How to clean bed sheets: घाम आणि धुळीमुळे बेडशीट लवकर घाण होतात. अशात जेव्हा बेटशीट खूप मोठी आणि जाड असते तेव्हा ती स्वच्छ करणे खूप कठीण वाटते. अशा वेळी तुम्हाला बेडशीट धुण्याच्या जुन्या पद्धती बदलण्याची आवश्यकता आहे. आज आम्ही तुमच्यासाठी बेडशीट साफ करण्याची एक सोपी, प्रभावी आणि घरगुती पद्धत सांगणार आहोत. या पद्धतीने तुम्ही कमी मेहनतीत आणि कमी वेळात बेडशीट स्वच्छ करू शकाल.

बेडशीट धुण्याचा सोपा मार्ग

जर तुमच्या बेडशीटवर डाग असतील, तर त्यासाठी तुम्ही गरम पाणी वापरू शकता. एका बादलीमध्ये गरम पाणी भरा. गरम पाणी कपड्यावरील डाग काढण्यास मदत करते.

आता या गरम पाण्यात अर्धा कप बेकिंग सोडा आणि एक चमचा डिटर्जंट पावडर मिसळा. खरं तर, या गोष्टी एका नैसर्गिक क्लीनरप्रमाणे काम करतात आणि त्यामुळे बेडशीटमधून येणारा दुर्गंध दूर होतो.

जर तुमच्या बेडशीटवर चिवट डाग असेल, तर एका नरम ब्रशच्या मदतीने बेडशीटरील चिवट डाग घासून स्वच्छ करा.

शेवटी जेव्हा तुम्ही बेडशीट स्वच्छ पाण्याने धुऊन घ्याल तेव्हा त्यात थोडे व्हिनेगर टाका, ज्यामुळे बेडशीटची चमक टिकून राहील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता या बेडशीटला तुम्ही उन्हामध्ये सुकवू शकता, ज्यामुळे ती लवकर सुकेल.