केल्यास ते एखाद्या व्यक्तीचा जीवही घेऊ शकते. रक्त तपासणी करूनच कोलेस्टेरॉल ओळखता येते. ही समस्या टाळण्यासाठी लोकांनी वेळोवेळी रक्त तपासणी करून घेणे आवश्यक आहे.

( हे ही वाचा: लघवीला अतिशय दुर्गंधी येते का? ‘या’ २ आजाराचा असू शकतो संकेत)

डॉक्टरांना कधी भेटावे?

नॅशनल हार्ट, लंग आणि ब्लड इन्स्टिट्यूट (NHLBI) च्या मते, एखाद्या व्यक्तीची पहिली कोलेस्टेरॉल तपासणी ९ ते ११ वयोगटात झाली पाहिजे. त्यानंतर दर पाच वर्षांनी त्याची तपासणी करावी. NHLBI शिफारस करते की ४५ ते ६५ वयोगटातील पुरुषांसाठी दर एक ते दोन वर्षांनी आणि ५५ ते ६५ वयोगटातील महिलांसाठी दर एक ते दोन वर्षांनी कोलेस्ट्रॉल तपासावे. ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींनी वार्षिक कोलेस्टेरॉलची चाचणी करून घ्यावी.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टेस्टमध्ये तुमचे कोलेस्ट्रॉल वाढले असेल तर डॉक्टर तुम्हाला बार टेस्ट करण्याचा सल्ला देऊ शकतात. जर कुटुंबातील एखाद्याचा आधीच हाय कोलेस्टेरॉल, हृदयविकार किंवा मधुमेह किंवा उच्च रक्तदाब यांसारख्या इतर गंभीर आजारांचा कौटुंबिक इतिहास असल्यास, तुमचे डॉक्टर अधिक-वारंवार चाचणी सुचवू शकतात.

‘या’ पाच उपायांचा अवलंब करून कोलेस्ट्रॉल नियंत्रित करता येते

  • दररोज ३० मिनिटे व्यायाम करा.
  • सकस आहार घ्या आणि जंक फूड टाळा.
  • धूम्रपान आणि मद्यपान टाळा
  • आपले वजन नियंत्रित करण्याचा प्रयत्न करा.
  • तुमच्या रक्ताच्या चाचण्या नियमित करा.