How To Grow Pudina at Home: अनेक भारतीय घरांमध्ये चटणी, लोणची, पापडांशिवाय जेवण अपूर्ण असते. त्यातही पुदिन्याची चटणी म्हणजे अनेक पदार्थांची लज्जत वाढवते. केवळ जिभेचे चोचले नव्हे तर शरीरालाही पुदिन्याची चटणी अत्यंत उपयुक्त आहे. पूर्वी पुदिना म्हणजे इतर भाजीवर फुकट आणायचा प्रकार मानला जायचा पण आता सगळ्याच वस्तूंचे भाव वधारले आहेत. अशात पुदिना वारंवार कोणी फ्री देत नाही. म्हणूनच आज आपण आपल्याच घरात पुदिना कसा उगवायचा हे शिकणार आहोत. घरी स्वतः पिकवलेल्या भाज्या खाणे हे सुख असतं आणि ते अनुभवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. गंमत म्हणजे हा पुदिना उगवण्यासाठी आपल्याला मातीची सुद्धा गरज लागणार नाही. चला तर पाहूया..

पुदिन्याच्या पानाचे फायदे (Benefits Of Mint)

आहारतज्ज्ञांच्या माहितीनुसार, पुदिन्याची पाने मळमळ दूर करण्यास आणि छातीत जळजळ कमी करण्यास मदत करतात. ही पाने आतड्याचे कार्य सुधारण्यास मदत करतात ज्यामुळे शरीराचे एकूण कार्य सुधारते. पुदिन्यामुळे शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होते, यामुळे विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसात पुदिन्याचे दाहक-विरोधी गुणधर्म तुमच्या पोटातील जळजळ कमी करण्यास मदत करतात. पुदिन्याचा अर्क xanthine oxidase ला प्रतिबंधित करतो, जे युरिक ऍसिडच्या निर्मिती करणारे एन्झाइम आहे. म्हणूनच उन्हाळयात पुदिन्याचे सेवन करायलाच हवे. चला तर मग हा बहुपयोगी पुदिना कसा पिकवायचा हे जाणून घेऊ…

मातीशिवाय पिकवा पुदिना (Video)

हे ही वाचा<< साबुदाणा कसा बनतो माहितेय का? Video पाहून चक्रावून जाल, एक किलोसाठी होणारी प्रक्रिया पाहा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, वर दिलेल्या पद्धतीने पुदिना पिकवताना पाणी दोन- तीन दिवसांनी सतत बदलत राहा अन्यथा पाणी माती व पुदिन्याच्या मुळांनी खराब होऊन दुर्गंध येऊ शकतो. तुम्ही हा प्रयोग करून पाहा व तो कसा होतो हे ही कमेंट करून कळवा