Navratri Colour and Fashion Guide 2025 : भारतामध्ये नवरात्रोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून तो आनंद, उत्साह आणि फॅशनचा सुंदर संगम आहे. नऊ दिवस देवीची पूजा आणि आराधना केली जाते. देवीला नऊ दिवस नऊ शुभ रंगाचे वस्त्र परिधान केले जातात. अनेक महिला देखील शुभ रंगाचे वस्त्र परिधान करतात. महाराष्ट्रात नवरात्रात नऊवारी व पैठणी साडीमध्ये नटलेल्या महिला दिसतात. याबरोबरच देशभरात विविध ठिकाणी पांरपांरिक गर्भा दांडियाचे पोशाख परिधान केलेले तरुण-तरुणी दिसतात. चला तर पाहूया २०२५ मधील नवरात्रीतील प्रत्येक दिवसाचा रंग, त्यानुसार पोशाखाबाबतच्या स्टायलिंग टिप्स.
नवरात्रीचे नऊ रंग (Navratri 2025 Dates And Colors)
- प्रतिपदा – २२ सप्टेंबर २०२५ – पांढरा रंग (सोमवार)
- द्वितीया – २३ सप्टेंबर २०२५ – लाल रंग (मंगळवार)
- तृतीया – २४ सप्टेंबर २०२५ – निळा रंग (बुधवार)
- चतुर्थी – २५ सप्टेंबर २०२५ – पिवळा रंग (गुरुवार)
- पंचमी – २६ सप्टेंबर २०२५ – हिरवा रंग (शुक्रवार)
- षष्ठी – २७ सप्टेंबर २०२५ – राखाडी रंग (शनिवार)
- सप्तमी – २८ सप्टेंबर २०२५ – केशरी रंग (रविवार)
- अष्टमी – २९ सप्टेंबर २०२५ – मोरपंखी रंग (सोमवार)
- नवमी – ३० सप्टेंबर २०२५ – गुलाबी रंग (मंगळवार)
नवरात्रीतील हे रंग केवळ उत्सवाचे सौंदर्य वाढवत नाहीत तर परंपरा आणि फॅशनचा सुंदर संगम घडवतात. महाराष्ट्रातील पारंपरिक पोशाख परिधान करून तुम्ही प्रत्येक दिवस देवीचे स्वागत अधिक साजरे करू शकता.
नवरात्री २०२५ साठी अधिकृत रंग आणि पोशाख
- प्रथम दिवस – पांढरा (२२ सप्टेंबर, सोमवार)
शांती आणि पवित्रतेचे प्रतीक. पांढऱ्या पैठणीवर लाल बॉर्डर, हलके मोत्यांचे दागिने उठून दिसतात. - द्वितीय दिवस – लाल (२३ सप्टेंबर, मंगळवार)
शक्ती आणि महत्वाकांक्षेचा रंग. सोन्याच्या दागिन्यांबरोबर लाल नऊवारी अधिक खुलून दिसते. - तृतीय दिवस – निळा (२४ सप्टेंबर, बुधवार)
आत्मविश्वासाचा रंग. निळ्या पैठणीसह चांदीचे दागिने किंवा मोत्यांचा हार परिधान करू शकता. - चतुर्थ दिवस – पिवळा (२५ सप्टेंबर, गुरुवार)
आनंद आणि सौंदर्याचा रंग. हलकी पिवळी सिल्क साडी आणि केसात फुलांचा गजरा अत्यंत मोहक दिसतो. - पंचम दिवस – हिरवा (२६ सप्टेंबर, शुक्रवार)
समृद्धीचे प्रतीक. हिरवी नऊवारी व नथ, हिरव्या काचेच्या बांगड्या परिधान करून पांरपारिक लूक तुमच्या सौंदर्यात आणखी वाढवेल. - षष्ठ दिवस – राखाडी (२७ सप्टेंबर, शनिवार)
संतुलनाचा रंग. राखाडी रंगावर झरीची किनार आणि पारंपरिक दागिने नवरात्रीतील वेगळेपण दाखवतात. - सप्तम दिवस – केशरी (२८ सप्टेंबर, रविवार)
ऊर्जा आणि नवा उत्साह. केशरी नऊवारीवर साधा सोन्याचा काठ व कोल्हापुरी चप्पल उत्तम. - अष्टम दिवस – मोरपंखी (२९ सप्टेंबर, सोमवार)
रहस्य आणि राजेशाही दर्शवणारा हा रंग. मोरपंखी पैठणीवर झरीचा पल्लू आणि मोत्यांचे दागिने अप्रतिम दिसतात. - नवम दिवस – गुलाबी (३० सप्टेंबर, मंगळवार)
प्रेम आणि सौंदर्याचा रंग. गुलाबी सिल्क साडी व हलके दागिने दिवसभर आकर्षक दिसतात.
नवरात्रीसाठी खास स्टाईलिंग टिप्स (Special styling tips for Navratri)
- नऊवारी साडी : पारंपरिक महाराष्ट्रीयन कातळी डिझाईन व गजरा हे आकर्षण वाढवतात.
- पैठणी साडी : सोन्याचा झरी पल्लू व खास पैठणीवरील मोराची नक्षी ऐश्वर्यपूर्ण लूक देते.
- दागिणे : चांदीचे दागिने, बोरमळा, नथ, हिरव्या बांगड्या आणि गजरा – नऊवारीसोबत परिपूर्ण जुळतात.
- पादत्राणे : कोल्हापुरी चप्पल्स किंवा पारंपरिक सॅंडल्स लूक पूर्ण करतात.
- अॅक्सेसरीज : पोटली बॅग, नथणी, जड झुमके किंवा हलके मोत्यांचे सेट, दिवसाच्या रंगाशी सुसंगत निवडा.
- फ्यूजन स्टाईल : कॉलेज किंवा ऑफिसला जाणाऱ्या महिलांसाठी कुर्ता-पलाझो किंवा लाँग स्कर्ट बरोबर ओढणी निवडता येईल.
कुठे खरेदी कराल पारंपरिक पोशाख? (Where to buy traditional clothing?)
- महाराष्ट्रात पुणे, नाशिक, कोल्हापूर व नागपूर येथील बाजारात पारंपरिक नऊवारी व पैठणी सहज उपलब्ध आहेत.
- पैठणी साड्या येवल्यातील विणकरांकडून थेट किंवा अधिकृत एम्पोरियममधून खरेदी करणे उत्तम.
- ऑनलाईन पर्याय : अनेक ई-कॉमर्स साइट्सवर (जसे की Amazon, Flipkart, Ajio, Myntra) खास नवरात्री कलेक्शनमध्ये रंगानुसार साड्या, कुर्ते, दुपट्टे आणि दांडिया-गर्भा पोशाख मिळतात.
- स्थानिक हँडलूम दुकाने : ग्रामीण भागातील हस्तकला मंडळे व हँडलूम शो-रूममध्ये दर्जेदार आणि परवडणाऱ्या किमतीत नवरात्रीसाठी खास साड्या मिळतात.
नवरात्रीतील हे रंग केवळ उत्सवाचे सौंदर्य वाढवत नाहीत तर परंपरा आणि फॅशनचा सुंदर संगम घडवतात. पारंपरिक महाराष्ट्रीयन नऊवारी आणि पैठणी परिधान करून तुम्ही प्रत्येक दिवस देवीचे स्वागत अधिक साजरे करू शकता.