Tips To Take Care Of Your Home Before Monsoon : पावसाळा सुरु होण्याआधी जवळजवळ एक महिनाआधी मार्केटमध्ये रेनकोट, छत्री, पावसाळी चप्पल विकायला विक्रेते सुरुवात करतात. भारतात मे महिन्यातच पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे उष्णतेपासून आराम मिळाला आहे. पण वाढत्या आर्द्रतेमुळे आणि पावसाच्या पाण्यामुळे तुमच्या दैनंदिन जीवनावरही त्याचा परिणाम होतो. घराबाहेर पडण्याआधी, पावसापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी जसे आपण रेनकोट, छत्री विकत घेतो अगदी त्याचप्रमाणे घराचीही काळजी घेणे महत्वाचे आहे. कपड्यांना नको असलेला वास येतो, घरांना ओलावा आणि घराजवळ पाणी साचणे इतर अनेक समस्यांचा पावसाळ्यात आपल्याला सामना करावा लागतो.म्हणूनच, या समस्या टाळण्यासाठी पावसांपासून घराचे संरक्षण करणे महत्वाचे आहे. त्यासाठी पुढील टिप्स तुम्हाला मदत करतील.

घराचं वॉटरप्रूफिंग करून घ्या

पावसाळा सुरू होण्यापूर्वी घराचे वॉटरप्रूफिंग करणे अत्यंत महत्वाचे आहे. तुमच्या घराच्या छप्पर आणि टेरेसपासून सुरुवात करा. छप्पराला गळती किंवा भिंतीत ओलावा नाही ना याची खात्री करून घ्या. वॉटरप्रूफिंग मेम्ब्रेन, बिटुमेन शीट किंवा लिक्विड सीलंट वापरा. ​​बाहेरील भिंती आणि तळघराच्या भागात वॉटरप्रूफ कोटिंग्ज लावा. कारण – या भागात ओलसरपणाची शक्यता जास्त असते.

दरवाजे आणि खिडक्या चेक करा

दरवाजे आणि खिडक्यांभोवती असलेल्या लहान छिद्रांमधून पावसाचे पाणी सहजपणे आतमध्ये येऊ शकते. रबर गॅस्केट, सिलिकॉन कॉल्क किंवा वॉटरप्रूफ टेप वापरून या छिद्रांना सील करा. दरवाजे आणि खिडक्या पावसाच्या पाण्यामुळे फुगतात त्यामुळे त्यासाठी तुम्ही वार्निश किंवा वॉटर-रेपेलेंट पॉलिशचा लेप लावू शकता.

फर्निचर आणि अपहोल्स्ट्रीचे संरक्षण करा

पावसाळ्यात लाकडी फर्निचरमध्ये बुरशी येऊ शकते. त्यामुळे त्यांना भिंतींपासून दूर ठेवा आणि त्यावर वॉटरप्रूफ पॉलिशचा थर लावा. तुम्ही सोफा आणि खुर्च्यांसाठी मॉइश्चराइझर रेसिस्टंट स्लिपकव्हर देखील वापरू शकता किंवा धुण्यायोग्य जड कार्पेट किंवा बांबूच्या चटईचा देखील उपयोग करू शकता.

कापड आणि कपड्यांची काळजी

पावसाळ्यात आर्द्रतेमुळे कपडे आणि चादरींना घाणेरडा वास येऊ शकतो किंवा बुरशी येऊ शकते. ते कोरड्या आणि हवेशीर ठिकाणी साठवा. साठवण्यापूर्वी तुम्ही कपडे पूर्णपणे कोरडे देखील वापरू शकता आणि ओले कपडे घरात ठेवू नका.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गटार स्वच्छ करा

तुंबलेलं गटार, गटारात अडकलेला कचरा यामुळे पाणी साचून राहते. हे साचलेलं पाणी नंतर भिंतींमध्ये ओल येण्याचं कारण ठरू शकतं. त्यामुळे तुमच्या टेरेस, बाल्कनी आणि बाहेरील ड्रेनपाइप्समधील सर्व कचरा साफ करा.