सर्व नऊ ग्रहांमध्ये शनि हा सर्वात महत्त्वाचा मानला जातो. कारण सर्व ग्रहांपैकी शनी सर्वात कमी वेगाने फिरतो. यामुळे त्यांना एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी अडीच वर्षांचा कालावधी लागतो. शनीची साडेसाती पुढे आणि मागे राशीवर चालते, ज्यामध्ये न्यायाची देवता शनिदेव राहतात त्या राशीचा समावेश होतो. त्यामुळे शनीची साडेसाती एकाच वेळी तीन राशींवर चालते.

शनि साडेसातीचे तीन चरण आहेत. पहिल्या चरणात शनि मानसिक त्रास देतात, दुसऱ्या चरणात मानसिक तसेच आर्थिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागतो. त्याच वेळी, तिसऱ्या चरणात, शनी साडेसातीमुळे होणारे त्रास हळूहळू कमी होऊ लागतात, या चरणात शनि व्यक्तीला आपली चूक सुधारण्याची संधी देते. तथापि, या तीन टप्प्यांपैकी साडेसातीचा दुसरा टप्पा सर्वात वेदनादायक मानला जातो.

Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Best Selling Car
Baleno, Brezza, Nexon, Creta नव्हे तर ‘या’ ५.५४ लाखाच्या हॅचबॅक कारसाठी ग्राहकांच्या लागल्या रांगा, झाली तुफान विक्री
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!

सध्या शनि मकर राशीत बसला आहे, त्यामुळे मकर, कुंभ आणि धनु राशीमध्ये शनीची साडेसाती सुरू आहे. मकर राशीत साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू असताना, पहिला टप्पा कुंभ राशीत तर शेवटचा टप्पा धनु राशीत सुरू आहे. आता २९ एप्रिल २०२२ रोजी शनि पुढील राशी बदल करेल. या काळात तो मकर राशी सोडून कुंभ राशीत प्रवेश करेल.

शनीच्या राशी बदलामुळे कुंभ राशीच्या लोकांवर साडेसातीचे दुसरे चरण सुरू होणार असून त्यांना सर्व प्रकारच्या त्रासांना सामोरे जावे लागू शकते. दुस-या टप्प्यात व्यक्तीच्या कौटुंबिक जीवनात चढ-उतार येतात, तसेच शारीरिक त्रासही सहन करावा लागतो. या काळात त्याला कोणीही साथ देत नाही. साडेसतीच्या या टप्प्यात माणसाला सर्व बाजूंनी संकटांनी घेरले आहे. अशा स्थितीत व्यक्तीने सर्व काम अत्यंत काळजीपूर्वक करावे आणि संयम कधीही गमावू नये. शनी हा कुंभ राशीचा अधिपती ग्रह असल्यामुळे कुंभ राशीच्या लोकांसाठी दुसरा टप्पा बाकीच्या राशीच्या तुलनेत कमी त्रासदायक असेल.