scorecardresearch

Premium

Raksha Bandhan 2022: यंदाच्या रक्षाबंधनाला दिसा स्मार्ट आणि हँडसम; ‘या’ टिप्स फॉलो करून मिळवा बहिणींची वाहवा

मुलींइतकीच मुलांनाही ग्रूमिंगची आवश्यकता असते. याचनिमित्ताने आज आपण मुलांसाठी ग्रूमिंगच्या काही टिप्स जाणून घेणार आहोत.

raksha bandhan 2022 grooming tips for boys
आज आपण मुलांसाठी ग्रूमिंगच्या काही टिप्स जाणून घेणार आहोत. (File Photo/Pexels)

रक्षाबंधन हा सण अवघ्या एक आठवड्यावर आला आहे. यावेळी मुलं-मुली कपडे आणि गिफ्ट्सची शॉपिंग करतात. मुली आपलं सौंदर्य खुलवण्यासाठी ग्रूमिंग सेशनचे प्लॅनिंग करत आहेत. मुली याबाबतीत मागे राहत नाहीत. त्या अगदी नटूनथटून भावाला राखी बांधतात. या उलट भाऊ मात्र गडबडीत स्वतःच्या तयारीकडे लक्ष द्यायला विसरतात किंवा ते याकडे दुर्लक्ष करतात.

भाऊ रक्षाबंधनाच्या वेळी कोणतीही तयारी न करता राखी बांधायला बसतात, अशी तक्रार अनेक बहिणींची असते. मुलींइतकीच मुलांनाही ग्रूमिंगची आवश्यकता असते. याचनिमित्ताने आज आपण मुलांसाठी ग्रूमिंगच्या काही टिप्स जाणून घेणार आहोत.

lalbagh raja celebs are getting vvip treatment common people are being mistreated
देवाच्या दारात भेदभाव? लालबागच्या राजाच्या दर्शन रांगेत सेलिब्रिटींना VVIP दर्शन अन् सामान्यांना धक्काबुक्की; Video Viral
diet for healthy heart
Health Special: हृदयाच्या आरोग्यासाठी काय आहार असावा?
Bank of Baroda festive offer
Money Mantra : बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी फेस्टिव्हल ऑफर लाँच; गृह आणि वाहन कर्जांवर विशेष सूट
Want cigarettes secret ganja Zomato delivery boy sent a shocking message to the customer the screenshot went vira
‘आणखी काही पाहिजे… सिगारेट, सिक्रेट गांजा? झोमॅटो डिलिव्हरी बॉयने ग्राहकाला केला धक्कादायक मेसेज अन्…
  • स्क्रबिंग गरजेचे

सूर्यप्रकाश आणि प्रदूषणामुळे चेहऱ्यावर डेड स्किन, ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स, पिंपल्स इत्यादी येतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही दर दोन दिवसांनी चेहरा स्क्रब करत राहिलात तर राखीच्या दिवशी तुमच्या चेहऱ्यावर अतिरिक्त ग्लो दिसून येईल.

Raksha Bandhan 2022: ११ की १२ ऑगस्ट, कोणत्या दिवशी साजरा करावा रक्षाबंधनाचा सण? तज्ज्ञांनी सांगितली योग्य वेळ

  • रुक्ष केस मुलायम करा

जर तुमचे केस कोरडे आणि रुक्ष झाले असतील तर आतापासूनच केसांची अतिरिक्त काळजी घेणे सुरू करा. यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करण्याची गरज नाही. रात्री झोपताना केसांना हलके तेल लावा आणि सकाळी सौम्य शॅम्पूने केस धुवा. रक्षाबंधनाच्या दिवशी केसांना सिरम किंवा हेअर जेल लावायला विसरू नका.

  • अंघोळ केल्यानंतर दाढी करा

बरेच लोक सकाळी उठल्याबरोबर दाढी करतात आणि त्यानंतर अंघोळ करतात. पण जर तुम्ही अंघोळीनंतर दाढी केली तर तुमचे केस थोडे अधिक मऊ होतील आणि शेव्हिंग योग्य होईल. जर तुम्ही रक्षाबंधनाच्या दिवशी दाढी करणार असाल तर अंघोळ करून दाढी करावी.

  • नीट केस कापा

सुंदर दिसण्यासाठी, रक्षाबंधनाच्या दोन ते तीन दिवस आधी तुमचे केस कापून घ्या. जर तुमचे केस मोठे असतील तर ते नक्कीच ट्रिम करा. असे केल्याने तुमचा लुक फ्रेश होईल.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Raksha bandhan 2022 look smart and handsome this year raksha bandhan follow these tips and earn the admiration of your sisters pvp

First published on: 05-08-2022 at 21:51 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×