7th July Holiday: ७ जुलै २०२५ रोजी देशभरात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे येत्या ७ जुलै रोजी सुट्टी आहे की नाही असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यामुळे नोकरदारांना, शाळांना सलग तीन दिवसांचा वीकेंड मिळण्याची शक्यता आहे, कारण ७ तारखेला सुट्टी मिळाली तर शनिवार, रविवार आणि सोमवार असा मोठा वीकेंड मिळेल; त्यामुळे फिरायला जाण्यासाठी उत्सुक असणारे ७ जुलैला सुट्टी आहे की नाही याची वाट पाहत आहेत.
येत्या ७ जुलैला सुट्टी असणार की नाही?
६ जुलै रोजी आषाढी एकादशी आणि मोहरम असे हिंदू-मुस्लीम धर्मियांसाठी मोठे उत्सव एकाच दिवशी आले आहेत. सरकारने जाहीर केलेल्या सुट्ट्यांमध्ये मोहरमची सुट्टी ही ६ जुलै रोजी जाहीर करण्यात आली आहे. रविवार असल्याने मोहरमची वेगळी सुट्टी मिळणार नाही. मात्र, मोहरमची तारीख इस्लामिक कॅलेंडरनुसार ठरवली जाते, जी चंद्राच्या स्थितीवर अवलंबून असते. इस्लामिक नवीन वर्षदेखील याच दिवशी सुरू होते. २०२५ मध्ये मोहरमची संभाव्य तारीख ६ जुलै आहे. परंतु, जर चंद्र उशिरा दिसला तर ती सुट्टी ७ जुलै (सोमवार) देखील असू शकते.
६ की ७ जुलै हे चंद्र दिसण्याच्या तारखेवर अवलंबून आहे. सध्या तरी अधिकृतरित्या ६ तारखेला मोहरम आहे, यामुळे रविवार आणि सार्वजनिक सुट्टी एकाच दिवशी आलेली आहे. जर ७ तारखेला सार्वजनिक सुट्टी जाहीर झाली तर बँकांसह शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये, पोस्ट ऑफिस आणि अनेक खाजगी कार्यालये बंद राहतील. यामुळे तुम्हाला शनिवारीच म्हणजेच ५ जुलैला सर्व महत्त्वाची कामे उरकावी लागणार आहेत.
शेअर बाजार आणि एक्स्चेंजेसना व्यापार थांबवावा लागेल
मोहरममध्ये मुंबई स्टॉक एक्स्चेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) यासह भारतातील प्रमुख स्टॉक एक्स्चेंजेस बंद राहतील. या बंदचा परिणाम सर्व ट्रेडिंग सेगमेंट्सवर होईल. इक्विटीज, डेरिव्हेटिव्हज, चलन, व्याजदर फ्युचर्स आणि (SLB) प्लॅटफॉर्म. मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (MCX) देखील सकाळच्या सत्रासाठी बंद राहील, परंतु संध्याकाळी ५:०० ते रात्री ११:३०/११:५५ पर्यंत ट्रेडिंग पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.
धार्मिक महत्त्व
भारत देश हा विविध जाती-धर्मांनी एकवटलेला देश आहे. या भारत देशात प्रत्येक सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात, त्यामुळे येथे विविधतेत एकता पाहायला मिळते. अशातच यावर्षी १० ऑगस्टपासून पवित्र अशा मोहरमला सुरुवात झाली आहे. इस्लाममध्ये मोहरम हा दुःखाचा महिना मानला जातो. मुस्लीम समाज विशेषत: शिया समुदायाचे लोक या महिन्याच्या नवव्या किंवा दहाव्या दिवशी रोजा ठेवतात. मोहरम म्हणजे इस्लामी कॅलेंडरमधील पहिला महिना होय. इस्लामचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू हसन आणि हुसैन हे करबलाच्या मैदानावर याच महिन्यामध्ये शहीद झाले होते, त्यामुळे त्यांच्या आठवणीमध्ये हा सण साजरा केला जातो.