डाळिंब सोलण्याची पद्धत –
डाळिंबामध्ये मोठ्या प्रमाणावर रस असतो. त्यामुळे ते सोलताना कपड्यावर त्याचे डाग पडू शकतात. यासाठी डाळिंब सोलण्यापूर्वी त्याला चॉपिंग बोर्ड ठेवा. त्यानंतर डाळिंबाच्या वरच्या भागावर असलेला भाग थोडासा कापावा. हा भाग कापल्यानंतर डाळिंबाच्या आतील पांढरा भाग आणि डाळिंबाचे दाणे दिसू लागतील. यामध्ये जो पांढरा भाग आहे त्यातील मधला भाग प्रथम काढावा. त्यानंतर ज्या पांढऱ्या रंगाच्या रेषा आहेत त्या सुरीच्या मदतीने कापाव्यात. परंतु त्या कापत असतांना आतपर्यंत कापू नये. असं केल्यास डाळिंबाचे दाणे मधून कापले जाण्याची शक्यता असते. त्यामुळे पांढरा भाग हलक्या हाताने कापावा. त्यानंतर डाळिंबाचे वेगवेगळे चार भाग करुन दाणे अलगद काढून घ्यावेत.
दरम्यान, महाराष्ट्रात अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली येथे डाळिंबाचं पिक घेतलं जातं. डाळिंबांमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह मोठ्या प्रमाणात असतात. तसंच डाळिंबाच्या दाण्यांचाच नव्हे, तर त्याचं साल, पाने, फुले, बिया, मुळं या सर्वच भागांचा औषधामध्ये वापर करण्यात येतो.